प्रचंड वादग्रस्त गाणं, तरीही प्रत्येकजण या गाण्याचा चाहता, ऐकू येताच लोक दिवसभर गुणगुणतात

प्रचंड वादग्रस्त गाणं, ज्याला रेडिओ आणि दूरदर्शनवर घालण्यात आली होती बंदी. पण गाणं इतकं वादग्रस्त असून देखील आजही त्या गाण्याशिवाय कोणतीच पार्टी पूर्ण होता नाही. आजही प्रचंड सुपरहिट आहे गाणं.

| Updated on: Jul 03, 2026 | 12:27 PM
1 / 5
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांनी आपल्या कारकिर्दीत 12 हजारांहून अधिक गाणी गायली असून त्यातील अनेक गाणी आजही रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवत आहेत. त्यापैकी हरे रामा हरे कृष्णा या चित्रपटातील 'दम मारो दम' हे गाणे आज आयकॉनिक मानले जाते.

ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांनी आपल्या कारकिर्दीत 12 हजारांहून अधिक गाणी गायली असून त्यातील अनेक गाणी आजही रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवत आहेत. त्यापैकी हरे रामा हरे कृष्णा या चित्रपटातील 'दम मारो दम' हे गाणे आज आयकॉनिक मानले जाते.

2 / 5

मात्र, प्रदर्शित झाल्यानंतर या गाण्यावर मोठा वाद निर्माण झाला होता. 1971 मध्ये प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाचे दिग्दर्शन देव आनंद यांनी केले होते. त्या काळात भारतीय उपखंडात वाढत असलेल्या 'हिप्पी मूव्हमेंट'वर भाष्य करण्यासाठी हा चित्रपट तयार करण्यात आला होता.

3 / 5

गाण्यात अभिनेत्री झीनत अमान यांचे चिलम ओढतानाचे दृश्य दाखवण्यात आले होते. त्यामुळे अमली पदार्थांच्या वापराचे आरोप करण्यात आला होते. चित्रपटात देव आनंद यांचे 'प्रशांत' हे पात्र काठमांडूमध्ये आपल्या बहिणी 'जेनिस'ला भेटते. नशेच्या आहारी गेलेल्या बहिणीला त्या व्यसनातून बाहेर काढण्याचा प्रयत्न या कथेत दाखवण्यात आला आहे.

4 / 5

'दम मारो दम' या गाण्यानंतर 'देखो ओ दीवानों, राम का नाम बदनाम न करो' या ओळींमधून नशेच्या विरोधात संदेशही देण्यात आला आहे. या गाण्याचे गीतकार आनंद बक्षी तर संगीतकार आर. डी. बर्मन होते.

5 / 5

त्या काळात अनेकांनी हे गाणे भारतीय संस्कृतीविरोधी असल्याचा आरोप केला. तसेच ते युवकांमध्ये अमली पदार्थांच्या व्यसनाला प्रोत्साहन देत असल्याची टीकाही करण्यात आली. विविध संघटनांनी या गाण्यावर बंदीची मागणी केली. त्यानंतर हे गाणे ऑल इंडिया रेडिओ वर प्रसारित करण्यास बंदी घालण्यात आली, तर दूरदर्शन वरूनही ते हटवण्यात आले.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us