परीक्षार्थी व परीक्षेचे काम पाहणाऱ्यांना लोकल ट्रेनने प्रवासाची परवागनी द्या, ठाकरे सरकारचे रेल्वेला पत्र

| Updated on: Oct 30, 2021 | 4:22 PM

सक्षम प्रधीकाराच्या वतीने आयोजित कोणत्याही परीक्षेसाठी परीक्षार्थी तसेच परीक्षा घेण्याच्या कामासाठी प्रतिनियुक्तीवर असलेले अधिकारी आणि कर्मचारी यांना लोकल रेल्वेने एका दिवसासाठी प्रवास करण्याची मुभा द्यावी, असे पत्र राज्य शासनातर्फे रेल्वे विभागाला देण्यात आले आहे.

परीक्षार्थी व परीक्षेचे काम पाहणाऱ्यांना लोकल ट्रेनने प्रवासाची परवागनी द्या, ठाकरे सरकारचे रेल्वेला पत्र
CM Uddhav Thackeray
Follow us on

मुंबई : सक्षम प्रधीकाराच्या वतीने आयोजित कोणत्याही परीक्षेसाठी परीक्षार्थी तसेच परीक्षा घेण्याच्या कामासाठी प्रतिनियुक्तीवर असलेले अधिकारी आणि कर्मचारी यांना लोकल रेल्वेने एका दिवसासाठी प्रवास करण्याची मुभा द्यावी, असे पत्र राज्य शासनातर्फे रेल्वे विभागाला देण्यात आले आहे. राज्य सरकारच्यावतीनं देण्यात आलेल्या पत्रावर रेल्वे प्रशासन काय भूमिका घेणार हे पाहावं लागणार आहे.

कोणत्याही परीक्षेत सहभागी होणारे तसेच परीक्षेचं काम पाहण्याची जबाबदारी देण्यात आलेल्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना सार्वत्रिक (युनिवर्सल) पास ऐवजी एका दिवसाच्या प्रवासासाठी तिकीट देण्यात यावे. आवश्यक असल्यास परीक्षा प्रवेश पत्र (हॉल तिकीट), कर्मचाऱ्यांचे ओळख पत्र (आयडी कार्ड) तसेच परीक्षेसाठी व्यक्तिगत किंवा एजन्सीला देण्यात आलेले प्रतिनियुक्ती पत्र याची तपासणी करून तिकीट देण्यात यावे, अशी विनंती  राज्य सरकारच्यावतीनं करण्यात आली आहे.

महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट ब संयुक्त पूर्व परीक्षेची जाहिरात प्रसिद्ध

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून विविध परीक्षांच्या जाहिराती जाहीर केल्या जात आहेत. एमपीएससीनं नुकतीच महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट ब संयुक्त पूर्व परीक्षा 2021 ची 666 पदांची जाहिरात जारी केली आहे. याद्वारे पोलीस उपनिरिक्षक 376, राज्य कर निरीक्षक 190 आणि सहायक कक्ष अधिकारी पदासाठी भरती प्रक्रिया राबवली जाईल.

पूर्व परीक्षा कधी होणार?

महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट-ब संयुक्त पूर्व परीक्षा 2021 द्वारे भरावयाच्या एकूण 666 पदांसाठी आयोगाच्या संकेतस्थळावर जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. सदर परीक्षा दिनांक 26 फेब्रुवारी, 2022 रोजी आयोजित करण्यात येईल.सामान्य प्रशासन विभागाकडील सहायक कक्ष अधिकारी पदाच्या 100 जागांवर, तर वित्त विभागाच्या राज्य कर निरीक्षक पदाची 190 आणि गृह विभागाच्या 376 पदांसाठी पूर्व परीक्षा आयोजित केली जाईल. महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट-ब संयुक्त पूर्व परीक्षा 2021 साठी अर्ज दाखल करण्यास सुरुवात 29 ऑक्टोबर दुपारी 2 वाजल्यापासून होणार आहे. अर्ज दाखल करण्याचा अंतिम दिनांक 19 नोव्हेंबर आहे. खुल्या प्रवर्गातील उमेदवारांसाठी परीक्षा शुल्क 544 तर मागासवर्गीय उमेदावारंसाठी 344 रुपये शुल्क आकारण्यात येणार आहे. हे शुल्क ऑनलाईन ऑफलाईन पद्धतीनं भरता येईल.

इतर बातम्या:

तयारीला लागा ! 2022 मधील स्पर्धा परीक्षांचं वेळापत्रक नोव्हेंबर महिन्यात, परिपत्रक काढून MPSCची माहिती

Breaking : अखेर MPSC कडून महाराष्ट्र अभियांत्रिकी सेवा 2019 पदांचा मुलाखत कार्यक्रम जाहीर

Thackeray Government wrote letter to Railway to gave permission to students and teacher for exam work