
बॉलिवूडमध्ये बच्चन खानदान नेहमीच चर्चेत असतं. अमिताभ बच्चन हे त्यांच्या कामामुळे तर जया बच्चन या त्यांच्या वागण्यामुळे चर्चेच्या केंद्रस्थानी असता. तर बच्चन खानदानाचा सुपूत्र आणि सून, अभिषेक-ऐश्वर्या, त्यांच्या रिलेशनशिपबद्दल उठणाऱ्या विविध अफवांमुळे बऱ्याच काळापासून चर्चेत होते. मात्र काही दिवसांपूर्वीच अभिषेकने (Abhishek Bachchan) एक मुलाखत देत नाराजी, घटस्फोट या सगळ्या अफवा असल्याचे सांगत चर्चा फेटाळून लावल्या. त्यानंतर लेक आराध्या हिच्या स्कूल फंक्शनला अभिषेक-ऐश्वर्या (Aiswarya Rai Bachchan), एवढंच नव्हे तर बिग बी देखील आले होते. त्यामुळे त्यांच्यात सगळं काही आलबेल असल्याचं बोललं जात होतं.
त्यात आता अभिषेक आणि ऐश्वर्या पुन्हा एकदा एकत्र दिसले असून त्यांच्यासोबत लाडकी मुलगी आराध्याही होती. ते तिघेही ख्रिसमस व्हेकेशनसाठी परदेशात गेले असून नुकतेच एअरपोर्टवर स्पॉट झाले. त्यांचा व्हिडीओ समोर आला असून त्यावर लोकांनी विविध मजेशीर कमेंट्स केल्या आहेत. अनेकांनी तर त्यांच्या ब्लॅक आऊटफिटवरूनही सवाल केलेत, तर काहींनी जया आँटी (जया बच्चन) कुठे आहेत, असाही सवाल विचारला. अभिषेक-ऐश्वर्याचा व्हिडीओ चांगलाच व्हायरल झालाय.
गेल्या एक-दोन वर्षांपासून ऐश्वर्या राय बच्चन आणि अभिषेक बच्चन यांच्या नात्याबद्दल बरेच काही बोलले जात होते आणि त्यांच्या घटस्फोटाच्या अफवाही समोर आल्या. अनेक बातम्यांमध्ये असे म्हटले जात होते की हे जोडपं वेगळे होत आहे, परंतु गेल्या वर्षी आणि या वर्षीही जेव्हा ते आराध्याच्या शाळेच्या कार्यक्रमात, अमिताभ बच्चनसोबत दिसले तेव्हा सर्व अफवांना पूर्णविराम मिळाला. अभिषेकनेही मुलाखतीत घटस्फोटाच्या बातम्या फेटाळून लावल्या होत्या.
ख्रिसमस व्हेकेशनसाठी बच्चन कुटुंब रवाना
आता, ते तिघे पुन्हा एकत्र सुट्टीसाठी जाताना दिसले. तिघांनीही काळ्या रंगाचे कपडे घातले होते. यावेळी ऐश्वर्याने पापाराझींना “मेरी ख्रिसमस” च्या शुभेच्छा दिल्या आणि नंतर आत गेली. अभिषेक दोघींसोबतच होता. या व्हिडीओवर मजेशीर कमेंट्स येताना दिसल्या.
यावेळी तिघेही काळ्या रंगाच्या ड्रेसमध्येच दिसले. त्यावरून एका यूजरने विचारलं की ‘यांच्याकडे काळ्या रंगाच्या कपड्यांशिवाय दुसरे कपडे नाहीत का?’ तर एकाने आराध्यासाठी कमेंट केली, ‘कधीतरी शाळेत पण जा गं’. आणखी एक युजरनेही काळ्या कपड्यांबाबत प्रश्न विचारला, बाहेर जाताना हे लोक काळे कपडेच का घालतात ?. तर एका युजरला जया बच्चन यांची खूप आठवण आली.’ जया आंटी मिसिंग’ अस त्याने लिहीलं. अभिषेक बच्चन सध्या शाहरुख खानसोबत “किंग” चित्रपटाचे शूटिंग करत आहे. तर ऐश्वर्या बऱ्याच काळापासून मोठ्या पडद्यापासून दूर आहे.