बंगालमध्ये दीदी, तामिळनाडूत काँग्रेस आघाडी; केरळात भाजपला फक्त एक जागा: सर्व्हे

चार राज्य आणि एका केंद्रशासित प्रदेशात होत असलेल्या विधानसभेच्या निवडणुकीत भाजपचं पानीपत होताना दिसत आहे. (opinion poll predicts victory for incumbent, BJP gains in Bengal)

बंगालमध्ये दीदी, तामिळनाडूत काँग्रेस आघाडी; केरळात भाजपला फक्त एक जागा: सर्व्हे
नरेंद्र मोदी, राहुल गांधी, ममता बॅनर्जी,
Follow us
| Updated on: Mar 09, 2021 | 11:00 AM

नवी दिल्ली: चार राज्य आणि एका केंद्रशासित प्रदेशात होत असलेल्या विधानसभेच्या निवडणुकीत भाजपचं पानीपत होताना दिसत आहे. टाइम्स नाऊ आणि सी-व्होटरच्या सर्व्हेनुसार पश्चिम बंगालमध्ये पुन्हा ममता बॅनर्जी यांचं सरकार येणार असून तामिळनाडूत काँग्रेस आघाडीची सत्ता येणार आहे. तर केरळात पुन्हा एकदा डाव्यांचंच पुनरागमन होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. म्हणजे या तिन्ही मोठ्या राज्यांमध्ये भाजपला मोठ्या पराभवाला समोरे जावे लागणार आहे. (opinion poll predicts victory for incumbent, BJP gains in Bengal)

पश्चिम बंगाल, केरळ, आसाम, पुद्दुचेरी आणि तामिळनाडू या चार राज्यांचा एक सर्व्हे जाहीर करण्यात आला आहे. या सर्व्हेनुसार केरळमध्ये लेफ्ट डेमोक्रॅटिक फ्रंट पुन्हा सत्तेत येण्याची शक्यता आहे. एलडीएफला एकूण 140 जागांपैकी 82 जागांवर विजय मिळण्याची शक्यता आहे. तर युनायटेड ड्रेमोक्रॅटिक फ्रंट 56 जागांवर विजय मिळवण्याची शक्यता आहे. तर भाजपला केवळ एक सीट मिळण्याची शक्यता आहे.

तामिळनाडूत काँग्रेस

तामिळनाडूत सत्तांतर होण्याचे संकेत मिळत आहेत. अन्नाद्रमुखच्या नेतृत्वाखालील आघाडीला 65 जागा मिळणार आहेत. तर डीएमकेच्या नेतृत्वाखालील यूपीए आघाडीला 158 जागा मिळण्याची शक्यता आहे. यूपीए आघाडीत काँग्रेसही असल्याने राज्यात डीएमकेच्या नेतृत्वात सत्ता येण्याचे संकेत मिळत आहेत. पुद्दुचेरीत मात्र एनडीएचं सरकार बनण्याची शक्यता वर्तवली जात आहे. सर्व्हेनुसार 30 जागांपैकी एनडीएला 16 ते 20 जागा मिळण्याची शक्यता आहे.

आसाममध्ये भाजप सत्ता राखणार

आसाममध्ये भाजपची पुन्हा सत्ता येण्याची शक्यता आहे. आसाममध्ये एनडीएला 126 पैकी 67 जागा मिळण्याची शक्यता आहे. मात्र यूपीएही यावेळी चांगली कामगिरी करण्याची शक्यता आहे. यूपीएच्या 39 वरून 57 जागा होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. इतरांच्या पारड्यात दोन जागा जाण्याची शक्यता आहे. 126 जागा असलेल्या आसाम विधानसभेत बहुमतासाठी 64 जागांची आवश्यकता आहे.

पुन्हा दीदी

पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जी यांना सोडून त्यांचे अनेक सहकारी जात असले तरी बंगालमध्ये ममता बॅनर्जी यांचंच सरकार येणार असल्याचं चिन्हं आहे. बंगालमध्ये ममता बॅनर्जी यांना 154 जागा मिळण्याची शक्यता आहे. तर भाजपला 107 जागा मिळण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. 2016च्या विधानसभा निवडणुकीत टीएमसीला 211 जागा मिळाल्या होत्या. तर भाजपला अवघ्या तीन जागा मिळाल्या होत्या. सर्व्हेनुसार राज्यात टीएमसीची सत्ता येणार असली तरी त्यांच्या सीट कमी होताना दिसत आहेत. तर भाजपला प्रचंड फायदा होताना दिसत आहे. (opinion poll predicts victory for incumbent, BJP gains in Bengal)

संबंधित बातम्या:

ममता बॅनर्जींकडून बंगालच्या जनतेचा विश्वासघात, पंतप्रधान मोदींचा घणाघात

नंदीग्रामचं नेमकं गणित काय?, 62 हजार मुस्लिम मते कुणाच्या पारड्यात?; वाचा दीदी जिंकणार की दादा?

ममता बॅनर्जींच्या पक्षात सहकाऱ्यांचे बंड का?; जुन्या मित्रानेच सांगितली इनसाईड स्टोरी

(opinion poll predicts victory for incumbent, BJP gains in Bengal)

Non Stop LIVE Update
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट.
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि...
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि....
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण.
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा.
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?.
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप.
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या..
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या...
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान.
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?.
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल.