NEET UG 2026 : एक छोटीसी चूक अन्…थेट बाहेरचा रस्ता, परीक्षा केंद्रावर जाण्यापूर्वी जाणून घ्या ते ‘गोल्डन रूल्स’
NEET UG 2026 Exam : नीट युजी परीक्षा थोड्याच वेळात सुरू होत आहे. अनेकांनी परीक्षा केंद्राबाहेर गर्दी केली असेल. तुम्ही कदाचित एखाद्या केंद्राच्या जवळपास असाल. पण जर ही एक चूक केली तर काही जणांना या परीक्षेला बसता येणार नाही.

NEET UG 2026 Exam : राष्ट्रीय चाचणी संस्थेकडून (NTA) आज NEET युजी परीक्षेचे आयोजन करण्यात आले आहे. परीक्षा आज दुपारी 2 वाजेपासून ते संध्याकाळी 5 वाजे दरम्यान होईल. या परीक्षेसाठी उमेदवारांना परीक्षा केंद्रावर सकाळी 11 ते 1:30 वाजेदरम्यान हजर व्हायचे आहे. त्यानंतर मात्र त्यांना परीक्षा केंद्रावर प्रवेश मिळणार नाही. त्यामुळे अनेक जणांनी कालपासूनच परीक्षा केंद्रावर लवकर पोहचण्याची तजवीज केली आहे. दरम्यान NTA ने या परीक्षेसाठी काही मार्गदर्शक सूचना आणि नियम स्पष्ट केले आहे. हे नियम जर पाळले नाही तर परीक्षा केंद्रावरूनच उमेदवाराला बाहेर पाठवले जाईल.
कोणते कपडे असावे?
परीक्षेत कॉपी अथवा इतर गैरप्रकार घडू नये यासाठी नॅशल टेस्टिंग एजन्सीने अनेक हायटेक उपाय योजना केल्या आहेत. ड्रेस कोडविषयी अधिक कडक भूमिका घेतली आहे. युवक आणि युवतीसाठी अर्धी बाही असलेले कपडे घालून येण्यास परवानगी देण्यात आली आहे. संपूर्ण हात झाकलेले शर्ट अथवा टी-शर्ट घालून आलेल्या उमेदवाराला परीक्षेला बसू देण्यात येणार नाही. उमेदवारांना पायात बुट, शूज घालण्याची परवानगी नाही. जे उमेदवार धार्मिक कारणाने पोषाख करतात, त्यात हिजाब आणि पगडी घालणाऱ्या उमेदवारांना परीक्षा केंद्रावर वेळेच्या आधी पोहचावे लागेल.
परीक्षार्थींकडे काय असावे?
Exam Centre वर प्रवेशपत्र घेऊन जाणे अत्यावश्यक आहे. त्यावर परीक्षार्थ्याचा फोटो असणे आवश्यक आहे. तर हजेरी बुकवर चिकटवण्यासाठी एक पासपोर्ट साईज फोटो असणे आवश्यक आहे. एडमिड कार्डसोबत डाऊनलोड केलेला एक प्रोफार्मावर एक ओळखपत्र असणे आवश्यक आहे.
अकोला जिल्ह्यात आज 18 केंद्रांवर ‘नीट’ची परीक्षा
राष्ट्रीय परीक्षा एजन्सीकडून घेण्यात येणारी नीट-2026 परीक्षा आज अकोला जिल्ह्यातील 18 केंद्रांवर पार पडणार आहे. अकोला, बार्शीटाकळी, मूर्तिजापूर आणि पातूर येथे परीक्षा केंद्रांची व्यवस्था करण्यात आली असून प्रशासनाने तयारी पूर्ण केली आहे. वाढत्या उष्णतेच्या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांसाठी बायोमेट्रिक केंद्रांवर सावली, पालकांसाठी बसण्याची व्यवस्था आणि उष्माघात कक्षही तयार करण्यात आले आहेत. सुरक्षेच्या दृष्टीने सर्व केंद्रांवर कडक बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.
लातूर जिल्ह्यातल्या 34 परीक्षा केंद्रांवर आज नीट परीक्षा घेण्यात येणार आहे. 34 परीक्षा केंद्रांवर 16 हजार 300 विद्यार्थी ही नीट ची परीक्षा देणार आहेत. प्रशासनाने या परीक्षा सुरळीत व्हाव्यात यासाठी तयारी केलेली आहे. दुपारी 02 ते 05 यावेळेत या परीक्षा घेण्यात येणार आहेत.
बारावीच्या निकालाला उशीर लागल्याचा फटका?
महाराष्ट्रात दोन तारखेला बारावीच्या परीक्षेचा निकाल लागला आहे आणि आज 3 तारखेला देशभरातील विद्यार्थ्यांसाठी असणारी नीटची एक्झाम आहे. या परीक्षेची तारीख किमान चार सहा महिने आधी जाहीर होते देशभरातील सर्व राज्यांचे निकाल आधी लागले तर महाराष्ट्रातील निकालाला इतका उशीर का लागला आज निकाल उद्या परीक्षा यामध्ये विद्यार्थ्यांचे नुकसान झालं तर त्याची जबाबदारी कोणाची शिक्षण मंत्री दादा भुसे, उच्च शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील या प्रश्नांची उत्तरे देतील का ? असा सवाल शिवसेना नेत्या सुषमा अंधारे यांनी विचारला आहे.