असं काय घडलं की मुख्यमंत्र्यांना स्वत:च्या मुलाची उमेदवारी जाहीर करता आली नाही?

'गली बॉय' चित्रपटातलं 'कोई मुझको ये बताये क्यूँ ये दूरी और मजबुरी' हे गाणं आपण ऐकलं आहे. या गाण्यातील बोल सध्याच्या राजकीय परिस्थितीशी आता मिळतीजुळती बघायला मिळत आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेना पक्षाकडून आज लोकसभा निवडणुकीसाठी उमेदवारांची पहिली यादी जाहीर झाली आहे. पण या यादीत मुख्यमंत्र्यांचे चिरंजीव श्रीकांत शिंदे यांचं नाव नाही. त्यामुळे नेमकं असं काय घडलं की एकनाथ शिंदे हे पहिल्या यादीत स्वत:च्या मुलाचं नाव जाहीर करु शकले नाहीत? त्यांची नेमकी अशी काय मजबुरी होती? असा प्रश्न आता उपस्थित होतोय.

असं काय घडलं की मुख्यमंत्र्यांना स्वत:च्या मुलाची उमेदवारी जाहीर करता आली नाही?
मुख्यमंत्र्यांना स्वत:च्या मुलाची उमेदवारी जाहीर करता आली नाही?
Follow us
| Updated on: Mar 28, 2024 | 8:33 PM

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील शिवसेना पक्षाकडून आज लोकसभा निवडणुकीसाठी उमेदवारांची यादी जाहीर झाली आहे. या पहिल्या यादीत एकूण 8 उमेदवारांची घोषणा करण्यात आली आहे. या यादीत दक्षिण मुंबई मतदारसंघाचे खासदार राहुल शेवाळे यांच्यापासून शिर्डीचे खासदार सदाशिव लोखंडे यांचं नाव आहे. विशेष म्हणजे या यादीत काँग्रेसमधून शिवसेनेत दाखल झालेले राजू पारवे यांचं नाव आहे. पण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे चिरंजीव खासदार श्रीकांत शिंदे यांचं नाव या यादीत नाही. त्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. कल्याण लोकसभा मतदारसंघ हा शिवसेनेचा बालेकिल्ला मानला जातो. तसेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची ठाण्यात ताकद आहे. याशिवाय नाशिकमध्ये शिवसेनेची जागा आहे. या तीनही लोकसभेच्या जागा या शिवसेनेच्या हक्काच्या मानल्या जातात. या जागा शिवसेनेच्या बालेकिल्ला मानल्या जातात. पण तरीही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे या तीनही जागांचे उमेदवार पहिल्या यादीत जाहीर करु शकले नाहीत.

श्रीकांत शिंदेंनी हेमंत गोडसेंचं नाव जाहीर करुनही यादीत नाव नाही

विशेष म्हणजे खासदार श्रीकांत शिंदे गेल्या आठवड्यात नाशिकच्या दौऱ्यावर होते. त्यावेळी त्यांनी खासदार हेमंत गोडसे यांची नाशिकमधून उमेदवारी जाहीर केली होती. शिवसेनेकडून अशाप्रकारे उमेदवारी जाहीर होण्याची ही पहिलीच वेळ होती. पण श्रीकांत शिंदे यांनी उमेदवारी जाहीर केल्यामुळे भाजपमध्ये मोठा असंतोष निर्माण झाला. हेमंत गोडसे यांना महायुतीकडून लोकसभेचं तिकीट मिळू नये यासाठी भाजपच्या नाशिक कार्यालयात कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांनी ठिय्या मांडला. तसेच काही जणांनी श्रीकांत शिंदे यांना उमेदवारी जाहीर करण्याचा अधिकार नाही, असं म्हटलं. हेमंत गोडसे यांनादेखील आपल्या उमेदवारीबाबत धाकधूक असल्याचं गेल्या काही दिवसांपासून बघायला मिळतंय. हेमंत गोडसे यांच्याकडून उमेदवारीसाठी प्रचंड प्रयत्न केले जात आहेत.

हेमंत गोडसे गेल्या 10 वर्षांपासून नाशिकचे खासदार आहेत. त्यामुळे त्यांनी नाशिक मतदारसंघावर दावा करणं साहजिक आहे. त्यानंतर श्रीकांत शिंदे यांनी त्यांना उघडपणे उमेदवारी जाहीर केली. तरीसु्द्धा शिवसेनेच्या उमेदवारांच्या पहिल्या यादीत हेमंत गोडसे यांना उमेदवारी का जाहीर झाली नाही? असा प्रश्न उपस्थित होतोय. हेमंत गोडसे आपल्याला उमेदवारी मिळावी या मागणीसाठी काल नाशिकहून आपल्या समर्थकांसाठी मुंबईत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या भेटीसाठी आले होते. त्यांच्याकडून शक्तीप्रदर्शन केल्यानंतरही त्यांची आज उमेदवारी जाहीर झाली नाही.

हे सुद्धा वाचा

श्रीकांत शिंदेंची जागा भाजपकडे जाणार?

कल्याण लोकसभा मतदारसंघात शिवसेनेची ताकद आहे. या मतदारसंघात शिवसेनेकडून विकासकामे करण्यात आली. अगदी गल्लोगल्लीपर्यंत शिवसेना लोकप्रतिनिधींच्या प्रयत्नांमुळे सीमेंट काँक्रीटचे रस्ते बनवण्यात आले. त्यामुळे कल्याणकरांनी श्रीकांत शिंदे यांना भरभरुन मतदान केलं. या मतदारसंघात श्रीकांत शिंदे दोन वेळा खासदार म्हणून निवडून आले आहेत. श्रीकांत शिंदे हे कमी वयात इथून निवडून गेले आहेत. तसेच त्यांचा सातत्याने कल्याण लोकसभा मतदारसंघावर दावा केला जातोय. असं असताना त्यांचं नाव उमेदवारांच्या पहिल्या यादीत न जाहीर करण्यात आल्याने विविध चर्चांना उधाण आलं आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर अशी नेमकी काय मजबुरी होती की ते पहिल्या यादीत आपल्या चिरंजीवाचं नाव जाहीर करु शकले नाहीत? असा प्रश्न आता उपस्थित होतोय.

कल्याण लोकसभेत गेल्या काही दिवसांमध्ये अनेक राजकीय घडामोडी घडल्या आहेत. विशेष म्हणजे सत्ताधारी शिवसेना आणि भाजपमध्ये इथे मतभेद असल्याचं बघायला मिळालं आहे. श्रीकांत शिंदे यांच्याबाबत भाजप नेत्यांमध्ये नाराजी आहे. अशा अनेक घटना घडल्या आहेत ज्यामध्ये श्रीकांत शिंदे यांच्यावर भाजपकडून आरोप करण्यात आले आहेत. श्रीकांत शिंदे यांच्याबाबत नाराजी व्यक्त करण्यात आली आहे. विशेष म्हणजे भाजपचा या लोकसभेवर दावा आहे. त्यामुळे ही जागा खरंच भाजपच्या गळाला लागते का? ते पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

श्रीकांत शिंदे ठाण्यातून लढणार?

शिवसेनेच्या पहिल्या यादीत ठाण्याच्या जागेबाबातही घोषणा करण्यात आलेला नाही. ठाणे लोकसभा मतदारसंघ हा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा बालेकिल्ला मानला जातो. एकनाथ शिंदे यांचं ठाण्याबाबत वेगळं प्रेम आहे. त्यांचं ठाण्याबद्दलचं वेगळं प्रेम लपून राहिलेलं देखील नाही. असं असताना एकनाथ शिंदे यांच्या पक्षाकडून उमेदवारांच्या पहिल्या यादीत ठाण्याच्या उमेदवाराची घोषणा करण्यात आलेली नाही. राजकीय वर्तुळात अशीही चर्चा सुरु आहे की, कल्याण आणि ठाण्याच्या जागेबाबत आदलाबदल होण्याची शक्यता आहे. श्रीकांत शिंदे यांना ठाण्याच्या जागेवर उमेदवारी दिली जाण्याची शक्यता आहे. तर कल्याणच्या जागेवर भाजप आपला उमेदवार उतरवणार आहे. ही चर्चा भविष्यकाळात खरी ठरते का? हे पाहणं आता महत्त्वाचं ठरणार आहे.

पहिल्या यादीत 7 विद्यमान खासदारांना उमेदवारी जाहीर

शिवसेनेकडून शिर्डीतून सदाशिव लोखंडे यांना उमेदवारी जाहीर झालीय. ते गेल्या 10 वर्षांपासून या मतदारसंघात खासदार आहेत. बुलढाण्यातून खासदार प्रतापराव जाधव यांना उमेदवारी जाहीर झालीय. ते 15 वर्षांपासून या मतदारसंघाचे खासदार आहेत. मावळमधून श्रीरंग बारणे यांना पुन्हा उमेदवारी जाहीर झाली आहे. ते गेल्या 10 वर्षांपासून या मतदारसंघात खासदार आहे. हातकणंगलेमधून धैर्यशील माने यांना उमेदवारी मिळाली आहे. ते गेल्या निवडणुकीत इथून जिंकून आले. तर कोल्हापुरातून विद्यमान खासदार संजय मंडलिक यांना उमेदवारी जाहीर झालीय. हिंगोलीतून सध्याचे विद्यमान खासदार हेमंत पाटील यांना उमेदवारी जाहीर झालीय. तसेच काँग्रेसमधून शिवसेनेत दाखल झालेले राजू पारवे यांना रामटेकमधून उमेदवारी जाहीर झाली. पण या यादीत गेल्या 10 वर्षांपासून कल्याण लोकसभेचं प्रतिनिधित्व करणारे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे चिरंजीव श्रीकांत शिंदे यांना उमेदावारी जाहीर झालेली नाही. त्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.

Non Stop LIVE Update
कांदा निर्यातीबाबत सरकारचे दुटप्पी धोरण, शेतकऱ्यांचा संताप
कांदा निर्यातीबाबत सरकारचे दुटप्पी धोरण, शेतकऱ्यांचा संताप.
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट.
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि...
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि....
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण.
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा.
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?.
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप.
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या..
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या...
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान.
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?.