success story : गर्लफ्रेंड सोडून गेली, तिला चॅलेंज केले होते आणि अखेर IAS होऊन दाखवले

हा काळ त्याच्यासाठी खूपच कठीण काळ होता. ब्रेकअप झाल्याने टेन्शन आले होते. गर्लफ्रेंडला त्याने चॅलेंज केले होते. आयएएस होऊन दाखविणारच..

success story : गर्लफ्रेंड सोडून गेली, तिला चॅलेंज केले होते आणि अखेर IAS होऊन दाखवले
aaditya pande
Image Credit source: socialmedia
| Updated on: Jul 01, 2023 | 5:32 PM

दिल्ली : आदित्य त्याच्या तीन बहीणी आणि एका भावात घरात सर्वात लहान असल्यामुळे अत्यंत लाडाकोडात वाढलेला होता. तो लहानपणी खूपच खोडकर होता. त्यामुळे त्याच्या शिक्षकांनी त्याच्या पालकांना वैतागून सांगितले होते की जर हा मुलगा पुढे शिकला तर आपण स्वत: मिशा काढून टाकू…आठवी आणि नववीला त्याने अभ्यास एकदम मनावर घेताला आणि पहिला नंबर काढला. परंतू दहावीला तो एका मुलीच्या प्रेमात पडला आणि त्याचा नंबर खाली घसरला. त्यानंतरही त्याने इंजिनिअरिंग ( Engineering ) आणि एमबीए ( MBA ) केले. गर्लफ्रेंडला वचन दिले होते की आयएएस ( IAS ) होणारच आणि त्याने ते चॅलेंज अखेर पूर्ण केले.

देशातील सर्वात कठीण मानली जाणारी युपीएससीची परीक्षा दोनदा फेल झाल्यानंतर मनात थोडी भीती होती. शेजारी पाजारी आणि नातलग टोमणे मारीत होते. परंतू त्यांच्याकडे अजिबात लक्ष न देता. आपण दररोज सहा ते आठ तास अभ्यासाचा शिरस्ता सोडला नाही. अत्यंत साध्या घरातून पुढे आलेला आदित्य पांडे आपली यशोगाथा सांगत होता. कोरोनाकाळात कमी मार्क पडल्याने दोन प्रयत्न वाया गेले. वडीलांना अत्यंत नालायक मुलावर विश्वास दाखविला. त्यामुळे मी त्यांचे आभार मानतो असे भावूक होत आदित्य पांडे यांनी सांगताना त्याचे डोळे भरुन आले.

वडीलांच्या इच्छेखातर इंजिनिअरिंग केले

बिहारच्या पाटणातील विष्णुपुर पाकरीत एका छोट्या घरात राहणारा आदित्य याने कनकरबाग येथून केंद्रीय विद्यालयातून बारावीपर्यंत शिक्षण घेतले. आधी गुजरातच्या जाम नगरात राहायला बहिणीकडे गेलेला आदित्य नंतर पुन्हा पाटणाला परतला. त्याने पंजाबमधून इलेक्ट्रॉनिक एण्ड कम्युनिकेशनमधून ग्रॅज्यूएशन पूर्ण केले. इंजिनियरींंगमध्ये रस नसल्याने साल 2018 मध्ये त्याने आयआयटी, रुकरी येथून एमबीएची डीग्री घेतली. नंतर आयसीआयसीआय बॅंकेत 16 महिने नोकरी केली. त्यानंतर नोकरीचा राजीनामा देऊन अभ्यासाला लागलो. जानेवारी 2020 पासून फिलोसॉफी हा ऑप्शनल सबजेक्ट घेऊन युपीएससीची तयारी सुरु केली.

गर्लफ्रेंडला त्याने चॅलेंज केले

साल 2021 आणि 2022 दोन्ही वेळा आदित्य याला अपयश आले होते. हा काळ त्याच्यासाठी खूपच कठीण काळ होता. ब्रेकअप झाल्याने टेन्शन आले होते. गर्लफ्रेंडला त्याने चॅलेंज केले होते. आयएएस होऊन दाखविणारच… तरीही आदित्य याला काही अंदाज नव्हता की त्याला ही परीक्षा क्लीअर करायला इतका वेळ लागेल. दोन प्रयत्नात अपयश आल्याने थोडे टेन्शन आले. स्वत:वर अविश्वास वाटू लागला. शेजारी- पाजारी टोमणे मारु लागले. परंतू त्याला म्हणणे होते की संकल्प का कोई विकल्प होता नही. त्याने प्लान बी ठेवलाच नव्हता. तिसऱ्या प्रयत्नात युपीएससी त्याला ऑल इंडीया रॅंकमध्ये 48 वा क्रमांक मिळाला.