‘केजीएफ 2’ चा जबरदस्त टीझर रिलीज झाल्यापासून चाहत्यांची उत्सुकता शिगेला…!

'केजीएफ 2' चा जबरदस्त टीझर रिलीज झाल्यापासून चाहत्यांची उत्सुकता शिगेला...!

केजीएफ (KGF) सुपरहिट चित्रपटाचा दुसरा भाग केजीएफ 2 चा टीझर 8 जानेवारी 2021 रोजी प्रदर्शित झाला आहे.

शितल मुंडे, टीव्ही 9 मराठी डिजीटल

|

Jan 20, 2021 | 11:13 AM

मुंबई : ‘केजीएफ’ (KGF) सुपरहिट चित्रपटाचा दुसरा भाग केजीएफ 2 चा टीझर 8 जानेवारी 2021 रोजी प्रदर्शित झाला आहे. चित्रपटाचा टीझर पाहून केजीएफचे चाहते खूप उत्साही झाले आहेत. दिग्दर्शक प्रशांत नील यांनी पोस्टर शेअर केले होते आणि लिहिले होते की, ‘8 जानेवारीला सकाळी 10.18 वाजता साम्राज्याची झलक पहा. यासाठी कदाचित वेळ लागला असेल, परंतु आम्ही आणखी स्ट्रॉन्ग होऊ आला आहोत’ सुपरस्टार यशच्या वाढदिवसाच्या एक दिवस अगोदर भेट स्वरूपात 7 जानेवारीला चित्रपटाचा टीझर प्रदर्शित करण्यात आला होता. (Fans eager to see KGF2 superhit movie)

केजीएफ 2 च्या टीझरमध्ये काय? टीझरबद्दल बोलताना सुरुवातीला आपल्याला रॉकीची आई आणि तिचे बालपण दिसेल. रॉकीच्या आईने त्याला कसे वाढविले, तो कसा मोठा झाला आणि त्याने आपल्याला जे वचन दिले होते ते तो आता पूर्ण केले. टीझरमध्ये रविना टंडन यांना खासदार म्हणून दाखवले जात आहे. तर तिथेच संजय दत्त पाहायला मिळणार आहे. अद्याप त्याचा चेहरा समोर आलेला नाही. पहिला भाग संपल्यानंतर तेथून ‘केजीएफ-2’ची सुरुवात होणार आहे.

k.g.f 2

दुसऱ्या सीक्‍वेलमध्ये यशसह संजय दत्त आणि रविना टंडन यांनी मुख्य भूमिका साकारल्या आहेत. यश आणि संजय दत्त यांच्यातील संघर्ष पाहण्यास मिळणार आहे. हा चित्रपट 2021 मध्ये प्रदर्शित होण्याची शक्‍यता आहे. दरम्यान, ‘केजीएफ चॅप्टर -1’ने बॉक्‍स ऑफिसवर खूप चांगली कमाई केली होती. या चित्रपटामुळे यशला खूप प्रसिद्धी मिळाली होती. यामुळे या चित्रपटाच्या सीक्‍वलची चाहते उत्सुकतेने वाट पाहत आहेत. या चित्रपटाचा सिक्वल कन्नड, हिंदी, तेलगू, तामिळ आणि मल्याळम भाषांमध्ये प्रदर्शित होणार तर आहेच मात्र, आता हा चित्रपट विविध देशांमध्ये देखील प्रदर्शित होण्याची शक्यता आहे.

यशला पाहिल्यावर हे स्पष्ट झाले आहे की तो आपली सुरुवातीची कथा संपवून परत आला आहे. यावेळी त्याची आणखी चांगली शैली चाहत्यांकडून पाहायला मिळणार आहे.केजीएफ 2 च्या रिलीजची तारीख अद्याप जाहीर केलेली नाही. या सिनेमात संजय दत्त, यश, रवीना टंडन, श्रीनिधी शेट्टी, प्रकाश राज यांच्यासह इतर स्टार्सनी काम केले आहे. याचे दिग्दर्शन प्रशांत नील यांनी केले असून, चित्रपटाचे चाहते बर्‍याच दिवसांपासून याची वाट पाहत आहेत.

संबंधित बातम्या : 

So Expensive | सोनाक्षी सिन्हाने घातला एवढा महागडा ड्रेस, किंमत ऐकून विश्वास नाही बसणार…!

KGF 2 चा धमाल टीझर, प्रेक्षकांच्या उदंड प्रतिसादानंतर आता इंटरनॅशनल रिलीजचा प्लॅन!

(Fans eager to see KGF2 superhit movie)

Follow us on

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें