
NEET PG Scorecard 2021 नवी दिल्ली: नॅशनल बोर्ड ऑफ एक्झामिनेशनकडून नीट पीजी परीक्षेचा (NEET PG 2021) चा निकाल 28 सप्टेंबरला जाहीर करण्यात आला होता. आता 9 ऑक्टोबरला नीट पीजी परीक्षेचं स्कोअर कार्ड जारी केलं जाणार आहे. नीट पीजी परीक्षा दिलेले विद्यार्थी स्कोअरकार्ड अधिकृत वेबसाईट nbe.edu.in वर पाहू शकतात. नीट पीजी परीक्षेचा निकाल गुणवत्ता यादीच्या स्वरूपात जाहीर केला जातो. नीटी पीजी परीक्षा यावर्षी 11 सप्टेंबर 2021 रोजी देशभरातील 260 पेक्षा जास्त शहरांमध्ये आणि 800 परीक्षा केंद्रांवर घेण्यात आली. सर्व प्रवर्गांसाठी कट ऑफ देखील निकालासह जाहीर करण्यात आलं आहे.
स्टेप 1: विद्यार्थ्यांनी प्रथम अधिकृत वेबसाईट nbe.edu.in ला भेट द्यावी.
स्टेप 2: वेबसाईटवर दिलेल्या निकालाच्या लिंकवर क्लिक करा.
स्टेप 3: परीक्षा रोलनंबर आणि इतर माहिती नोंदवा
स्टेप 4: तुमचा निकाल स्क्रीनवर दिसेल.
स्टेप 5: निकालाची प्रत डाऊनलोड करु ठेवा
NEET PG 2021 परीक्षा मेडिकलमध्ये मास्टर्स करण्याची इच्छा असेल, अशा विद्यार्थ्यांसाठी आयोजित केली जाते. या परीक्षेत MBBS आणि BDS चे विद्यार्थी सहभागी होऊ शकतात. मात्र,त्या विद्यार्थ्यांनी इटर्नशिप पूर्ण केल्याचं प्रमाणपत्र त्यांच्याकडे असणं आवश्यक आहे. MBBS हा पदवी आणि MD पदव्युत्तर अभ्यासक्रम आहे. ही परीक्षा देशातील 6,102 सरकारी, खासगी, अभिमत आणि केंद्रीय विद्यापीठांमधील प्रवेशांसाठी आयोजित केली जाणार आहे.
कट ऑफ मार्क्स
| प्रवर्गा | पात्रता पर्सेंटाईल गुण | 800 पैकी कट ऑफ |
|---|---|---|
| खुला | 50 पर्सेंटाईल गुण | 302 |
| एसी, एसटी, ओबीसी, दिव्यांग | 40 पर्सेंटाईल गुण | 265 |
| दिव्यांग (खुला) | 45 पर्सेंटाईल गुण | 283 |
NEET PG Result 2021 परीक्षा निकाल 28 सप्टेंबरला जाहीर झाला आहे. यंदा हुगळीतील विद्यार्थी अमर्त्य सेनगुप्तानं अखिल भारतीय मेडिकल प्रवेश परीक्षामध्ये पहिलं स्थान मिळवलं आहे. अमर्त्य सेनगुप्ताला 800 पैकी 714 गुण मिळाले आहेत. अधिका माहितीसाठी विद्यार्थ्यांनी नीट परीक्षेच्या वेबसाईटला भेट द्यावी.
इतर बातम्या:
NEET 2021 : नीट परीक्षेसाठी दोन टप्प्यांत करा रजिस्ट्रेशन; जाणून घ्या नवे बदल
NEET 2021 Scorecard will be declared on 9th october Rank check details at official website of NBE