AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Bhor Crime: संताप, आक्रोश, हंबरडा…पुण्यात चिमुरडीची अत्याचार करून हत्या, आतापर्यंत घडलं काय?

Pune Bhor Narasapur Crime: नरसापूर येथील साडेतीन वर्षांच्या चिमुरडीवर अत्याचार करून तिची हत्या करण्यात आली. त्यामुळे परवापासून लोकांचा संताप उसळला. काल ही या संतापाची धग थेट पुण्यापर्यंत पोहचली. संतप्त नागरिकांनी आरोपीला ताब्यात देण्याची मागणी केली.

Bhor Crime: संताप, आक्रोश, हंबरडा...पुण्यात चिमुरडीची अत्याचार करून हत्या, आतापर्यंत घडलं काय?
संताप, आक्रोश, हंबरडाImage Credit source: टीव्ही ९ मराठी
| Updated on: May 03, 2026 | 10:30 AM
Share

Pune Bhor Narasapur Crime: पुण्यातील भोर तालुक्यातील नरसापूर येथे साडेतीन वर्षाच्या चिमुरडीवर अत्याचार करून तिची हत्या करण्यात आली. परवा ग्रामस्थांनी आरोपीला फाशी द्यावी, त्याला ताब्यात द्यावे या मागणीसाठी बेंगळुरू-पुणे महामार्ग रोखून धरला होता. तर काल आंदोलनाची धग पुण्यापर्यंत पोहचली. त्यातच पोलिसांनी पीडितेच्या वडिलांची कॉलर धरली आणि सौम्य लाठीचार्च केल्याने वातावरण तापले. पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. त्याला न्यायालयासमोर दाखल करण्यात आले. त्याला 7 मे पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.

आमिष दाखवून नेले गोठ्यात  

65 वर्षीय आरोपी हा मजूरी करतो. त्याच्याविरोधात विनयभंगाचे गुन्हे दाखल आहेत. आरोपीने मुलीला जेवणाचे आमिष दाखवून गोठ्यात नेले. तिथे तिच्यावर अत्याचार केले. त्यानंतर तिची हत्या केली आणि शेणाखाली तिचा मृतदेह लपवला. 4 वाजले तरी मुलगी न आढळून आल्याने तिचा शोध सुरू झाला. नातेवाईकांनी घराशेजारील एक सीसीटीव्ही तपासला असता. त्यात आरोपी तिला घेऊन जाताना दिसला. आरोपी एका फाट्यावर असल्याचे समोर आले. गावकऱ्यांनी त्याच्याकडे चौकशी केल्यावर त्याने मृतदेह लपवल्याची जागा दाखवली. पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले. त्याच्याविरोधात भारतीय दंड संहिता आणि लैंगिक गुन्ह्यांपासून मुलांचे संरक्षण (पॉक्सो) कायद्याच्या संबंधित तरतुदींनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मुंबई-बेंगळुरू महामार्ग जॅम

या घटनेनंतर संतापाची लाट उसळली. पुणे जिल्ह्यातील नागरिकांनी या गावाकडे धाव घेतली. पोलिस ठाण्याला घेराव घातला. आरोपीला ताब्यात द्या. त्याला फाशी द्या म्हणून मुंबई-बेंगळुरू महामार्गावर ठिय्या आंदोलन केले. साडेचार तासाहून अधिक काळ आंदोलन करण्यात आले. पोलिसांवर दबाव वाढला. पोलिसांनी चर्चेतून मार्ग काढण्याचा प्रयत्न केला. पण नागरिक ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हते. त्यानंतर पोलिसांनी बळाचा वापर करत नातेवाईक आणि आंदोलनकर्त्यांना बाजूला केले आणि हा महामार्ग मोकळा केला. आंदोलनाची धग थेट पुण्यापर्यंत पोहचली.

पुण्याचे ग्रामीण पोलीस अधिक्षक संदीप गिल यांनी लोकांना आश्वासन दिले की आरोपीविरोधात 15 दिवसांच्या आत दोषारोपपत्र दाखल करण्यात येईल. याप्रकरणी आरोपीविरोधात फास्टट्रॅक कोर्टात खटला चालवण्यात येणार आहे. आरोपी हा गुन्हेगारी वृत्तीचा असून 1998 आणि 2015 मध्ये त्याच्याविरोधात विनयभंग आणि लैंगिक शोषणाचा गुन्हा दाखल करण्यात आला. आरोपी हा मजूर असून तो गावाच्या आसपास राहायचा.

भोरमध्ये कडकडीत बंद

नरसापूर येथील या घटनेच्या निषेधार्थ आज भोरमध्ये कडकडीत बंदचे आवाहन केले आहे. सकाळपासूनच व्यावसायिकांनी घटनेच्या निषेधार्थ दुकानं बंद ठेवली आहे. आरोपीला तातडीने कडक शासन करण्याची मागणी जोर धरत आहे. तर आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणीही आता काहीजण करत आहे. पोलिसांवर सर्वच बाजूने दबाव वाढला आहे.

Follow Us
फक्त 10 मिनिटांच्या पावसाने कल्याण-नगर महामार्ग जलमय! वाहतूक कोंडीने..
Kalyan Nagar Highway | Rain | फक्त 10 मिनिटांच्या पावसाने कल्याण-नगर महामार्ग जलमय! वाहतूक कोंडीने प्रवाशांचे हाल
दुष्काळसदृश परिस्थितीवर मोठी घोषणा, 5 तारखेपासून पिकांच्या नुकसानीच्या
Eknath Shinde : दुष्काळसदृश परिस्थितीवर मोठी घोषणा, 5 तारखेपासून पिकांच्या नुकसानीच्या पंचनाम्यांसाठी प्रशासनाला तयारीचे आदेश
मराठमोळ्या गोंधळ सिनेमाची ऑस्कर 2027 साठी भारताकडून अधिकृत निवड
Oscar2027 | मराठी सिनेमाची जगभरात दणदणीत एन्ट्री! गोंधळची ऑस्कर 2027 साठी भारताकडून अधिकृत निवड
आदित्य ठाकरेंना अटक करा, दिशा सालियन प्रकरणावर राणेंची थेट मागणी
Nitesh Rane | आदित्य ठाकरेंना अटक करा, चौकशी करा...दिशा सालियन प्रकरणावर नितेश राणेंची थेट मागणी; उद्धव ठाकरेंच्या आरोपांनाही  दिलं प्रत्युत्तर
ममता बॅनर्जींच्या गटाला फुटबॉल, ऋतब्रत गटाला लिफाफा...
TMC | ममता बॅनर्जींच्या गटाला फुटबॉल, ऋतब्रत गटाला लिफाफा! तृणमूल काँग्रेसच्या दोन गटांना निवडणूक आयोगाकडून नवी नावं-नवी चिन्हं जाहीर
Maharashtra Education | महाराष्ट्रात येणार 7 परदेशी विद्यापीठांचे, कॅम
Maharashtra Education | महाराष्ट्रात येणार 7 परदेशी विद्यापीठांचे, कॅम्पस फडणवीस म्हणाले...
ठाकरे सेनेचे आमदार सुनील प्रभू यांच्या गाडीची पादचाऱ्याला धडक
Sunil Prabhu | ठाकरे सेनेचे आमदार सुनील प्रभू यांच्या गाडीची पादचाऱ्याला धडक; 1 जण जखमी
सरकार 100 टक्के शेतकऱ्यांच्या पाठिशी! रवींद्र चव्हाणांचं मोठं आश्वासन
Ravindra Chavan | सरकार 100 टक्के शेतकऱ्यांच्या पाठिशी! रवींद्र चव्हाणांचं मोठं आश्वासन; मराठवाडा-विदर्भातील पावसाच्या स्थितीवर दिली महत्त्वाची माहिती, म्हणाले...
खेळता खेळता कारमध्ये शिरला, दरवाजा बंद झाला अन्...
Yavatmal | खेळता खेळता कारमध्ये शिरला, दरवाजा बंद झाला अन्..; 4 वर्षाच्या चिमुकल्याचं आयुष्य संपलं
तृणमूल काँग्रेसला मोठा धक्का! निवडणूक आयोगाने पक्षाचं नाव अन्...
TMC : तृणमूल काँग्रेसला मोठा धक्का! निवडणूक आयोगाने पक्षाचं नाव चिन्हच गोठवलं