शाहरुख खान याने ‘त्या’ दिवशी शिवी दिली की नाही? केकेआर-मुंबई इंडियन्स मॅचमध्ये काय घडले?, मोठा खुलासा

बाॅलिवूड अभिनेता शाहरुख खान हा कायमच चर्चेत असतो. शाहरुख खान याचे एका मागून एक चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येताना दिसत आहेत. विशेष म्हणजे शाहरुख खानचे हे चित्रपट मोठे धमाके करताना देखील दिसत आहेत. नुकताच एक अत्यंत मोठा आणि हैराण करणारा खुलासा करण्यात आलाय.

शाहरुख खान याने त्या दिवशी शिवी दिली की नाही? केकेआर-मुंबई इंडियन्स मॅचमध्ये काय घडले?, मोठा खुलासा
Shah Rukh Khan
| Updated on: May 04, 2024 | 2:50 PM

बाॅलिवूड अभिनेता शाहरुख खान हा नेहमीच चर्चेत असतो. शाहरुख खानची सोशल मीडियावर जबरदस्त अशी फॅन फाॅलोइंग देखील बघायला मिळते. शाहरुख खान आज कोट्यवधी संपत्तीचा मालक आहे. हेच नाही तर शाहरुख खानचे एका मागून एक चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येताना दिसत आहेत आणि ते चित्रपट धमाका करताना देखील दिसत आहेत. विशेष बाब म्हणजे गेल्या काही दिवसांपासून शाहरुख खान हा सोशल मीडियावर देखील चांगलाच सक्रिय दिसतोय. नुकताच आता अत्यंत मोठा खुलासा एका मोठ्या वादावर करण्यात आलाय. हा वाद आयपीएल सामन्यादरम्यानचा आहे.

बारा वर्षापूर्वी केकेआर संघाचा मालक शाहरुख खान याला त्याच्या वागणुकीमुळे थेट मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर 5 वर्षांची बंदी घालण्यात आली होती. त्यावेळी त्याने स्टेडियममधील सुरक्षारक्षकाला शिवीगाळ केल्याचे सांगितले जाते. आता त्यावरच थेट मोठा खुलासा करण्यात आलाय. त्यावेळी शाहरुख खान जो वागला होता, ते पाहून प्रेक्षक चांगलेच हैराण झाले होते, त्याचे काही फोटो आणि व्हिडीओही व्हायरल झाले होते.

आता या वादावर थेट स्टाफचे सदस्य जॉय भट्टाचार्य यांनी मोठा दावा केलाय. सोशल मीडियावर एका युजर्सने कमेंट करत म्हटले की, ज्यादिवशी शाहरुख खानने सुरक्षा रक्षकाला शिवीगाळ केली, त्याच दिवशी त्याच्या टीमला शाप लागला. मात्र, या व्यक्तीने अवघ्या काही वेळातच आपले ट्विटही डिलीटही केले. यानंतर जॉय भट्टाचार्यने त्यादिवशी नेमके काय घडले हे सांगितले.

जॉय भट्टाचार्य म्हणाले की, ज्यादिवशी हा सर्वप्रकार घडला, त्यावेळी मी तिथेच उपस्थित होतो. त्यादिवशी शाहरुख खान हा एक बाप म्हणून रागात होता. कारण त्यादिवशी शाहरुखची मुलगी सुहाना हिला कॅटकॉल (एब्यूज करणे) करण्यात आले होते. हेच नाही तर त्या घटनेवेळी शाहरुख आणि सुहाना एकत्रच होते. मी देखील तिथेच उपस्थित होतो.

मुळात म्हणजे शाहरुख खान याने शिवीगाळ केलाच नव्हता. हेच नाही तर त्या घटनेनंतर केकेआरने तब्बल दोन वेळा आयपीएल जिंकले आहे. नुकताच मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर कोलकाता नाईट रायडर्स आणि मुंबई इंडियन्सचा सामना रंगला. बारा वर्षानंतर परत तो वाद चर्चेत आला. शाहरुख खान याचा काही दिवसांपूर्वीच डंकी हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आला, विशेष म्हणजे त्या चित्रपटाने धमाका केला.