वरुण नताशाच्या लग्नादिवशी ‘हे’ गोड कपलही अडकणार विवाहबंधनात

वरुण नताशाच्या लग्नादिवशी 'हे' गोड कपलही अडकणार विवाहबंधनात

वरुण आणि नताशानंतर अभिनेता करण मेहरा आणि निधी सेठ यांनी लग्न करण्याचा निर्णय घेतलाय. दोन्ही सेलिब्रेटी कपल एकाच दिवशी सप्तपदी घेणार आहेत.

Akshay Adhav

|

Jan 20, 2021 | 7:30 AM

मुंबई : कोरोना संसर्गामुळे 2020 हे वर्ष सगळ्यांचंच नावडतं बनलं. या वर्षात सगळ्यांना घरात बंदिस्त व्हावं लागलं. अनेक गोड क्षणांना अनेक जण मुकले. पण आता 2021 या वर्षात आयुष्याची पुन्हा नवी सुरुवात करायची ती ही आपल्या साथीदाराबरोबर…बॉलिवूडच्या सिने अभिनेते-अभिनेत्रींनी हे ठरवलेलं दिसतंय. वरुण आणि नताशानंतर अभिनेता करण मेहरा आणि निधी सेठ यांनी लग्न करण्याचा निर्णय घेतलाय. दोन्ही सेलिब्रेटी कपल एकाच दिवशी सप्तपदी घेणार आहेत. (Actor Karan mehra Will Marry With Nidhi Seth)

येत्या 24 जानेवारीला वरुण धवन आणि नताशा दलाल विवाहबंधनात अडकणार आहे. त्याच दिवशी करण मेहरा आणि निधी सेठही आयुष्याच्या नव्या इनिंगला सुरुवात करणार आहेत. कोरोना साथीच्या संसर्गामुळे आपला विवाह समारंभ अगदी थाटामाटात न करता गुरुद्वारामध्ये करण्याचा निर्णय करण आणि निधीने घेतला आहे. लग्नाच्या दिवशीच संध्याकाळी आपल्या कुटुंबासोबत आणि जवळच्या मित्रांसोबत करण-निधी रिसेप्शन पार्टी इन्जॉय करतील.

लग्नाला फक्त 30 लोकांना निमंत्रण

“आम्ही लग्नाला केवळ 30 लोकांना निमंत्रण दिलंय.कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर सरकार आणि प्रशासनाने काही नियम घालून दिलेले आहेत. त्यामुळे ते पाळणं कर्मप्राप्त आहे. लग्नामध्ये ज्यांना सामिल होता येणार नाही त्या जवळच्या मित्रांसाठी आम्ही मुंबईत रिसेप्शन ठेवण्याचा प्लॅन करतोय. 2020 या वर्षाला आम्ही आयुष्यातून दूर ठेवणार आहोत. म्हणूनच 2021 च्या सुरुवातीलाच आम्ही लग्नबंधनात अडकण्याचा निर्णय घेतला. 24 जानेवारी ही तारीख आमच्यासाठी स्वप्नवत तारीख असेल की ज्या दिवशी मी आणि निधी एकमेकांच्या साथीने श्वास घेऊ…”, असं करण मेहरा म्हणाला.

करण मेहराचं याअगोदरही एक लग्न

करण मेहराने 2009 साली त्याची बालमैत्रीण देविकाबरोबर लग्न केलं होतं. परंतु दुर्दैवाने लग्नानंतर त्यांच्यात कौटुंबिक वाद होऊन त्यांची वेगळं होण्याचा निर्णय घेतला.

एका जाहिरातीच्या शुटींगप्रसंगी करण आणि निधीची ओळख झाली होती. ओळखीचं रुपांतर मैत्रीत आणि मैत्रीचं रुपांतर पुढे प्रेमात झालं. अगदी काहीच दिवसांनी निधी-करणने लग्नाचा निर्णय घेतला.

वरुण नताशा 24 जानेवारीला लग्नबंधनात अडकणार

वरुण धवन आणि नताशा दलाल हे दोघेही येत्या 24 जानेवारीला विवाहबंधनात अडकणार आहेत. अलिबागमध्ये हा विवाहसोहळा पार पडेल. कोरोना कायम राहणार आहे. त्यामुळे अजून किती वेळ वाट पाहणार, असेही त्यांनी सांगितले.

लॉकडाऊननंतर अनेकजण धुमधडाक्यात लग्न करत आहे. पण वरुण आणि नताशा असे करु शकत नाही. जर त्यांच्या लग्नात 50 हून अधिक पाहुणे उपस्थित राहिले, तर ते अडचणीत येतील. त्यामुळे या लग्नात केवळ जवळचे नातेवाईक उपस्थित असणार आहे.

कोण आहे नताशा दलाल?

नताशा दलाल एक प्रसिद्ध फॅशन डिझायनर आहे. तिने आतापर्यंत अनेक बॉलिवूडमधील सेलेब्रिटींसाठी ड्रेस डिझाईन केले आहेत. तसेच वरुण धवन आणि नताशा लहापणापासूनचे मित्र आहेत. नताशाने न्यूयॉर्कमधून फॅशन डिझाईनिंगचे शिक्षण घेतले आहे. सध्या ती मुंबईत आई -वडिलांसोबत राहते. नताशाचे वडील उद्योगपती असून आई गृहिणी आहे. विशेष म्हणजे नताशाचा आवडता अभिनेताही वरुण धवन आहे. तसेच ती स्केच आणि डॉग लव्हर आहे.

Actor Karan mehra Will Marry With Nidhi Seth

हे ही वाचा

कोरोनाचा बॉलिवूडला विळखा, आयफा सोहळा पुढे ढकलला, वरुण धवनचं विवाहस्थळ बदलणार?

वरुण धवन आणि नताशा दलालच्या लग्नाची तारीख ठरली?

Follow us on

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें