बजेटपेक्षा 6 पट अधिक कमाई, 2 तास 53 मिनिटांच्या चित्रपट बाप आणि मुलाचा संघर्ष, आजही पाहण्यासाठी लोकांची गर्दी

2 तास 53 मिनिटाचा चित्रपट, ज्यामध्ये बाप आणि मुलाचा दाखवण्यात आलाय संघर्ष. बजेटपेक्षा 6 पट अधिक केली होती कमाई. आजही चित्रपट पाहण्यासाठी लोक करतात गर्दी.

बजेटपेक्षा 6 पट अधिक कमाई, 2 तास 53 मिनिटांच्या चित्रपट बाप आणि मुलाचा संघर्ष, आजही पाहण्यासाठी लोकांची गर्दी
Image Credit source: Social media
| Updated on: Mar 02, 2026 | 6:32 PM

बॉलिवूडमध्ये अ‍ॅक्शन-रोमँटिक चित्रपटांनी अनेक कलाकारांचे नशीब पालटले आहे. 90च्या दशकात आलेल्या अशाच एका चित्रपटाने एका नव्या अभिनेत्याला रातोरात स्टार बनवले. हा चित्रपट म्हणजे 1991 मध्ये प्रदर्शित झालेला. त्याचे नाव आहे Phool Aur Kaante. यामध्ये अजय देवगन देखील होता.

या चित्रपटाचे दिग्दर्शन कुकू कोहली यांनी केले होते. नोव्हेंबर 1991 मध्ये रिलीज झालेल्या या चित्रपटाची कथा अजय आणि पूजा यांच्या प्रेमकहाणीने सुरू होते. दोघे प्रेमात पडतात. लग्न करतात आणि नंतर पालक बनतात. मात्र, अजयच्या वडिलांच्या गुन्हेगारी जगामुळे त्याच्या आयुष्यात संकट ओढवते.

चित्रपटात अमरीश पुरी यांनी अजयच्या वडिलांची, एका क्रिमिनल लीडरची भूमिका साकारली आहे. तो आपल्या मुलालाही गुन्हेगारीच्या जगात येण्यास भाग पाडतो. पण अजय शांत, प्रामाणिक आणि प्रेमळ आयुष्य जगण्याचा मार्ग निवडतो. वडील आणि मुलामधील हा संघर्षच चित्रपटाचा मुख्य गाभा ठरतो. या चित्रपटात मधू आणि अरुणा ईरानी यांच्याही महत्त्वाच्या भूमिका होत्या.

बजेटपेक्षा चौपट कमाई

सुमारे 2 तास 53 मिनिटांच्या या चित्रपटाचे बजेट केवळ 3 कोटी रुपये होते. मात्र बॉक्स ऑफिसवर या चित्रपटाने तब्बल 12 कोटी रुपयांची कमाई करत बजेटपेक्षा चारपट अधिक कमाई केली. त्या काळात ही मोठी कामगिरी मानली जात होती.

‘फूल और कांटे’ हा अजय देवगनचा बॉलिवूड डेब्यू चित्रपट होता. या चित्रपटातील दोन वेगवेगळ्या मोटारसायकलींवर उभे राहून केलेला त्यांचा स्टंट आजही प्रेक्षकांच्या लक्षात आहे. हा सीन अजयच्या कारकिर्दीतील आयकॉनिक क्षण ठरला.

पहिल्याच चित्रपटातून अजय देवगन स्टार बनला. त्यानंतर पुढच्याच वर्षी त्याने ‘जिगर’सारखा हिट चित्रपट दिला आणि पुढे जाऊन तो बॉलिवूडमधील ‘सिंघम’ म्हणून ओळखू जाऊ लागला.

अ‍ॅक्शन-रोमँटिकचा यशस्वी फॉर्म्युला

‘फूल और कांटे’ने 90च्या दशकात अ‍ॅक्शन आणि रोमान्सचा नवा ट्रेंड निर्माण केला. कमी बजेटमध्ये बनलेला हा चित्रपट प्रचंड यशस्वी ठरला आणि अजय देवगनला हिंदी चित्रपटसृष्टीत भक्कम स्थान मिळवून दिले. आज 35 वर्षांनंतरही ‘फूल और कांटे’ हा चित्रपट अजय देवगनच्या कारकिर्दीतील महत्त्वाचा टप्पा म्हणून ओळखला जातो.

Follow Us