KGF 2 चा धमाल टीझर, प्रेक्षकांच्या उदंड प्रतिसादानंतर आता इंटरनॅशनल रिलीजचा प्लॅन!

केजीएफ (KGF) सुपरहिट चित्रपटाचा दुसरा भाग केजीएफ 2 चे पहिले टीझर प्रदर्शित झाले आहे.

  • टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम
  • Published On - 9:29 AM, 20 Jan 2021
KGF 2 चा धमाल टीझर, प्रेक्षकांच्या उदंड प्रतिसादानंतर आता इंटरनॅशनल रिलीजचा प्लॅन!

मुंबई : ‘केजीएफ’ (K.G.F) सुपरहिट चित्रपटाचा दुसरा भागचे पहिले टीझर प्रदर्शित झाले आहे. सुपरस्टार अभिनेता यशने काही दिवसांपूर्वी आपल्या आगामी ‘केजीएफ’या चित्रपटाचे टीझर शेअर केले होते याला प्रेक्षकांचा चांगलाच प्रतिसाद मिळाला. आता यश लवकरच चित्रपटाचा दुसरा टीझर रिलीज करणार आहे. टीझरला मिळालेल्या प्रतिसादामुळे यश आणि चित्रपटाचे दिग्दर्शक प्रशांत नील यांना सुखद धक्काच बसला आहे. आता दोघेही पुढील टीझर रिलीज करण्याची तयारी करत आहेत. पहिल्या टीझरला मिळालेला प्रतिसाद पाहून आता हा चित्रपट इंटरनॅशनल रिलीजचा प्लॅन करणे सुरू आहे. (KGF 2 Movie International Release Plan)

सुरूवातील चित्रपटाच्या भारतात 2000 प्रिंट्स जाहीर केला होत्या, आता त्या दुप्पट करण्यात येणार आहेत. कन्नड, हिंदी, तेलगू, तामिळ आणि मल्याळम भाषेतच हा चित्रपट प्रदर्शित होणार नसून आता हा चित्रपट बऱ्याच विदेशी भाषांमध्येही प्रदर्शित होणार आहे. यापूर्वी यशने चित्रपटाचा पहिला लूक शेअर केला होता. या पोस्टरमध्ये यशच्या तोंडात सिगारेट आहे आणि एका हाताने काहीतरी जड ओढून उभे राहण्याचा प्रयत्न करताना दिसत होता. हे पोस्टर शेअर करताना यशने लिहिले होते की, ‘साम्राज्याला पुन्हा तयार करताना’

यशसोबत संजय दत्त आणि रवीना टंडनदेखील या चित्रपटात दिसणार आहेत. चित्रपटात संजय खलनायक अधीरा आणि रवीना नेते रामिका सेनच्या भूमिकेत दिसणार आहे. केजीएफ चित्रपट 2020 मध्ये प्रदर्शित होणार होता, परंतु कोरोनामुळे चित्रपटाची तारीख पुढे ढकलण्यात आली होती. आता हा चित्रपट 2021 मध्ये प्रदर्शित होईल.

चाहत्यांना चित्रपटाबद्दल प्रचंड उत्सुकता आहे. चित्रपटाच्या प्रदर्शनाची लोक आतुरतेने वाट पाहात आहेत. या चित्रपटाच्याच्या निमित्ताने संजय दत्त आणि यश हे दोन्ही सुपरस्टार पहिल्यांदा एकत्र दिसणार आहेत. सूत्रांनी सांगितले की, ‘असं अजिबात वाटत नाहीये की, यश आणि संजू बाबा पहिल्यांदा एकत्र शूट करत आहेत. शूटींगदरम्यान दोघे चांगलेच सहज झाले होते. दोघांनीही शूटींग एन्जॉय केलं.

संबंधित बातम्या : 

वरुण नताशाच्या लग्नादिवशी ‘हे’ गोड कपलही अडकणार विवाहबंधनात

थिएटर मालकांना मदतीचा हात, दबंग खानचा ‘राधे’ चित्रपटगृहात प्रदर्शित होणार!

(KGF 2 Movie International Release Plan)