अजित पवारांच्या पक्षाला ‘या’ मतदारसंघात घड्याळ चिन्ह मिळणार नाही, मोठी अपडेट

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या गटाच्या एका उमेदवाराला घड्याळ चिन्हावर लोकसभा निवडणूक लढवता येणार नाही, अशी महत्त्वाची माहिती समोर आली आहे. संबंधित उमेदवाराला दुसऱ्या चिन्हावर निवडणूक लढवावी लागणार असल्याची माहिती मिळत आहे. संबंधित वृत्त समोर आल्यानंतर अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. नेमकं प्रकरण काय आहे? ते आपण सविस्तर जाणून घेऊयात.

अजित पवारांच्या पक्षाला 'या' मतदारसंघात घड्याळ चिन्ह मिळणार नाही, मोठी अपडेट
अजित पवार
Follow us
| Updated on: Mar 28, 2024 | 6:57 PM

महाराष्ट्राच्या राजकारणात गेल्या काही महिन्यांमध्ये प्रचंड राजकीय घडामोडी घडल्या. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातही फूट पडली. केंद्रीय निवडणूक आयोगाने उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या गटाला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं नाव आणि चिन्ह दिलं. असं असलं तरी एक महत्त्वाची अपडेट समोर येत आहे. अजित पवार यांच्या गटाच्या उमेदवाराला त्यांच्याच पक्षाचं घड्याळ चिन्ह मिळणार नाही, अशी माहिती समोर येत आहे. पण ही बातमी महाराष्ट्र आणि नागालँडच्या राष्ट्रवादीच्या उमेदवारांबाबत नाही. तर लक्ष्यद्वीपमधील राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवाराबाबत आहे. अजित पवारांच्या पक्षाला लोकसभा निवडणुकीसाठी एका मतदारसंघात घड्याळ चिन्ह मिळणार नाही. अजित पवार यांच्या गटाच्या उमेदवाराला लक्षद्वीपमधील लोकसभा निवडणुकीसाठी घड्याळ चिन्ह वापरता येणार नाही. तसेच अजित पवार गटाला महाराष्ट्र आणि नागालँडमध्ये चिन्ह वापरायला तूर्तास परवानगी मिळाली आहे.

लोकसभा निवडणुकीचं पहिल्या टप्प्यातील मतदान आता जवळ येत आहे. येत्या 19 एप्रिलला देशभरात लोकसभा निवडणुकीचं पहिल्या टप्प्यातील मतदान पार पडणार आहे. लक्षद्वीपमध्ये पाहिल्या टप्प्यात मतदान होणार आहे. या ठिकाणी राष्ट्रवादी अजित पवार गटाकडून निवडणुकीच्या रणांगणात उमेदवार उतरवण्यात आलाय. पण लक्षद्वीपमध्ये अजित पवार यांच्या पक्षाचे उमेदवार युसूफ टी पी यांना दुसऱ्या चिन्हावर निवडणूक लढवावी लागणार आहे.

अजित पवार यांच्या पक्षाला दुसऱ्या टप्प्यापासून सातव्या टप्प्यापर्यंतच्या मतदान प्रक्रियेत घड्याळ चिन्ह देशभरात वापरता येणार आहे. पण पहिल्या टप्प्यात वापरता येणार नाही. महाराष्ट्र आणि नागालँडमध्ये घड्याळ चिन्ह राष्ट्रवादी काँग्रेसकडे आहे. त्यामुळे तिथल्या निवडणुकीत घड्याळ चिन्ह अजित पवार यांच्या पक्षाला मिळणारच आहे. तसेच 2024 सार्वत्रिक निवडणुकांत अजित पवार यांच्या प्रत्येक उमेदवाराला घड्याळावर लढता यावे, यासाठी त्यांनी अर्ज केला होता.

हे सुद्धा वाचा

राष्ट्रवादीच्या उमेदवाराला लक्ष्यद्वीपमध्ये घड्याळ चिन्ह का मिळणार नाही?

चिन्ह आदेश परिच्छेद 10 नुसार निवडणुकांची अधिसूचना निघाल्यानंतर जास्तीत जास्त तिसऱ्या दिवशी कॉमन चिन्हाचा अर्ज ग्राह्य धरला जातो. अजित पवार गटाने 24 मार्च रोजी अर्ज केला आणि पहिल्या टप्प्यातील निवडणुकीची अधिसूचना 20 मार्चला निघाली. एक दिवस उशीर झाल्याने आता पहिल्या टप्प्यात अजित पवारांना घड्याळ मिळणार नाही. लक्षद्वीप पहिल्या टप्प्यात निवडणुका होत असल्याने तिथे घड्याळ चिन्ह मिळणार नाही. इतर सर्व ठिकाणी अजित पवार गटाला घड्याळ चिन्ह मिळेल.

Non Stop LIVE Update
सभा नरेंद्र मोदींची पण सर्वात जास्त चर्चा तर 'या' व्यक्तीची, पाहा कोण?
सभा नरेंद्र मोदींची पण सर्वात जास्त चर्चा तर 'या' व्यक्तीची, पाहा कोण?.
भोरमधील सभेत अजित पवारांकडून सुप्रिया सुळेंची नक्कल, म्हणाले...
भोरमधील सभेत अजित पवारांकडून सुप्रिया सुळेंची नक्कल, म्हणाले....
मोरा सारखे नाचणारे मित्र पाहिले पण... मोर नाचताना तुम्ही पाहिलं का?
मोरा सारखे नाचणारे मित्र पाहिले पण... मोर नाचताना तुम्ही पाहिलं का?.
राजीनाम्यानंतर नसीम खान एमआयएम, वंचित की महायुतीत जाणार?
राजीनाम्यानंतर नसीम खान एमआयएम, वंचित की महायुतीत जाणार?.
कांदा निर्यातीबाबत सरकारचे दुटप्पी धोरण, शेतकऱ्यांचा संताप
कांदा निर्यातीबाबत सरकारचे दुटप्पी धोरण, शेतकऱ्यांचा संताप.
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट.
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि...
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि....
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण.
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा.
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?.