Aamir Khan Wedding: वयाच्या 61 व्या वर्षी आमिर खानची ‘लगीन घाई’, लग्न मंडपापासून गेस्ट लिस्टपर्यंत घ्या जाणून
Aamir Khan Gauri Spratt Wedding Venue : अभिनेता आमिर खान याच्या लग्नाच्या चर्चा गेल्या काही महिन्यांपासून सुरु आहेत. अभिनेता वयाच्या 61 व्या वर्षी 47 वर्षी गर्लफ्रेंड गौरी स्प्रैट हिच्यासोबत तिसऱ्यांचा लग्नबंधनात अडकणार आहे. दोघांच्या लग्नाची महत्त्वाची माहिती देखील समोर आली आहे.

Aamir Khan Gauri Spratt Wedding Venue : रिना दत्ता आणि किरण राव यांच्यासोबत घटस्फोट झाल्यानंतर अभिनेता आमिर खान तिसऱ्यांदा लग्नबंधनात अडकणार आहे. आमिर गर्लफ्रेंड गौरी स्प्रैट हिच्यासोबत तिसऱ्यांचा लग्नबंधनात अडकणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार, गौरी आणि आमिर याचं लग्न 5 जुलै रोजी पार पजणार आहे. तर दोघांच्या लग्नाबद्दल महत्त्वाची माहिती समोर आली आहे. आमीर आणि गौरी यांचं लग्न कसं असेल, ते कुठे होणार आहे आणि त्यात किती पाहुणे उपस्थित राहणार आहेत, हे जाणून घेण्यासाठी सगळेच उत्सुक आहेत. दोघांच्या लग्नाबद्दल सर्वकाही जाणून घ्या…
आमीर खान आणि गौरी यांचं लग्न कुठे होणार?
मिळालेल्या माहितीनुसार, 5 जुलै रोजी होणाऱ्या आमीर खान आणि गौरी यांचं लग्न अभिनेत्याच्य मुंबईतील निवासस्थानी होणार असून लग्ना कुटुंबीय आणि जवळच्या व्यक्तींच्या उपस्थितीत पार पडणार आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, आमीर खान आणि गौरी स्प्राट यांचा विवाह थाटामाटात होणार नाही; त्याऐवजी, दोघे घरीच ‘रजिस्टर मॅरेज’ करून विवाहबंधनात अडकणार आहे. या विवाह सोहळ्यात त्यांची मुलेही उपस्थित राहणार आहेत.
आमिर आणि गौरी यांच्या लग्नात येणाऱ्या पाहुण्यांची लिस्ट
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, आमीर खान आणि गौरी यांच्या अत्यंत खाजगी अशा ‘रजिस्टर मॅरेज’साठी देशभरातून पाहुण्यांना आमंत्रित करण्यात आले असून, यात 100 ते 150लोक उपस्थित राहण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. समोर येत असलेल्या माहितीनुसार, आमिर आणि गौरी यांनी स्वतः प्रत्येकाच्या घरी जाऊन त्यांना निमंत्रण दिलं आहे. पण चित्रपटसृष्टीतील कोणालाही निमंत्रण देण्यात आलेले नाही.
आमिर खान याचे पहिली दोन लग्न
अभिनेत्याचं पहिलं लग्न 18 एप्रिल 1986 मध्ये रिना दत्ता हिच्यासोबत झालं. रिना आणि आमिर यांना दोन मुलं देखील आहे. पण दोघांचं लग्न फार काळ टिकू शकलं नाही. अखेर दोघांनी विभक्त होण्याचा निर्णय घेतला. 2002 मध्ये रिना आणि आमिर यांचा घटस्फोट झाला. आमिर आणि रिना यांना दोन मुलं देखील आहेत. अभिनेत्याने दुसरं लग्न किरण राव हिच्यासोबत केलं. लग्नानंतर किरण हिने सरोगोसीच्या माध्यमातून मुलाचं जगात स्वागत केलं. किरण आणि आमिर यांच्या मुलाचं नाव आझाद असं आहे. पण आमिर आणि किरण यांचं लग्न देखील फार काळ टिकलं नाही. 2021 मध्ये दोघांनी घटस्फोटाची घोषणा केली.