अक्षय कुमार पत्नीपासून लपवतो ‘ही’ मोठी गोष्ट, थेट खुलासा, ट्विंकल खन्नाला कधीच…

बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमार हा नेहमीच चर्चेत असतो. अक्षय कुमारची सोशल मीडियावर जबरदस्त अशी फॅन फॉलोइंग बघायला मिळते. विशेष म्हणजे अक्षय कुमारचे एका मागून एक चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येताना दिसत आहेत. अक्षय कुमार याने मोठा काळ चित्रपटांमध्ये गाजवला आहे.

अक्षय कुमार पत्नीपासून लपवतो ही मोठी गोष्ट, थेट खुलासा, ट्विंकल खन्नाला कधीच...
akshay kumar and twinkle khanna
| Updated on: Aug 04, 2024 | 2:34 PM

बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमार हा गेल्या काही वर्षांपासून सतत चर्चेत असणारे एक नाव आहे. विशेष म्हणजे अक्षय कुमार हा बॉलिवूडचा असा एकमेंव अभिनेता आहे, ज्याचे एका वर्षाला चार चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येतात. मात्र, गेल्या काही दिवसांपासून अक्षय कुमार याच्या चित्रपटांना म्हणावा तसा धमाका करण्यात अजिबातच यश मिळत नाहीये. अक्षय कुमार हा मोठ्या संपत्तीचा मालक आहे. अक्षय कुमार याने त्याच्या आतापर्यंतच्या करिअरमध्ये अनेक हीट चित्रपट बॉलिवूडला दिली आहेत. अक्षय कुमार सोशल मीडियावरही चांगलाच सक्रिय असून आपल्या चाहत्यांसाठी खास फोटो आणि व्हिडीओ शेअर करतो.

काही दिवसांपूर्वीच अक्षय कुमारची पत्नी ट्विंकल खन्ना हिने एक पोस्ट शेअर करत हैराण करणारा खुलासा केला होता. तिने थेट म्हटले होते की, मला पिरियड्स येत नाहीत मी प्रेग्नंट तर नाही ना? त्यानंतर एकच चर्चा सुरू झाली की, अक्षय कुमार हा आता तिसऱ्यांदा बाप होणार आहे. चाहतेही सतत विचारताना दिसली की, खरोखरच ट्विंकल खन्ना बाळाला जन्म देणार का? 

आता नुकताच अक्षय कुमार याने एक मुलाखत दिलीये. या मुलाखतीमध्ये अक्षय कुमार याने मोठे खुलासे केले. यावेळी अक्षय कुमार याला विचारण्यात आले की, ट्विंकल खन्ना कधी मोबाईल चेक करते का? यावर अक्षय कुमार म्हणाला की, माझ्या कुटुंबात माझ्या मोबाईलचा पॉसवर्ड कोणालाही माहिती नाहीये, त्यामुळे मोबाईल ओपनच होत नाही. 

पुढे अक्षय कुमार याला विचारण्यात आले की, जर तुला एखाद्या व्यक्तीचा फोन चेक करायची संधी मिळाली तर कोणाचा करशील. यावर अक्षय म्हणाला, डायरेक्टर मुदस्सर अजीज यांचा मोबाईल चेक करायला मला आवडेल. ते खूप जास्त रोमांटिक पर्सन आहेत. आता अक्षय कुमार याच्या या विधानाची जोरदार चर्चा रंगताना दिसत आहे.

अक्षय कुमार हा आपल्या आरोग्याकडे विशेष लक्ष देतो. अक्षय कुमार डाएट व्यवस्थित फॉलो देखील करतो. संध्याकाळी सहानंतर अक्षय कुमार काहीच खात नाही. हेच नाही तर अक्षय कुमार याच्या दिवसाची सुरूवात सकाळी 4 ला होते. तो दररोज न चुकता व्यायाम देखील करतो. अक्षय कुमार हा मोठ्या संपत्तीचा मालक आहे.