AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Nashik IT Company: मैत्री, शीरखूर्मा आणि नशीले औषधं…टीसीएस लैंगिक अत्याचाराप्रकरणात सर्वात धक्कादायक खुलासा

Nashik IT Company Molestation Case: टीसीएस कंपनीतील कॉर्पोरेट लैंगिक शोषणाच्या घटनेने राज्यातच नाही देशात मोठा हादरा बसला. या प्रकरणातील महिला कर्मचारी निदा खान हिला दणका बसला. तिचा अटकपूर्व जामीन फेटाळला गेला. तर अजून एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

Nashik IT Company: मैत्री, शीरखूर्मा आणि नशीले औषधं...टीसीएस लैंगिक अत्याचाराप्रकरणात सर्वात धक्कादायक खुलासा
नाशिक टीसीएस लैंगिक अत्याचार प्रकरणImage Credit source: एजन्सी
| Updated on: May 03, 2026 | 9:30 AM
Share

Nashik IT Company Molestation Case: टीसीएस कंपनीतील एका विशिष्ट धार्मिक गटाकडून महिलांचे लैंगिक शोषण आणि धर्मांतरणाच्या प्रकरणाने देश हादरला. टीसीएस सारख्या बहुराष्ट्रीय मानांकित कंपनीतील याप्रकाराविरोधात हिंदुत्ववादी संघटना आक्रमक झाल्या. प्रकरणातील एक फरार आरोपी निदा खान ही अजूनही यंत्रणांना गुंगारा देत आहे. तिचा अटकपूर्व जामीन फेटाळून न्यायालयाने दणका दिला. याप्रकरणातील चार आरोपींना चार दिवसांची पोलीस कोठडी सुनाववली. या प्रकरणातील आरोपींचे दिल्ली बॉम्बस्फोटातील दहशतवाद्यांशी कनेक्शन असल्याचे समोर येत असतानाच अजून एक धक्कादायक खुलासा समोर आला आहे.

मैत्री, शीरखूर्मा आणि नशेचा पदार्थ

नाशिक येथील टीसीएस प्रकरणात पीडितांना गुंगीकरकर औषध दिल्याचा दाट संशय यंत्रणांना आहे. त्या अनुषंगाने तपास सुरू आहे. प्राथमिक माहितीनुसार, शीरखुर्मासारख्या गोड पदार्थातून या पीडितांना आरोपींनी नशेचा पदार्थ दिल्याचा संशय व्यक्त होत आहे. मैत्री झाल्यानंतर या महिलांना शीरखूर्मा देण्यात आला. त्यात नशेचे पदार्थ असल्याचा दावा करण्यात येत आहे. या खुलाशाने आता खळबळ उडाली आहे.

लैंगिक शोषण करण्यासाठी पीडितांना नशेचा पदार्थ दिला जात असल्याचा आरोप करण्यात येत आहे. लैंगिक शोषण करण्यासाठी पीडित महिलांना कामूक करण्यासाठी या पद्धतीचा वापर केला जात होता. पीडित महिलांना मादक पदार्थ खाऊ घालतं लैंगिक अत्याचार केल्याचा संशय आहे. नाशिक पोलीस आता या अँगलने तपास करत आहेत.

चार आरोपींना 5 मे पर्यंत पोलीस कोठडी

याप्रकरणातील चार आरोपींना आरोपींना 5 मे पर्यंत पोलीस कोठडी देण्यात आली आहे. या कोठडीत मांसाहारासह गुंगीकारक आणि मादक पदार्थ सेवन करण्यासाठी दिल्याचा पोलीस तपास करणार आहेत. या कोठडीत आरोपी काय कबुलीजबाब देतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. आरोपी कंपनीच्या कॅन्टीनमध्ये हिंदू देवी-देवतांबद्दल आक्षेपार्हय वक्तव्य करत असत. तर कंपनीच्या ग्रुपवर अश्लिल शेरेबाजी करत असल्याचे चॅटिंगमधून समोर आले आहे. इतकेच नाही तर कंपनीकडून विशेष धार्मिक सूट मिळाल्याचा गैरफायदाही त्यांनी घेतल्याचे धर्मांतरणाच्या प्रयत्नातून समोर आले आहे.

टीसीएस प्रकरणातील आरोपी

निदा खान (अजूनही फरार, काल अटकपूर्व जामीन फेटाळला)

दानिश एजाज शेख

तौसीफ बिलाल अत्तार

रझा रफीक मेमन

शाहरूख हुसेन शौकत कुरेशी

शफी शेख

आसिफ अन्सारी

अश्विनी चैनानी

Follow Us
सह्याद्रीवर धुक्याची चादर, दऱ्याखोऱ्यात धबधबे; ‘मिसिंग लिंक’चं हे...
सह्याद्रीवर धुक्याची चादर, दऱ्याखोऱ्यात धबधबे; ‘मिसिंग लिंक’चं हे दृश्य पाहाच!
संजय राऊतांवर अमृता फडणवीस संतापल्या, थेट म्हणाल्या राऊतांसारखं....
संजय राऊतांवर अमृता फडणवीस संतापल्या, थेट म्हणाल्या राऊतांसारखं बरळण्यापेक्षा...
डॉ. डी. वाय. पाटील यांना अखेरचा निरोप, शासकीय इतमामात अंत्यसंस्कार
डॉ. डी. वाय. पाटील यांना अखेरचा निरोप, शासकीय इतमामात अंत्यसंस्कार
शिवसेना चिन्हाबाबतच्या सुनावणीनंतर शिंदे गटाकडून पहिली प्रतिक्रिया...
शिवसेना चिन्हाबाबतच्या सुनावणीनंतर शिंदे गटाकडून पहिली प्रतिक्रिया समोर, एका वाक्यातच...
मोठी बातमी! पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा व्हिडीओ Delete केल्याप्रकरणी
मोठी बातमी! पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा व्हिडीओ Delete केल्याप्रकरणी अखेर Metaने मागितली माफी, पहा व्हिडीओ
वाल्मिक कराड पुन्हा चर्चेत, राष्ट्रवादीतील बड्या नेत्याच्या ट्वीटने खळ
Walmik Karad | वाल्मिक कराड पुन्हा चर्चेत, राष्ट्रवादीतील बड्या नेत्याच्या ट्वीटने खळबळ
शिवसेना कुणाची? कपिल सिब्बलांचा जोरदार युक्तिवाद; शिंदे गट अडचणीत?
शिवसेना कुणाची? कपिल सिब्बलांचा जोरदार युक्तिवाद; शिंदे गट अडचणीत? सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडलं?
शिंदे गटाचे सर्व आमदार अपात्र ठरणार?; सुनावणीनंतर राऊतांचा मोठा दावा
Sanjay Raut On SC Hearing | शिंदे गटाचे सर्व आमदार अपात्र ठरणार?; सुनावणीनंतर संजय राऊतांचा मोठा दावा
शिवसेना कुणाची? जोरदार युक्तावादनंतर आजची सुनावणी संपली, कोर्टात...
शिवसेना कुणाची? जोरदार युक्तावादनंतर आजची सुनावणी संपली, कोर्टात नेमकं काय घडलं?
कुणबी प्रमाणपत्र अवैध, मराठा समाजाच्या... छत्रपती संभाजीनगरातून...
Kunbi Certficate | कुणबी प्रमाणपत्र अवैध, मराठा समाजाच्या... छत्रपती संभाजीनगरातून मोठी अपडेट समोर!