MPSC चा धडाका सुरुच, महाराष्ट्र दुय्यम सेवा परीक्षेची घोषणा, PSI, कक्ष अधिकारी, कर निरीक्षकच्या 666 पदांसाठी जाहिरात

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून विविध परीक्षांच्या जाहिराती जाहीर केल्या जात आहेत. एमपीएससीनं आज महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट ब संयुक्त पूर्व परीक्षा 2021 ची 666 पदांची जाहिरात जारी केली आहे.

MPSC चा धडाका सुरुच, महाराष्ट्र दुय्यम सेवा परीक्षेची घोषणा,  PSI, कक्ष अधिकारी, कर निरीक्षकच्या 666 पदांसाठी जाहिरात
MPSC EXAM
Follow us
| Updated on: Oct 28, 2021 | 12:38 PM

मुंबई: महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून विविध परीक्षांच्या जाहिराती जाहीर केल्या जात आहेत. एमपीएससीनं आज महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट ब संयुक्त पूर्व परीक्षा 2021 ची 666 पदांची जाहिरात जारी केली आहे. याद्वारे पोलीस उपनिरिक्षक 376, राज्य कर निरीक्षक 190 आणि सहायक कक्ष अधिकारी पदासाठी भरती प्रक्रिया राबवली जाईल.

पूर्व परीक्षा कधी होणार?

महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट-ब संयुक्त पूर्व परीक्षा 2021 द्वारे भरावयाच्या एकूण 666 पदांसाठी आयोगाच्या संकेतस्थळावर जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. सदर परीक्षा दिनांक 26 फेब्रुवारी, 2022 रोजी आयोजित करण्यात येईल

पदांचा तपशील

सामान्य प्रशासन विभागाकडील सहायक कक्ष अधिकारी पदाच्या 100 जागांवर, तर वित्त विभागाच्या राज्य कर निरीक्षक पदाची 190 आणि गृह विभागाच्या 376 पदांसाठी पूर्व परीक्षा आयोजित केली जाईल.

महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट-ब संयुक्त पूर्व परीक्षा 2021 साठी अर्ज दाखल करण्यास सुरुवात 29 ऑक्टोबर दुपारी 2 वाजल्यापासून होणार आहे. अर्ज दाखल करण्याचा अंतिम दिनांक 19 नोव्हेंबर आहे. खुल्या प्रवर्गातील उमेदवारांसाठी परीक्षा शुल्क 544 तर मागासवर्गीय उमेदावारंसाठी 344 रुपये शुल्क आकारण्यात येणार आहे. हे शुल्क ऑनलाईन ऑफलाईन पद्धतीनं भरता येईल.

पात्रता

भारत सरकारनं मान्यता दिलेल्या विद्यापीठातून पदवी उत्तीर्ण असणं आवश्यक आहे. याशिवाय पदवीच्या अंतिम वर्षाच्या परीक्षेला बसलेले उमदेवार देखील अर्ज दाखल करु शकतात. मात्र, मुख्य परीक्षेपूर्वी त्यांनी उत्तीर्ण होणं आवश्यक आहे. तर, पोलीस उपनिरीक्षक पदासाठी पुरुष उमेदवाराची उंची 165 सेमी तर महिला उमेदवारची उंची 157 सेमी असणं आवश्यक आहे. तर पुरुष उमेदवारांना किमान 5 सेमी छाती फुगवता आली पाहिजे.

इतर बातम्या:

तयारीला लागा ! 2022 मधील स्पर्धा परीक्षांचं वेळापत्रक नोव्हेंबर महिन्यात, परिपत्रक काढून MPSCची माहिती

Breaking : अखेर MPSC कडून महाराष्ट्र अभियांत्रिकी सेवा 2019 पदांचा मुलाखत कार्यक्रम जाहीर

MPSC Declared advertisement for Maharashtra Secondary Service Combined pre exam 2021

Non Stop LIVE Update
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान.
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका.
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर.