AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Devendra Fadnavis: त्याला यमसदनी… नरसापूर प्रकरणात फडणवीसांचे मोठे आश्वासन…आंदोलनात असामाजिक तत्व? मुख्यमंत्र्यांचा थेट निशाणा

CM Devendra Fadnavis: भोर तालुक्यातील नरसापूर येथील आरोपी भीमराव कांबळे याला ताब्यात द्या, त्याला फाशी द्या यासाठी मोठे आंदोलन करण्यात आले. त्यानंतर आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मोठे आश्वासन दिले आहे.

Devendra Fadnavis: त्याला यमसदनी... नरसापूर प्रकरणात फडणवीसांचे मोठे आश्वासन...आंदोलनात असामाजिक तत्व? मुख्यमंत्र्यांचा थेट निशाणा
नरसापूर प्रकरण, देवेंद्र फडणवीसImage Credit source: टीव्ही ९ मराठी
| Updated on: May 03, 2026 | 12:20 PM
Share

CM Devendra Fadnavis: पुणे जिल्ह्यातील भोर तालुक्यामधील नरसापूर येथे साडेतीन वर्षांच्या चिमुरडीवर अत्याचार करून तिच्या हत्येने समाजमन हादरले. देशभरात या घटनेचे पडसाद उमटले. विशेषतः पुणे जिल्ह्यात संतापाची लाट उसळली. पुणे-बंगळुरू महामार्ग आंदोलकांनी जाम केला होता. याप्रकरणी आंदोलकांची समजूत काढण्यात आली. तर पोलिसांनी बळाचा वापर केल्याचा आरोपही करण्यात आला. याप्रकरणी समाजमन संतप्त आहे. आज भोर तालुक्यात कडकडीत बंद पाळण्यात आला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याप्रकरणी मोठे वक्तव्य केले आहे. त्यांनी या आंदोलनात काही असामाजिक तत्व घुसल्याचा नाव न घेता आरोप केला आहे.

त्याला यमसदनी पाठवणार

“मी काल स्वतः पीडितेच्या वडिलांशी दोनदा बोललो. मी हे त्यांना समजावून सांगितले की आपल्याला नराधमाला मृत्यूदंडाची शिक्षा करायची आहे. त्याकरिता वेळेत दोषारोपपत्र दाखल करणं आणि केस चालणं याकरिता हायकोर्टाच्या माध्यमातून सर्व गोष्टीला फास्टट्रॅकवर नेत आहोत. रेकॉर्डवेळेत सर्व कामं करण्याचा आमचा प्रयत्न आहे. आपल्या सर्वांनाच असे वाटते की अशा नराधमाला भर चौकात फाशी दिली पाहिजे. पण असं लोकशाहीत करता येत नाही. लोकशाही कायद्याने चालते.पण कोणाला कायद्याचा दुरुपयोग करता येऊ नये. यादृष्टीने कोणाताही लूपहोल न ठेवता त्याला यमसदनी कसं पाठवायचं, त्याला मृत्यूदंडाची शिक्षा कशी होईल,याचा संपूर्ण प्रयत्न राज्य सरकार करेल. न्यायालयातही हे प्रकरण वेगानं मार्गी लावण्याचा प्रयत्न करण्यात येईल. याविषयीचे पत्रही आम्ही पीडितेच्या कुटुंबाला दिलेले आहे.” असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले.

याही परिस्थितीत काहींचा फायदा घेण्याचा प्रयत्न

घटना गंभीर आहे, रोषही साहजिक आहे. नागरिकांचा रोष असणं चुकीचं नाही. पण काही लोकं हे त्याही परिस्थितीचा फायदा घेऊन काही वेगळ्या पद्धतीचे वळण लावण्याचा प्रयत्न करत होते. मी मुलीच्या वडिलांचे आभार मानतो. त्यांनी ती परिस्थिती समजून घेतली. सीपींशी चर्चा केल्यानंतर त्यांनी हा निर्णय घेतला. दुर्दैवाने काही लोक हे त्यांनाही जाऊ देत नव्हते. त्यांनाही अडवण्याचा प्रयत्न करत होते. ते लोक कोण आहेत हे लक्षात आले आहेत. मुलीच्या वडिलांनी जी भूमिका घेतली, त्याबद्दल आम्ही आभारी आहोत. पीडितेच्या कुटुंबाच्या पाठीशी राज्य सरकार ठामपणे उभे आहे, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले.

Follow Us
फक्त 10 मिनिटांच्या पावसाने कल्याण-नगर महामार्ग जलमय! वाहतूक कोंडीने..
Kalyan Nagar Highway | Rain | फक्त 10 मिनिटांच्या पावसाने कल्याण-नगर महामार्ग जलमय! वाहतूक कोंडीने प्रवाशांचे हाल
दुष्काळसदृश परिस्थितीवर मोठी घोषणा, 5 तारखेपासून पिकांच्या नुकसानीच्या
Eknath Shinde : दुष्काळसदृश परिस्थितीवर मोठी घोषणा, 5 तारखेपासून पिकांच्या नुकसानीच्या पंचनाम्यांसाठी प्रशासनाला तयारीचे आदेश
मराठमोळ्या गोंधळ सिनेमाची ऑस्कर 2027 साठी भारताकडून अधिकृत निवड
Oscar2027 | मराठी सिनेमाची जगभरात दणदणीत एन्ट्री! गोंधळची ऑस्कर 2027 साठी भारताकडून अधिकृत निवड
आदित्य ठाकरेंना अटक करा, दिशा सालियन प्रकरणावर राणेंची थेट मागणी
Nitesh Rane | आदित्य ठाकरेंना अटक करा, चौकशी करा...दिशा सालियन प्रकरणावर नितेश राणेंची थेट मागणी; उद्धव ठाकरेंच्या आरोपांनाही  दिलं प्रत्युत्तर
ममता बॅनर्जींच्या गटाला फुटबॉल, ऋतब्रत गटाला लिफाफा...
TMC | ममता बॅनर्जींच्या गटाला फुटबॉल, ऋतब्रत गटाला लिफाफा! तृणमूल काँग्रेसच्या दोन गटांना निवडणूक आयोगाकडून नवी नावं-नवी चिन्हं जाहीर
Maharashtra Education | महाराष्ट्रात येणार 7 परदेशी विद्यापीठांचे, कॅम
Maharashtra Education | महाराष्ट्रात येणार 7 परदेशी विद्यापीठांचे, कॅम्पस फडणवीस म्हणाले...
ठाकरे सेनेचे आमदार सुनील प्रभू यांच्या गाडीची पादचाऱ्याला धडक
Sunil Prabhu | ठाकरे सेनेचे आमदार सुनील प्रभू यांच्या गाडीची पादचाऱ्याला धडक; 1 जण जखमी
सरकार 100 टक्के शेतकऱ्यांच्या पाठिशी! रवींद्र चव्हाणांचं मोठं आश्वासन
Ravindra Chavan | सरकार 100 टक्के शेतकऱ्यांच्या पाठिशी! रवींद्र चव्हाणांचं मोठं आश्वासन; मराठवाडा-विदर्भातील पावसाच्या स्थितीवर दिली महत्त्वाची माहिती, म्हणाले...
खेळता खेळता कारमध्ये शिरला, दरवाजा बंद झाला अन्...
Yavatmal | खेळता खेळता कारमध्ये शिरला, दरवाजा बंद झाला अन्..; 4 वर्षाच्या चिमुकल्याचं आयुष्य संपलं
तृणमूल काँग्रेसला मोठा धक्का! निवडणूक आयोगाने पक्षाचं नाव अन्...
TMC : तृणमूल काँग्रेसला मोठा धक्का! निवडणूक आयोगाने पक्षाचं नाव चिन्हच गोठवलं