8 व्या वर्षी पहिले पारितोषिक, त्यानंतर पद्मश्री पुरस्काराने सन्मानित; असं घडलं कविता कृष्णमूर्ती यांचं करिअर

| Updated on: Jan 25, 2022 | 8:00 AM

1958 मध्ये दिल्लीतील एका तामिळ कुटुंबात जन्मलेल्या कविताने 18 हजारांहून अधिक गाणी गायली आहेत, त्यांच्या करिअरमध्ये 18000 हून अधिक गाणी गायली आहेत.

8 व्या वर्षी पहिले पारितोषिक, त्यानंतर पद्मश्री पुरस्काराने सन्मानित; असं घडलं कविता कृष्णमूर्ती यांचं करिअर
कविता कृष्णमूर्ती (फाईल फोटो)
Follow us on

मुंबई – कविता कृष्णमूर्ती (kavita krishnamurthy) यांनी पार्श्वगायिनाचं दिलेलं योगदान अत्यंत मोठं आहे. आपण अनेकदा जुनी हिंदी गाणी (old hindi song) ऐकतं असतो. पण अनेक गाण्यामागे कविता कृष्णमूर्ती यांचा आवाज असतो. भारतीय सिनेमासाठी (indian cinema) त्यांनी दिलेलं योगदान कुणीही विसरू शकत नाही. त्यांनी वयाच्या 8 व्या वर्षी पहिलं पारितोषिक मिळवलं आणि त्यांच्यातल्या आवाजानं त्यांना जागं केलं. कारण त्यावेळी त्यांनी मोठ्या गायिका होण्याचं स्वप्न उराशी बाळगलं. 2005 मध्ये त्यांना पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. तसेच चार फिल्मफेअर सर्वोत्कृष्ट पार्श्वगायिका पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. स्टारडस्ट मिलेनियम 2000 पुरस्कारांमध्ये “सर्वोत्कृष्ट गायिका ऑफ द मिलेनियम” पुरस्कार, देवदास या आंतरराष्ट्रीय हिट चित्रपटातील डोला रे डोलासाठी झी सिने पुरस्कार 2003 आणि ती दोन वेळा बॉलीवूड पुरस्कार मिळाला आहे. आज त्यांचा वाढदिवस आहे, त्यांना वाढदिवसाच्या हार्दीक शुभेच्छा !

करिअरची सुरूवात

25 जानेवारी 1958 ला कविता कृष्णमूर्ती यांचा जन्म दिल्लीत झाला. त्यांचं पुर्ण नाव कविता कृष्णमूर्ति सुब्रमणियम असं आहे. त्या कविता कृष्णमूर्ति या नावाने ओळखल्या जातात. 1980 च्या दरम्यान कविता कृष्णमूर्ति यांनी ‘काहे को ब्याही’ या गाण्याला पार्श्व गायन केले. फ़िल्म ‘मांग भरो सजना’ या चित्रपटातलं गाणं असून त्यांनी त्याच्या प्रवासाला इथून सुरूवात झाली.

18 हजारांहून अधिक गाणी गायली

1958 मध्ये दिल्लीतील एका तामिळ कुटुंबात जन्मलेल्या कविताने 18 हजारांहून अधिक गाणी गायली आहेत, त्यांच्या करिअरमध्ये 18000 हून अधिक गाणी गायली आहेत. 1993 मध्ये संजय दत्तच्या ‘खलनायक’ या चित्रपटाच्या शीर्षक गीताला कविताने आपला आवाज दिला होता. 1996 मध्ये आलेल्या तेरे मेरे सपने या चित्रपटातील आंख मारे हे सर्वात प्रसिद्ध गाणेही त्यांनी गायले. त्याचप्रमाणे त्यांनी ‘हम साथ साथ है’ या चित्रपटातील मैय्या यशोदा, मोहरा चित्रपटातील तू चीज बडी है मस्त ही गाणी गायली. त्यांनी देवदासमधील डोला रे डोला रे आणि कभी खुशी कभी गम के बोले चुडियांसह हजारो सुपरहिट गाणी गायली आहेत.

कर्मा चित्रपटातील गाण्याची जादू

1986 च्या सुपरहिट चित्रपट कर्मासाठी ‘दिल दिया है जान भी देंगे ए ततन तेरे लिए’ हे देशभक्तीपर गाणे गायले होते. आलम झालं की या गाण्याला राष्ट्रीय गाण्यासारखा मान मिळाला. यामुळेच दरवर्षी १५ ऑगस्टला स्वातंत्र्यदिन आणि २६ जानेवारीला प्रजासत्ताक दिनानिमित्त हे गाणे नक्कीच ऐकायला मिळते. सुपरस्टार दिलीप कुमार, जॅकी श्रॉफ, अनिल कपूर यांनी देशप्रेमाची भावना ओतप्रोत भरलेल्या कर्मा चित्रपटात जबरदस्त अभिनय केला. चित्रपटाचे शीर्षक गीत मोहम्मद अझीझ आणि कविता कृष्णमूर्ती यांनी गायले आहे.

पुरस्कार

2005 मध्ये त्यांना पद्मश्री पुरस्कार
“सर्वोत्कृष्ट गायिका ऑफ द मिलेनियम” पुरस्कार
2003 देवदास या आंतरराष्ट्रीय हिट चित्रपटातील डोला रे डोलासाठी पुरस्कार
दोन वेळा बॉलीवूड पुरस्कार

varun-Natasha wedding anniversary : लग्नाच्या वाढदिवशी वरुणला लग्नाची आठवण!, ‘ते’ खास फोटो इन्स्टावर शेअर

लग्नानंतर कतरिनाची मालदिव टूर, सुट्टीमध्ये धमाल, पण आश्चर्य म्हणजे सोबतीला विकी नाही!

Box Office Collection : ‘बंगाराजू’चित्रपट कमाईत मागे, दुस-या आठवड्यात प्रेक्षकांनी फिरवली पाठ; तरीही 49 करोड रूपयांची कमाई