मुंबईतील शाळांना दिवाळीची सुट्टी जाहीर, शिक्षक भारतीच्या प्रयत्नांना यश

दिवाळी तोंडावर आली तरी दिवाळीची सुट्टी जाहीर झाली नाही, त्यामुळे मुख्याध्यापक, शिक्षक, विद्यार्थी आणि पालक यांच्यामध्ये संभ्रमाचे वातावरण होते. दिवाळीचा निश्चित कालावधी किती? त्यात सुट्टी नेमकी किती दिवस? असे अनेक प्रश्न होते.

मुंबईतील शाळांना दिवाळीची सुट्टी जाहीर, शिक्षक भारतीच्या प्रयत्नांना यश
मुंबई महापालिका
| Edited By: | Updated on: Oct 25, 2021 | 7:05 PM

मुंबई: मुंबईतील शाळांना 1 नोव्हेंबर ते 20 नोव्हेंबरपर्यंत दिवाळीची सुट्टी जाहीर झाल्याचे परिपत्रकं आज शिक्षण उत्तर, पश्चिम आणि दक्षिण विभागाच्या शिक्षण निरीक्षकांनी जारी केली आहेत. शिक्षण भारतीचे कार्याध्यक्ष सुभाष मोरे यांनी दिलेल्या पत्रानंतर मुंबईचे शिक्षण उपसंचालक यांनी तिन्ही शिक्षण निरीक्षकांना दिवाळी सुट्टीबाबत स्पष्ट सूचना दिल्या होत्या.

शिक्षक भारतीच्या प्रयत्नांना यश

दिवाळी तोंडावर आली तरी दिवाळीची सुट्टी जाहीर झाली नाही, त्यामुळे मुख्याध्यापक, शिक्षक, विद्यार्थी आणि पालक यांच्यामध्ये संभ्रमाचे वातावरण होते. दिवाळीचा निश्चित कालावधी किती? त्यात सुट्टी नेमकी किती दिवस? असे अनेक प्रश्न होते. त्यामुळे शिक्षक भारतीचे कार्याध्यक्ष सुभाष मोरे यांनी 21 ऑक्टोबर रोजी मुंबईचे शिक्षण उपसंचालक यांना याबाबत पत्र लिहलं होतं. शिक्षण उपसंचालक यांनी आज सकाळीच याबाबत उत्तर, पश्चिम, दक्षिण तिन्ही शिक्षण निरीक्षकांना सुट्टीचा कालावधी जाहीर करण्याबाबत स्पष्ट सूचना दिल्या होत्या त्यानुसार आता सुट्टी जाहीर आहे.

दिवाळीनंतर सरसकट शाळा सुरु होणार

महाराष्ट्रात कमी झालेली कोरोना विषाणू रुग्णसंख्या पाहता राज्य सरकार दिवाळीनंतर राज्यात सरसकट शाळा सुरु करण्याच्या तयारीत असल्याची शक्यता आहे. राज्याच्या शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी 22 ऑक्टोबरला शाळा सुरु करण्यासंदर्भात जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांची ऑनलाईन बैठक घेतली होती. त्याबैठकीत राज्यातील शाळा सरसकट सुरु करण्यासंदर्भात चर्चा झाली होती. शिक्षण विभागातील अधिकाऱ्यांनी शाळा सुरु करण्याच्या प्रस्तावाला ग्रीन सिग्नल दिला होता.

पहिली ते चौथीचे वर्ग कधी सुरु होणार?

कोरोना विषाणू संसर्ग सुरु झाल्यानंतर शाळा बंद होत्या. राज्य सरकारनं टप्प्याटप्यानं शाळा सुरु केल्या आहेत.महाराष्ट्रातील कोरोनाचं संकट दूर होताना दिसत आहे. यापार्श्वभूमीवर पहिली ते चौथीचे वर्ग सुरु करण्यासंदर्भात प्रयत्न केलं जात आहेत. राज्य मंत्रिमंडळ आणि टास्क फोर्सची चर्चा करुन यासंदर्भात अंतिम निर्णय घेतला जाणार आहे. दिवाळीनंतर सरसकट शाळा सुरु होण्याची शक्यता आहे.

इतर बातम्या:

Maharashtra School Reopen : राज्यात सरसकट शाळा सुरु करण्याच्या हालचाली, पहिली ते चौथीचे वर्ग सुरु होणार ?

Maharashtra School Reopen: स्कूल चले हम..!, सिंधुदुर्ग रत्नागिरी ते पिंपरीत शाळांमध्ये उत्साहाचं वातावरण, विद्यार्थ्यांचं औक्षण करुन स्वागत

Mumbai Education Director declare Diwali Holidays began from 1 to 20 November