गोठा वाटतोय की काय? याला शाळा म्हणायचं!! इथं उंट, गाई, म्हशी, डबकं सगळंच दिसेल… मालेगाव मनपानं किती छान काळजी घेतलीय पहा…

| Updated on: Jun 13, 2022 | 4:25 PM

मालेगाव येथील केवळ एकाच शाळेची अशी दुरवस्था झालेली नाही. तर इतर शाळादेखील विविध समस्यांच्या विळख्यात सापडल्या आहेत. अनेक शाळेची तर तुटलेली दारे फरच्यांची दुरवस्था, भिंतींना तडे यासह इतर समस्या निर्माण झालेल्या आहेत.

गोठा वाटतोय की काय? याला शाळा म्हणायचं!! इथं उंट, गाई, म्हशी, डबकं सगळंच दिसेल... मालेगाव मनपानं किती छान काळजी घेतलीय पहा...
Image Credit source: tv9 marathi
Follow us on

नाशिक (मालेगाव) : खासगी शाळांमध्ये (Private Schools) शिक्षण घेणं गोरगरीब आणि मध्यमवर्गीयांसाठी आवाक्याबाहेर होत आहे. त्यामुळे अनेक पालक सध्या महालिकेच्या शाळांकडे वळतायत. पण राज्यातील काही मनपांच्या शाळांचं चित्र पाहून तुम्हीही थक्क व्हाल. 15 जूनपासून शाळा सुरु होणार म्हटल्यावर मालेगाव मनपा शाळेतील (Malegaon School) शिक्षक दोन दिवस आधी साफसफाईसाठी शाळेत पोहोचले. पण शाळेचं हे चित्र पाहून त्यांना धक्काच बसला. इथली जनावरं पाहून ही शाळा आहे की गोठा, असाच प्रश्न पडतोय. मालेगाव शहरातील ही प्राथमिक शाळा आहे. पालिका प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे शाळेचं रूपांतर थेट गोठ्यात झाले आहे.

शाळेच्या आवारात उंटही बांधलाय

नाशिक जिल्हा व मालेगाव शहरात 15 जून पासून शाळा सुरू होणार आहेत. शाळा सुरू होण्याच्या अगोदर मनपा शाळेचे शिक्षक साफफाईसाठी साठी शाळेत पोहचली मालेगाव मनपाच्या अनेक शाळांची अवस्था बघून शिक्षकही अवाक झालेत.

हे सुद्धा वाचा

उद्यानंतर विद्यार्थी शाळेत येणार आहेत, त्यांना बसायला जागा नाही, शाळेची दुरवस्था झाली आहे तर काही ठिकाणी शाळेत आणि शाळेच्या आवारात गुरे बांधली आहेत. विशेष म्हणजे एका शाळेच्या आवारात उंट देखील बांधलेला आहे. मनपाच्या शाळांची अशी दयनीय अवस्था बघून अशा शाळांमध्ये गरीब विद्यार्थी कसे शिक्षण घेत असतील याचा विचार करायला लावणारी बोलकी परिस्थिती समोर आली आहे.

तुटलेली दारं, भगदाड पडलेल्या भिंती

मालेगाव येथील केवळ एकाच शाळेची अशी दुरवस्था झालेली नाही. तर इतर शाळादेखील विविध समस्यांच्या विळख्यात सापडल्या आहेत. अनेक शाळेची तर तुटलेली दारे फरच्यांची दुरवस्था, भिंतींना तडे यासह इतर समस्या निर्माण झालेल्या आहेत.

पालकांचा संताप

मालेगाव येथील शाळांची अशी दुरवस्था पाहून पालक आणि शिक्षकांचा प्रचंड संताप झाला आहे. महापालिका प्रशासनानं शाळांकडे केलेलं  दुर्लक्ष संतापदायक असल्याची प्रतिक्रिया त्यांनी दिली आहे. तसेच शाळांच्या या स्थितीसाठी जबाबदार असलेल्यांवर कारवाईची मागणीही करण्यात आली आहे.