Soham Bandekar: ‘तू मर्द असशील तर तिचा…’, लेकाला लग्नाआधी असं काय म्हणालेले आदेश बांदेकर?

Soham Bandekar: 'तू मर्द असशील तर तिच्या...', आदेश बांदेकर लग्नाआधी मुलहा सोहम याला असं का म्हणालेले? तुम्हाला माहितीये कशी झाली सोहम बांदेकर आणि पूजा बरारी यांच्याची सुरुवात

Soham Bandekar: तू मर्द असशील तर तिचा..., लेकाला लग्नाआधी असं काय म्हणालेले आदेश बांदेकर?
Soham Bandekar
| Updated on: Jan 16, 2026 | 9:36 AM

Soham Bandekar: झगमगत्या विश्वात लग्नाचे वारे वाहत असताना अभिनेते आदेश बांदेकर यांचा मुलगा सोहम बांदेकर याने देखील प्रेमविवाह केला. सोहम याच्या लग्नाचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले. सोहम बांदेकर आणि पूजा बरारी यांच्या लग्नात अनेक दिग्गज देखील उपस्थित होते. पण सोहम आणि पूजा यांच्यामध्ये प्रेम कसं बहरल याबद्दल कोणालाच माहिती नाही. पण नुकताच झालेल्या एका मुलाखतीत सोहम याने त्याच्या खासगी आयुष्याबद्दल आणि लवस्टोरीची सुरुवात कशी झाली याबद्दल सांगितलं आहे. सांगायचं झालं तर, सोहम आणि पूजा यांच्या नात्याची सुरुवात कोणत्या डीनर डेटमुळे नाही तर, चक्का पाणीपुरीने झाली होती. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे पूजा हीच आपल्या घरातील सून व्हावी असा खुद्द आदेश बांदेकर यांचा हट्ट होता.

नुकताच झालेल्या एका मुलाखतीत सोहम बांदेकर म्हणाला, ‘मला पूजा आवडत होती. माझी आजी, मावशी या सगळ्याच मला तिच्याबद्दल सुचवत होत्या… मुलगी खूप छान आहे… बघ… असं सगळं मला सांगत होत्या. तेव्हा मला बाबांचा एक मेसेज आला ‘मर्द असशील तर तिच्याकडून होकार मिळवशील…’ तो मेसेज पाहिल्यानंतर मी म्हणालो, ‘काय आहे हे बाबा काय म्हणत आहात…’ मुलगी चांगली आहे, तुझ्या नखऱ्यांमुळे घालवू नकोस… असं देखील मला बाबा म्हणाले…. मला सुरुवातीला वाटलं मस्करीत बोलत असतील, पण माझी आजी आणि मावशी सुद्धा मालिका पाहून सांगायचे कि ही जरा बघ हा खूप छान आहे.’

त्यानंतर सोहम याने त्याच्या डेटचा किस्सा सांगितला, कोणत्या परिसरात काय चांगलं मिळतं, हे दाखवण्यासाठी मी एक सीरिज सुरु केली होती… तेव्ही मी एका रामेन बाउलचा फोटो शेअर केला होता. तेव्हा पूजाचा मेसेज आला. त्यानंतर माझ्या आणखी एका पोस्टवर तिचा मेसेज आला. त्यानंतर आमचं हळू – हळू बोलणं सुरु झालं. तेव्हा मला कळालं हिला पाणीपुरी प्रचंड आवडते… तेव्हा मी पूजाला म्हणालो, ‘तू एकदा मला भेटशील का मी तुला सगळ्यात उत्तम पाणीपुरी खायला घेऊन जातो. अशी पाणीपुरी तू कधी खाल्लीच नसशील. ‘

‘ती सुद्धा भेटायला तयार झाली. आम्ही ठाण्याला पाणीपुरी खायला गेलो. तेव्हा मला कळलं आमचा स्वभाव सारखाच आहे. त्यानंतर कुटुंबियांसोबत भेट घडवली… मी पूजाला कानातले गिफ्ट केले होते आणि फोटो बाबांना फॉरवर्ड केले. तेव्हा त्यांना कळलं सूनबाई घरी यायला तयार आहेत… त्यानंतर पूजा माझ्या घरच्यांना भेटायला आली आणि तिने तेच कानातले घातले होते. त्यानंतर आम्ही सगळे मिळून जेवायला गेलेलो आणि तेव्हाच लग्नाची तारीख देखील ठरली…’ असं देखील सोहम म्हणाला.