Aamir Khan : 10 दिवस आमिर खानने अंघोळ केलीच नाही, चेहऱ्यावर जमलेली धूळ, दुर्गंधी अन्…
Aamir Khan : अभिनेता आमिर खान याच्याबद्दल एक किस्सा असा देखील आहे, जो फार कोणाला माहिती नाही, अभिनेत्याने तब्बल 10 दिवस अंघोळ केलीच नव्हती... तेव्हा अभिनेत्याच्या चेहऱ्यावर जमलेली धूळ, शारीराला येणार दुर्गंधी अन्... जाणून घ्या तेव्हा नेमकं काय झालेलं...

Aamir Khan : अभिनेता आमिर खान याने अनेक सिनेमांमध्ये दमदार भूमिका साकारत चाहत्यांचं मनोरंजन केलं. प्रत्येक भूमिका सत्यात उतरवताना अभिनेत्याने सर्व शक्य प्रयत्न केले आणि याच कारणामुळे आमिर खान याला बॉलिवूडचा मिस्टर परफेक्शनिस्ट म्हणतात… सांगायचं झालं तर, आमिर खान याच्याबद्दल असे अनेक किस्से आहेत, जे कायम चर्चेत राहिले… आभिनेत्याने आपल्या भूमिका जिवंत करण्यासाठी सर्व मर्यादा पार केल्या आणि त्या करण्यापूर्वी कसला विचार देखील केला नाही.
असाच एक किस्सा आहे, जव्हा अभिनेत्याने एक क्लायमेक्स सीनला रियलिस्टिक बनवण्यासाठी तब्बल 10 दिवसांपर्यंत आंघोळ करणं सोडून दिलं होते. अखेर त्या सीन मध्ये असं काही होतं, ज्यामुळे आमिर खान याने स्वतःला इतकं बदललं होतं? तर जाणून घ्या आमिर खान याचा तो किस्सा ज्यामुळे अभिनेता आजही चर्चत आहे.
सांगायचं झालं तर, हा किस्सा आणि 1998 मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘गुलाम’ सिनेमाचा… ‘गुलाम’ सिनेमात आमिर खान याने सिद्धार्थ नावाची एक भूमिका पार पाडली. सिनेमातील एका सीनसाठी आमिर खान याने 10 – 12 दिवस आंघोळच केली नव्हती… याबद्दल खुद्द अभिनेत्याने मैन सोडलं होतं..
सिनेमाच्या क्लाइमेक्समध्ये आमिर आणि खलनायकामध्ये फाईट सीन आहे. ज्यामध्ये आमिरने खलनायकाला बेगम मारहाण केली. आमिर याच्या चेहऱ्यावर प्रचंड धूळ आणि रक्त होतं… सीन मोठा होता, ज्यामुळे आमिर याला मेकअप चेंज करायचा नव्हता. हा सीन पूर्ण करण्यासाठी तब्बल 12 दिवस लागले. यासाठी आमिर आंघोळ न करता 12 दिवस सेटवरच पाहिला.. ज्यामुळे अभिनेत्याला नंतर खास आणि एलर्जी देखील झाली.
आमिर खान याच्याबद्दल सांगायचं झालं तर, अभिनेता त्याच्या प्रोफेशल आयुष्यापेक्षा कमी, पण खासगी आयुष्यामुळे कायम चर्चेत असतो. आमिर खान याने वयाच्या 60 व्या वर्षी तिसरं लग्न केलं. कुटुंबियांच्या उपस्थित अभिनेत्याने एका मुलाच्या आईसोबत संसार थाटला. आमिर खान याचं पहिलं लग्न रीना दत्ता हिच्यासोबतल झालं होतं. तर दुसरं लग्न किरण राव हिच्यासोबत झालेलं. पण दोघांसोबत देखील अभिनेत्याचं नातं फार काळ टिकलं नाही. अखेर दोघींसोबत आमिर खानचा घटस्फोट झाला. आज अभिनेता तिसऱ्या पत्नीसोबत आनंगदी आयुष्य जगत आहे.