थिएटर मालकांना मदतीचा हात, दबंग खानचा ‘राधे’ चित्रपटगृहात प्रदर्शित होणार!

सलमान खान (Salman Khan) 'दबंग' या चित्रपटात शेवटी दिसला होता. आणि या चित्रपटानंतर आता सलमान 'राधे' (Radhe) चित्रपटात दिसणार आहे.

  • टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम
  • Published On - 18:36 PM, 19 Jan 2021
थिएटर मालकांना मदतीचा हात, दबंग खानचा 'राधे' चित्रपटगृहात प्रदर्शित होणार!

मुंबई : अभिनेता सलमान खान (Salman Khan) ‘दबंग’ या चित्रपटात शेवटी दिसला होता. आणि या चित्रपटानंतर आता तो ‘राधे’ (Radhe) या चित्रपटात दिसणार आहे. सलमानचे चित्रपट प्रदर्शित होतात तेव्हा त्याचे बहुतेक शो हाऊसफुल असतात. गेल्या काही दिवसांपूर्वी कोरोनामुळे चित्रपटगृहे बंद होती. आता चित्रपटगृहे उघडली आहेत, परंतू प्रेक्षक आता चित्रपटगृहाकडे फिरकत नाहीत. यामुळे चित्रपटगृह मालकांची पूर्वीप्रमाणे कमाई देखील होत नाही. प्रेक्षक चित्रपटगृहाकडे फिरकत नसल्यामुळे चित्रपट निर्माते चित्रपट ओटीटीवर प्रदर्शित करत आहेत. (Salman Khan’s upcoming film Radhe will be released in cinemas)

 

View this post on Instagram

 

A post shared by Salman Khan (@beingsalmankhan)

यामुळे चित्रपटगृहाचे मालक चांगलेच वैतागले आहेत आणि त्यांना मोठ्या नुकसानाला सोमोरे जावे लागत आहे. आता सलमान खान त्याच्या मदतीसाठी पुढे आला आहे. सोशल मीडियावर सलमानने जाहीर केलेले आहे की, त्याचा आगामी चित्रपट राधे चित्रपटगृहात प्रदर्शित करणार आहे. सलमानने लिहिले की, ‘सॉरी … मला सर्व चित्रपटगृहांच्या मालकांकडे लक्ष देण्यास वेळ लागला आणि मी एक मोठा निर्णय घेतला आहे त्यांची आर्थिक समस्या मी समजू शकतो.

यामुळे मी माझा आगामी चित्रपट राधे हा चित्रपटगृहात प्रदर्शित करून त्यांना मदत करणार आहे. सलमानने चित्रपटगृहांच्या मालकांना सांगितले की, चित्रपट पाहण्यासाठी येणाऱ्या प्रेक्षकांची सर्व काळजी त्यांनी घ्यावी. यंदा ईदवर राधे चित्रपट सर्वच चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटात सलमानसोबत मुख्य भूमिकेत दिशा पटानी, जॅकी श्रॉफ आणि रणदीप हूडा असतील. चित्रपटाचा टीझर काही दिवसांपूर्वी प्रदर्शित झाला होता.

संबंधित बातम्या : 

थप्पड ! महेश मांजरेकरच्या आयुष्यातला मुर्खपणा, वाचा काय आहे प्रकरण?

स्वातंत्र्य दिलंय म्हणून हिंदू धर्माची थट्टा करायची? ‘तांडव’ वेब सीरिजच्या निर्मात्यांवर रवी किशन भडकले

First Look | ‘धाकड’मध्ये अर्जुन रामपालचा कंगणाशी पंगा, जबरदस्त लूक आला समोर!

(Salman Khan’s upcoming film Radhe will be released in cinemas)