AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

तयारीला लागा ! 2022 मधील स्पर्धा परीक्षांचं वेळापत्रक नोव्हेंबर महिन्यात, परिपत्रक काढून MPSCची माहिती

MPSC Exam Time Table | मागणीपत्र प्राप्त झाल्यास येत्या ऑक्टोबर, नोव्हेंबर महिन्यात पुढील वर्षाचं संभाव्य वेळापत्रक एमपीएससी जाहीर करणार आहे. तसेच प्रलंबित निकाल 30 सप्टेंबरपर्यंत पूर्ण करण्याचंदेखील नियोजन एमपीएससीकडून आखलं जात आहे.

तयारीला लागा ! 2022 मधील स्पर्धा परीक्षांचं वेळापत्रक नोव्हेंबर महिन्यात, परिपत्रक काढून MPSCची माहिती
| Edited By: | Updated on: Sep 24, 2021 | 12:03 AM
Share

मुंबई : राज्य सरकारमधील विविध विभागातील रिक्त पदांची माहिती 30 सप्टेंबरपूर्वी एमपीएससी आयोगाला देण्याच्या आदेशानंतर आता एमपीएससी अॅक्शन मोडवर आले आहे. मागणीपत्र प्राप्त झाल्यास  येत्या नोव्हेंबर महिन्यात पुढील वर्षी घेण्यात येणाऱ्या स्पर्धा परीक्षांचं संभाव्य वेळापत्रक एमपीएससी जाहीर करणार आहे. तसेच प्रलंबित निकाल 30 सप्टेंबरपर्यंत पूर्ण करण्याचंदेखील नियोजन एमपीएससीकडून आखलं जात आहे. परिपत्रक जारी करत एमपीएसी आयोगाने तशी माहिती दिली आहे. (MPSC commission will publish time table of next year exam on october month of this year)

ऑक्टोबर महिन्यात पुढील वर्षाचं वेळापत्रक 

राज्याचे उपमुख्यंत्री अजित पवार आज मुंबईमध्ये बोलत होते. यावेळी त्यांनी राज्याच्या वेगवेगळ्या विभागातील रिक्त पदांची माहिती 30 सप्टेंबरपूर्वी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडं द्यावी, अशा सूचना विभागांना देण्यात आल्याचं सांगितलं होतं. सरकारच्या या आदेशानंतर आता महाराष्ट्र लोकसेवा आयोगदेखील कामाला लागला आहे. एमपीएसीकडून ऑक्टोबर महिन्यात पुढील वर्षाचं वेळापत्रक जाहीर करण्यात येणार आहे. तसेच प्रलंबित निकालदेखील 30 सप्टेंबरपर्यंत पूर्ण करण्याचे एमपीएससीचे नियोजन आहे. विशेष म्हणजे एमपीएससीने परिपत्रक काढत ही माहिती दिली आहे.

MPSC TIME TABLE

MPSC TIME TABLE

30 सप्टेंबरपूर्वी MPSC ला माहिती द्या

अजित पवार यांनी वेगवेगळ्या रिक्त जागा भरण्यासंदर्भात आज मुंबई सविस्तर भाष्य केलं. “मुख्यमंत्र्यांनी सांगितलेलं आहे. वेगवेगळ्या विभागाच्या जागा भरायच्या आहेत. त्या जागांची माहिती MPSC ला कळवायची आहे. 30 सप्टेंबरपर्यंत सर्व विभागांना सांगितलं आहे. जागांची माहिती द्या, अशा सूचना दिल्या आहेत. 30 सप्टेंबरपर्यंत जागा येतील. आरक्षण आणि इतर नियमांचं पालन करुन याद्या द्याव्यात अशा सूचना देण्यात आल्या आहेत. विभागांकडून याद्या आल्यानंतर महाराष्ट्र लोकसेवा आयोगाला माहिती दिली जाईल. त्यानंतर महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे जाहिराती प्रसिद्ध केली जाईल, असं अजित पवार म्हणाले होते.

कोल्हापूरला डिसेंबरमध्ये सैन्य भरती

तसेच कोल्हापूरला डिसेंबरमध्ये सैनिक भरती असल्याचेही अजित पवार यांनी सांगितले होते. सैन्य भरतीसंदर्भात प्रशासनाला आदेश दिले आहेत, नियमावलीची अडचण न येता, भरती कशी होईल याचं नियोजन पोलिसांनी करावं, अशा सूचना दिल्या आहेत. राज्यात सैनिकांची भरती असेल तिथे मुलींना संधी मिळावी, असं अजित पवार म्हणाले होते.

इतर बातम्या :

ज्यांच्यासोबत आयुष्यभर काम केलं, त्यांच्याकडेच लाच मागितली, नाशकात दोन क्लर्क एसीबीच्या जाळ्यात

आयकर विभागाचं धाडसत्र सुरुच; चव्हाण, देसाई, शिंदे, आव्हाडांच्या निकटवर्तीयांवर छापा!

Municipal Election 2022 : तीन सदस्यीय प्रभाग पद्धत; पुणे, पिंपरी-चिंचवडमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस बॅकफूटवर!

(MPSC commission will publish time table of next year exam on october month of this year)

Follow Us
मतदारांची नावे वगळल्याचा आरोप; ठाकरे बंधूंचा 4 ऑक्टोबरला निवडणूक...
मतदारांची नावे वगळल्याचा आरोप; ठाकरे बंधूंचा 4 ऑक्टोबरला निवडणूक आयोगाविरोधात मोर्चा
SIR प्रक्रियेवर निवडणूक आयोगाचा खुलासा; ‘सर्व निर्णय सहमतीने...
SIR प्रक्रियेवर निवडणूक आयोगाचा खुलासा; सर्व निर्णयांबाबत दिलं स्पष्टीकरण, महाराष्ट्रात...
अधिकारी फिरकलेच नाहीत; शेतकऱ्याचा थेट कृषिमंत्र्यांना फोन, म्हणाले...
अधिकारी फिरकलेच नाहीत; शेतकऱ्याचा थेट कृषिमंत्र्यांना फोन, म्हणाले...
पुण्यातील 10 चौकात 104.5 डेसिबल ध्वनी पातळीची नोंद; बापट म्हणाले...
पुण्यातील लक्ष्मी रोडवरील प्रमुख 10 चौकात 104.5 डेसिबल ध्वनी पातळीची नोंद, बापट म्हणाले...
28 पदकांसह भारताची शानदार कामगिरी; नेमबाजी ठरली सर्वाधिक पदकांची मानकर
28 पदकांसह भारताची शानदार कामगिरी; नेमबाजी ठरली सर्वाधिक पदकांची मानकरी
75 कोटींच्या सोन्याची तस्करी उघड; DRI ची मोठी कारवाई, 11 जण अटकेत
75 कोटींच्या सोन्याची तस्करी उघड; DRI ची मोठी कारवाई, 11 जण अटकेत
इंद्रावती नदीने धोक्याची पातळी ओलांडली; छत्तीसगडमध्ये महापुराचा कहर
इंद्रावती नदीने धोक्याची पातळी ओलांडली; छत्तीसगडमध्ये महापुराचा कहर
मराठा आंदोलनातून धक्कादायक दावा; ललित तारख यांचा जरांगेंवर गंभीर...
मराठा आंदोलनातून धक्कादायक दावा; ललित तारख यांचा जरांगेंवर गंभीर आरोप
जनतेची माफी मागा; एकनाथ शिंदेंचा राहुल गांधी आणि इंडिया आघाडीवर...
जनतेची माफी मागा; एकनाथ शिंदेंचा राहुल गांधी आणि इंडिया आघाडीवर हल्लाबोल
लोकलमधून तरुणी थेट रेल्वे ट्रॅकवर पडली; प्रसंगावधानामुळे जीव वाचला
Kalyan : लोकलमधून तरुणी थेट रेल्वे ट्रॅकवर पडली; पोलिसांनी क्षणाचाही विलंब न करता धाव घेतली, प्रसंगावधानामुळे जीव वाचला