Aamir Khan : आमिर खान नवरा म्हणून योग्य नाही, पण…; जवळच्या व्यक्तीचा मोठा खुलासा

Aamir Khan : अभिनेता आमिर खान याने वयाच्या 61 व्या वर्षी तिसरं लग्न केलं. या लग्नात काही ठराविक लोकांनी हजेरी लावलेली. आता अभिनेत्याच्या जवळच्या व्यक्तीने आमिर याच्या खासगी आयुष्याबद्दल मोठा खुलासा केला आहे. सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त आमिर याच्या खासगी आयुष्याची चर्चा रंगली आहे.

Aamir Khan : आमिर खान नवरा म्हणून योग्य नाही, पण...; जवळच्या व्यक्तीचा मोठा खुलासा
अभिनेता आमिर खान
| Updated on: Sep 05, 2026 | 8:27 AM

Aamir Khan : बॉलिवूडचा प्रसिद्ध आणि लोकप्रिय अभिनेता आमिर खान आणि अभिनेता अमीन हाजी गेल्या अनेक वर्षांपासून एकमेकांचे चांगले मित्र आहेत. आमिर याच्या तिसऱ्या लग्नात देखील अमीन उपस्थित होते. दरम्यान नुकताच झालेल्या एका मुलाखतीत अमीन याने आमिर खान याच्या खासगी आयुष्याबद्दल आणि नात्यांबद्दल मोठं वक्तव्य केलं आहे. एवढंच नाही तर, त्यांनी आमीरची खूप स्तुती केली आणि प्रेम व नातेसंबंधांकडे तो कशा प्रकारे पाहतो, याबद्दल भाष्य केलं.

आमिर खान याचं कौतुक करत अमीर हाजी म्हणाले, ‘आमिर प्रचंड प्रेम करणारा एक व्यक्ती आहे. आमिर खान मोठ्या मनाचा आणि दुसऱ्यांचा आदर करणारा व्यक्ती आहे. मी कधीच त्याला कोणत्या महिलेबद्दल, मग ती महिला ओळखीची असो किंवा अनोळखी, आमिर खान महिलांबद्दल वाईट शब्दाचा उल्लेख करत नाही. त्यांच्याकडे एक विशेष गुण आहे. प्रेमावर विश्वास ठेवण्याची आणि एखाद्या लहान मुलासारख्या निरागस हृदयाने पुन्हा प्रेम करण्याची क्षमता. तो मनापासून प्रचंड प्रेमळ आहे.

नवऱ्यापेक्षा चांगला पूर्व पती…

विनोदी अंदाजात अमीन हाजी म्हणाले, ‘मला असं वाटतं आमिर नवरा म्हणून चांगला नसला तरी तो, पूर्व पती म्हणून खूप चांगल आहे आणि ते त्याने सिद्ध केलं आहे…’, अमीन हाजी यांच्या पत्नीने सांगितल्यानुसार, ”त्याने स्वतःच्या कुटुंबाशी जपलेल्या संबंधांमध्ये कोणताही देखावा नाही; त्याच्या नात्यांमध्ये खरं प्रेम आहे. त्याचं व्यक्तिमत्त्व अत्यंत सकारात्मक आहे.’ सांगायचं झालं तर, आमिर आणि अमीन यांनी ‘लगान’ सिनेमात एकत्र स्क्रिन शेअर केलेली.

अमीन हाजी आमीरच्या तिसऱ्या लग्नाला उपस्थित राहिले.

अमीन हाजी आपल्या संपूर्ण कुटुंबासह आमीर खानच्या तिसऱ्या लग्नाला उपस्थित राहिले. आमीर खानने 5 जुलै रोजी आपली गर्लफ्रेंड गौरी स्प्राट हिच्याशी लग्न केला; या समारंभाला केवळ कुटुंबीय आणि जवळचे मित्रच उपस्थित होते.

आमिर खानच्या खासगी आयुष्याबद्दल सांगायचं झालं तर, आमिरने 1986 मध्ये रीना दत्ताशी लग्न केलं होतं आणि 2002 मध्ये त्यांचा घटस्फोट झाला. त्यांना जुनैद खान आणि इरा खान ही दोन मुले आहेत. रीनापासून विभक्त झाल्यानंतर, आमिरने 2005 मध्ये किरण रावशी लग्न केलं. 2021 मध्ये, त्यांनी परस्पर संमतीने विभक्त होत असल्याची घोषणा केली. त्यांना आझाद राव खान नावाचा मुलगा आहे. घटस्फोटानंतर देखील आमिर याचं त्याच्या दोन्ही पूर्व पत्नींसोबत चांगले संबंध आहेत.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us