
Urfi Javed : रिऍलिटी शो स्टार उर्फी जावेद कायम तिच्या फॅशन सेन्समुळे चर्चेत असते. पण आता एका धक्कादायक कारणामुळे उर्फी चर्चेत आली आहे. सोमवारी उर्फी हिच्यासोबत जे काही झालं, ते एका वाईट स्वप्नापेक्षा देखील कमी नव्हतं. उर्फी आणि तिच्या बहिणीसोबत मध्यरात्री जे काही झालं, ते कोणत्या वाईट स्वप्नापेक्षा देखील कमी नव्हतं… सोमवारी मध्यरात्री जे काही घडलं ते उर्फी हिने सांगितलं आहे. बहीण डॉली आणि आसफी यांच्यासोबत घरात असताना, अचानक वाईट प्रकार दरवाजा ठोठावण्यास सुरुवात झाली.
उर्फी हिने सांगितल्यानुसार, ‘जवळपास 10 मिनिटं सतत कोणीतरी दरवाजा ठोठावत होतं. मी बाहेर जाऊन पाहिलं तेव्हा एक पुरुष त्या ठिकाणी उभा होता आणि दरवाजा उघडण्यासाठी माझ्यावर दबाव टाकत होता… तर दुसरा पुरुष दरवाजाच्या बाजूला उभा होता… मी त्या दोघांना जाण्यास सांगितलं. पण दोघे देखील ऐकण्यास तयार नव्हते… जेव्हा मी पोलिसांची धमकी दिली. तेव्हा दोघांनी काढता पाय घेतला. ‘
आश्चर्याची गोष्ट म्हणजे छेडछाड आणि गैरवर्तन करणारे लोक बाहेरचे नव्हते, तर उर्फीच्या इमारतीच्या 13 व्या मजल्यावर राहणारे लोक होते. उर्फीचा आरोप आहे की, दोन पुरुषा एका राजकारण्याच्या जवळचा असल्याचा दावा करत होते आणि पोलिसांसमोरही त्याचा अहंकार कमी झाला नव्हता…
एवढंच नाहीतर, जेव्हा उर्फी हिने पोलिसांत जाण्याचा निर्णय घेतला, तेव्हा दोघांनी बिल्डिंगमधील सिक्योरिटी गार्डला CCTV फुटेज डिलीट करण्यास सांगितलं… असं देखील उर्फी म्हणाली. पोलिसांकडे तक्रार केल्यानंतर देखील दोघांच्या चेहऱ्यावर भीती नव्हती… ‘आम्ही मोठ्या नेत्यांशी संबंधित आहोत आणि कोणीही आम्हाला हानी पोहोचवू शकत नाही.’ असं देखील ते बोलत होते.
उर्फी जावेद हिने या प्रकरणी मुंबईतील दादाभाई नौरोजी पोलिस स्टेशनमध्ये एफआयआर दाखल केला आहे. तिने अपनी हाउसिंग सोसायटीला लेखी तक्रार देखील दिली आहे. उर्फीने संपूर्ण प्रकरणाबद्दल चिंता व्यक्त करत म्हटलं, जेव्हा मुली एकट्या राहतात तेव्हा अशा घटना खूप भयावह असू शकतात. सोसायटी कमिटी बैठक घेईल आणि पुढील निर्णय घेईल. सध्या सर्वत्र उर्फी जावेद हिची चर्चा रंगली आहे.