AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

BMC Election Result 2026 : मुंबईत ठाकरेंचा बुरूज ढासळताच भाजपाची पहिली मोठी प्रतिक्रिया; दरेकर म्हणाले…

BMC Election Result 2026 : संपूर्ण देशाचे लक्ष लागलेल्या सर्वात श्रीमंत महानगरपालिका निवडणुकीचा निकाल समोर येण्यास सुरुवात झाली आहे. मुंबईत भाजप आणि शिंदे गटाच्या शिवसेनाला चांगले यश मिळत आहे. दरम्यान, भाजप नेते प्रविण दरेकर यांनी दिलेली प्रतिक्रिया सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे.

BMC Election Result 2026 : मुंबईत ठाकरेंचा बुरूज ढासळताच भाजपाची पहिली मोठी प्रतिक्रिया; दरेकर म्हणाले...
देवेंद्र फडणवीसImage Credit source: Tv9 Network
| Updated on: Jan 16, 2026 | 1:36 PM
Share

राज्यातील 29 महानगरपालिकांसाठी काल, 15 जानेवारी रोजी मतदान झाले. त्यानंतर आज सकाळी आठ वाजल्यापासून मतमोजणीस सुरुवात झाली आहे. देशातील सर्वात श्रीमंत महापालिका असणाऱ्या मुंबई महापालिकेजच्या निकालाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. मुंबईतील 227 जागांपैकी 127 जागांवार भाजप आणि शिवसेनेची आघाडी पाहायला मिळत आहे. भाजपाची जवळपास 96 जागांवर आघाडी पाहायला मिळत आहे. हा निकाल पाहिल्यानंतर भाजप नेते प्रविण दरेकर यांनी दिलेल्या प्रतिक्रियेने सर्वांचे लक्ष वेधले आहे.

काय म्हणाले प्रविण दरेकर?

Live

Municipal Election 2026

01:41 PM

Maharashtra Election Results 2026 : छत्रपती संभाजीनगरमध्ये एकनाथ शिंदेंना सर्वात मोठा झटका...

01:25 PM

Maharashtra Municipal Election Results 2026 : भाजपाचा गड गेला, मोठी खळबळ...

01:11 PM

Mumbai Election Results Live 2026 : वॉर्ड क्रमांक 166, 73 चा निकाल काय?

01:06 PM

Mumbai Election Results Live 2026 : वॉर्ड क्रमांक 147, चारचा निकाल काय?

01:29 PM

Pune Election Results 2026 : पुण्यात भाजपच ठरतोय सरस, राष्ट्रवादीलाही मोठा फटका

01:21 PM

Solapur Election Results 2026 : सोलापूरमध्ये प्रभाग 24 चा निकाल समोर, कोण जिंकलं ?

भाजप नेते प्रविण दरेकर यांनी नुकताच माध्यमांशी संवाद साधत मुंबई महानगरपालिका निवडणुकीवर प्रतिक्रिया दिली. ‘मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा कोणी दिला? तर नरेंद्र मोदी साहेबांनी. देवाभाऊंनी (मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस) यांनी पाठपुरवठा केला. मराठी माणसे मुंबईतून बाहेर गेली. कुणाच्या राज्यात गेली? तुमच्या राज्यात गेली? बिडीडीमध्ये घरं कुणी दिली? देवाभाऊनी दिली, एकनाथ राव शिंदे यांनी दिली’ असे प्रविण दरेकर म्हणाले.

विरोधकांवर साझला निशाणा

पुढे प्रविण दरेकर म्हणाले की, बिडीडी असेल, अभिद्या नगर असेल, आज त्याठिकाणी आदर्श नगर असेल सगळीकडे आम्ही मुंबईतला मराठी माणूस मुंबईत राहावा म्हणून प्रयत्न करतोय. ज्यांनी त्या ठिकाणी आयुष्यभर मराठी माणसांच्या नावावर दुकान सुरु केले होते. बाळासाहेबांच्या हिंदुत्वाचा विचार, विकासाची भूमिका शिंदे साहेंबांसोबत आली. आता यांचं दुकान बंद झालेलं आहे.

काय आहे आकडेवारी?

समोर आलेली आकडेवारी पाहाता भारतीय जनता पक्ष (भाजप) आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना गट एकत्रितपणे 129 जागांवर आघाडीवर आहेत. यामध्ये भाजप 98 जागांवर आघाडीवर आहे तर एकनाथ शिंदे यांची शिवसेना 31 जागांवर आघाडीवर आहे. यामुळे मुंबईतील स्थानिक राजकारणात महायुतीची ताकद स्पष्टपणे दिसून येत आहे. दुसरीकडे, उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना (ठाकरे गट) 62 जागांवर आघाडीवर असून, महायुतीच्या तुलनेत पिछाडीवर आहे. मनसे 9 जागांवर आघाडीवर आहे, काँग्रेसची 13 जागा आघाडीवर आहे. तर, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे (अजित पवार गट) 2 जागेवर आघाडीवर असल्याचे समोर आले आहे.

प्रविण दरेकर यांच्या भावाचा विजय

महानगरपालिका निवडणुकीत प्रविण दरेकर यांच्या भावाने बाजी मारली आहे. प्रकाश दरेकर हे मुंबई प्रभाग 3मधून निवडणूक लढत होते. त्यांचा विजय झाल्याचे समोर आले आहे. त्यांनी रोशनी गायकवाड यांचा पराभव केला आहे.

डॅडी ते सदा सरवणकर अन् मलिक... मुंबईत दिग्गजांना जोर का धक्का
डॅडी ते सदा सरवणकर अन् मलिक... मुंबईत दिग्गजांना जोर का धक्का.
सोलापूरात प्रभाग क्रमांक 8 मधून भाजपचे चारही उमेदवार विजयी
सोलापूरात प्रभाग क्रमांक 8 मधून भाजपचे चारही उमेदवार विजयी.
शरद पवारांची साथ सोडणारे प्रशांत जगताप जिंकले की हरले? मोठी अपडेट समोर
शरद पवारांची साथ सोडणारे प्रशांत जगताप जिंकले की हरले? मोठी अपडेट समोर.
राज्यात भाजपची लहर कायम! 29 पैकी 26 महापालिकांमध्ये भाजपची आघाडी
राज्यात भाजपची लहर कायम! 29 पैकी 26 महापालिकांमध्ये भाजपची आघाडी.
इचलकरंजीत कलांमध्ये भाजपनं बहुमताचा आकडा गाठला!
इचलकरंजीत कलांमध्ये भाजपनं बहुमताचा आकडा गाठला!.
'तेजस्वी' विजय, एकाकी झुंज तरीही जिंकली, घोसाळकरांनी कोणाला दिल श्रेय?
'तेजस्वी' विजय, एकाकी झुंज तरीही जिंकली, घोसाळकरांनी कोणाला दिल श्रेय?.
मुंबईत अटीतटीचा सामना! शिंदे गटाच्या अश्विनी माटेकर आघाडीवर
मुंबईत अटीतटीचा सामना! शिंदे गटाच्या अश्विनी माटेकर आघाडीवर.
पिंपरीमधून विलास लांडेंचे पुतणे पिछाडीवर! काय आहेत सध्याचे निकाल?
पिंपरीमधून विलास लांडेंचे पुतणे पिछाडीवर! काय आहेत सध्याचे निकाल?.
मुंबईच्या प्रभाग क्र. 164 मध्ये शैला लांडे यांचा दणदणीत विजय
मुंबईच्या प्रभाग क्र. 164 मध्ये शैला लांडे यांचा दणदणीत विजय.
मुंबईत ठाकरेंच्या शिवसेनेचे मिलिंद वैद्य विजयी
मुंबईत ठाकरेंच्या शिवसेनेचे मिलिंद वैद्य विजयी.