महाराष्ट्राच्या राजभवनात बोगस डॉक्टरेटचं वाटप, अधिकाऱ्यांवर कारवाई होणार??

महात्मा गांधी ग्लोबल पीस फाऊंडेशननं थेट राजभवनात कार्यक्रम घेत बोगस डॉक्टरेट वाटप केल्यानं प्रश्न उपस्थित होत आहेत. अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी करण्यात येत आहे.

महाराष्ट्राच्या राजभवनात बोगस डॉक्टरेटचं वाटप, अधिकाऱ्यांवर कारवाई होणार??
महात्मा गांधी ग्लोबल पीस फाऊंडेशनचा राजभवन येथील कार्यक्रम Image Credit source: Facebook
Follow us
| Updated on: Mar 21, 2022 | 4:50 PM

मुंबई: राज्यपाल भगतसिंह कोश्यारी (Bhagatsingh Koshyari) यांच्या उपस्थितीत आयोजित करण्यात आलेल्या एका कार्यक्रमात बोगस डॉक्टरेट वाटप करण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. यासंदर्भात इंग्रजी आणि मराठी माध्यमांनी वृत्त प्रसिद्ध केलं आहे. बोगस डॉक्टरेट (Doctorate) प्रमाणपत्र वाटप करण्यात आली त्यावेळी राज्यपाल तिथं उपस्थित नव्हते. ओडिशा येथील महात्मा गांधी ग्लोबल पीस फाऊंडेशन (Mahatma Gandhi Global Peace Foundation) या एका संस्थेनं महाराष्ट्राच्या राजभवनात 8 नोव्हेंबर रोजी एक कार्यक्रम आयोजित केला होता. कोरोना योद्ध्यांचा सत्कार आणि डॉक्टरेट प्रदान असं त्या कार्यक्रमाचं स्वरुप होते. मात्र, कोरोना योद्ध्यांचा सन्मान आणि बोगस पीएच.डी वाटप करण्याचा प्रकार झाल्याचं समोर आल्यानं खळबळ उडाली आहे. संबंधित कार्यक्रम आयोजित करणाऱ्या संस्थेविरोधात पंतप्रधान कार्यालयाकडे तक्रार दाखल झाल्याची माहिती समोर आली आहे.

बोगस डॉक्टरेटचं वाटप झाल्याचं समोर

भारतात डॉक्टर्रेट प्रदान करण्यासंदर्भात विशिष्ट नियम आहे. राज्यपाल म्हणून काम करणारी व्यक्ती ही राज्य सरकारच्या कक्षेत येणाऱ्या सर्व विद्यापीठांची कुलपती म्हणून कार्यरत असते. महात्मा गांधी ग्लोबल पीस फाऊंडेशननं थेट राजभवनात कार्यक्रम घेत बोगस डॉक्टरेट वाटप केल्यानं प्रश्न उपस्थित होत आहेत.

अधिकाऱ्यांवर करण्याची मागणी

राजभवनासारख्या ठिकाणी बोगस डॉक्टरेट प्रदान करण्याचा कार्यक्रम आयोजित करण्यासाठी परवानगी देणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी देखील जोर धरु लागली आहे.

डॉक्टरेट स्वीकारताना गणवेश ही आणला

8 नोव्हेंबर 2021 ला झालेल्या कार्यक्रमाचे काही फोटोज सोशल मीडियावर उपलब्ध आहेत. कोरोना योद्धा सन्मान सोहळ्यानंतर डॉक्टरेट वाटप आणि प्रदान करताना पदवी स्वीकारताना जो ड्रेस परिधान केला जातो आणि हॅट घातली जाते ती देखील परिधान करण्यात आल्याचं दिसून आलं आहे. संबंधित फोटोमध्ये काही पोलीस अधिकारी देखील असल्याचं समोर आलं आहे.

पंतप्रधान कार्यालयाकडे तक्रार

महात्मा गांधी ग्लोबल पीस फाऊंडेशनसंदर्भात यापूर्वी अनेक प्रकार समोर आले आहेत. या संस्स्थेबद्दल पंतप्रधान कार्यालयाकडे 2020 मध्ये तक्रार करण्यात आली आहे.

इतर बातम्या:

AAP Punjab RS Nominations: कोण आहेत संदीप पाठक ज्यांना आपचे ‘अमित शाह’ म्हटलं जातं, ज्यांना केजरीवालांनी राज्यसभेवर पाठवलं?

Parth pawar | पार्थ पवारांसाठी राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्याची शिवसेनेकडे विशेष मागणी ; सोशल मीडियापोस्ट व्हायरल

Non Stop LIVE Update
मोदींमुळे मालवण, तारकर्लीला कुणाला जाता येणार नाही? काय आहे नेमक कारण?
मोदींमुळे मालवण, तारकर्लीला कुणाला जाता येणार नाही? काय आहे नेमक कारण?.
'तो' माणूस नालायक, त्याला सत्तेवर..; ठाकरेंचा मुख्यमंत्र्यांवर निशाणा
'तो' माणूस नालायक, त्याला सत्तेवर..; ठाकरेंचा मुख्यमंत्र्यांवर निशाणा.
...म्हणून नारायण राणेंचा भाजपमध्ये प्रवेश, ठाकरे गटाच्या नेत्याचा दावा
...म्हणून नारायण राणेंचा भाजपमध्ये प्रवेश, ठाकरे गटाच्या नेत्याचा दावा.
हीच संस्कृती का? सुप्रिया सुळेंचा शिक्षणमंत्र्यांच्या वर्तवणुकीवर सवाल
हीच संस्कृती का? सुप्रिया सुळेंचा शिक्षणमंत्र्यांच्या वर्तवणुकीवर सवाल.
धाक आहे की नाही? मराठी पाट्यांच्या मुद्द्यावरून राज ठाकरे पुन्हा भडकले
धाक आहे की नाही? मराठी पाट्यांच्या मुद्द्यावरून राज ठाकरे पुन्हा भडकले.
नाशिक जिल्ह्यात अवकाळीचा हाहाकार; नागली, उडीद, भुईमूग पीकाला फटका
नाशिक जिल्ह्यात अवकाळीचा हाहाकार; नागली, उडीद, भुईमूग पीकाला फटका.
बळीराजा हतबल, केळीबागांसह आठ एकरावरील पीकं उद्धवस्त झाल्यानं हवालदिल
बळीराजा हतबल, केळीबागांसह आठ एकरावरील पीकं उद्धवस्त झाल्यानं हवालदिल.
6 डिसेंबरनंतर देशात काहीही होऊ शकतं, प्रकाश आंबेडकर यांचा दावा काय?
6 डिसेंबरनंतर देशात काहीही होऊ शकतं, प्रकाश आंबेडकर यांचा दावा काय?.
माझ्यामुळे छगन भुजबळ जेल बाहेर पण.., प्रकाश आंबेडकरांचा मोठा दावा काय?
माझ्यामुळे छगन भुजबळ जेल बाहेर पण.., प्रकाश आंबेडकरांचा मोठा दावा काय?.
...पर्यंत सरकार कसं पडेल? तुम्ही ताटाखालचं मांजर, राऊतांचा रोख कुणावर?
...पर्यंत सरकार कसं पडेल? तुम्ही ताटाखालचं मांजर, राऊतांचा रोख कुणावर?.