Revealed | अक्षयचा ‘बेल बॉटम’ चित्रपट ओटीटीवर प्रदर्शित होणार?

अभिनेता अक्षय कुमारचा (Akshay Kumar) आगामी चित्रपट बेल बॉटम (Bell Bottom) रिलीज होण्यासाठी तयार आहे.

Revealed | अक्षयचा 'बेल बॉटम' चित्रपट ओटीटीवर प्रदर्शित होणार?
आम्ही चित्रपट निर्मात्यांच्या उत्तराची वाट पाहात आहोत, असे करणी सेनेने म्हटंले आहे. अक्षय कुमारने 2019 मध्ये त्याच्या वाढदिवसाच्या दिवशी या चित्रपटाची घोषणा केली होती.

मुंबई : अभिनेता अक्षय कुमारचा (Akshay Kumar) आगामी चित्रपट बेल बॉटम (Bell Bottom) रिलीज होण्यासाठी तयार आहे. हा चित्रपट प्रथम थिएटरमध्ये रिलीज करण्याचा विचार सुरू होता. मार्चमध्ये बेल बॉटम हा चित्रपट थिएटरमध्ये प्रदर्शित होणार होता पण त्यानंतर बातमी समोर आली की, अक्षयचा 2019 मधील चित्रपट सूर्यवंशी रिलीजच्या प्रतीक्षेत आहे. त्याची रिलीज तारीख 24 मार्च 2020 होती परंतु कोरोनामुळे चित्रपट रिलीज होऊ शकला नाही. आता बेल बॉटम चित्रपटाविषयी नवीन बातमीसमोर येत आहे. (Actor Akshay Kumar’s upcoming film Bell Bottom is likely to be released on OTT)

बेल बॉटम चित्रपट थिएटरचे रिलीज होण्याची शक्यता कमी आहे. आता हा चित्रपट थेट ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होऊ शकतो. बॉलिवूड हंगामाच्या रिपोर्टनुसार बेल बॉटमचे निर्माते जॅकी भगनानी यांनी आता हा चित्रपट लवकर प्रदर्शित करण्यासाठी अ‍ॅमेझॉन प्राइमशी चर्चा सुरू केली आहे. याआधीही अक्षयचा लक्ष्मी चित्रपट ओटीटी हॉटस्टारवर रिलीज झाला होता. बेल बॉटम अक्षयचा हेरगिरी करणारा थ्रीलर चित्रपट आहे यात अक्षय स्टायलिश लूकमध्ये जबरदस्त अ‍ॅक्शन करताना दिसणार आहे. या चित्रपटात अक्षयसोबत अभिनेत्री वाणी कपूरही दिसणार आहे.

अक्षय कुमारचा‘सूर्यवंशी’चा फर्स्ट लूक गेल्या वर्षी प्रदर्शित करण्यात आला होता. चित्रपट प्रदर्शन करण्याची तारीखही ठरवण्यात आली होती. अक्षय कुमारने स्वत: याबद्दलची माहिती दिली देखील दिली होती. अक्षय कुमारने आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवर या चित्रपटाचा फोटो शेअर केला होता. या चित्रपटात अक्षय कुमार एटीएस प्रमुखाच्या भूमिकेत दिसणार आहे. चित्रपटात अक्षयच्या भूमिकेचे नाव सूर्यवंशी आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन रोहित शेट्टीने केले आहे.

संबंधित बातम्या : 

हे पोस्टर नाही ‘जाळ’ आहे, दिव्या दत्ताचा ‘अवतार’ खरंच धाकड आहे !

Gulabo sitabo च्या ओटीटी रिलीजनंतर आयुष्यमान खुराणाचा चित्रपट आता थिएटरमध्ये प्रदर्शित होणार!

‘केजीएफ 2’ चा जबरदस्त टीझर रिलीज झाल्यापासून चाहत्यांची उत्सुकता शिगेला…!

(Actor Akshay Kumar’s upcoming film Bell Bottom is likely to be released on OTT)

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI