हे पोस्टर नाही ‘जाळ’ आहे, दिव्या दत्ताचा ‘अवतार’ खरंच धाकड आहे !

बॉलिवूड अभिनेत्री कंगना रनौतच्या (Kangana Ranaut) धाकड (Dhaakad) चित्रपटाची चाहते आतुरतेने वाट पाहत आहेत.

हे पोस्टर नाही 'जाळ' आहे, दिव्या दत्ताचा 'अवतार' खरंच धाकड आहे !

मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री कंगना रनौतच्या (Kangana Ranaut) धाकड (Dhaakad) चित्रपटाची चाहते आतुरतेने वाट पाहत आहेत. अलीकडेच कंगनाने तिचा फर्स्ट लूक शेअर करताना चित्रपटाची तारीख देखील जाहीर केली होती. त्यानंतर अर्जुन रामपालने (Arjun Rampal) देखील धाकड चित्रपटातील त्याचा फर्स्ट लूक शेअर होता. आता चित्रपटाचे तिसरे पोस्टर तरण आदर्श यांनी सोशल मीडियावर शेअर केले आहे यामध्ये दिव्या दत्त (Divya Dutta) दिसत आहे. या पोस्टरमध्ये दिव्या दत्त धीर गंभीर होऊन बसलेली दिसत आहे आणि तिचे केस मोकळे सोडलेले दिसत आहेत. (The third poster of Dhaakad movie was released)

अर्जुन रामपाल या चित्रपटात खलनायकाच्या भूमिकेत दिसणार असून त्याने या चित्रपटाचा पहिला लूक शेअर केला आहे. पोस्टरमध्ये अर्जुन रफ आणि टफ लूकमध्ये दिसत आहे. हे पोस्टर शेअर करताना अर्जुन रामपालने लिहिले की बूम, बुराइचे दुसरे नाव आहे रुद्रवीर, धाकड चित्रपट ऑक्टोबरला थिएटरमध्ये रिलीज होत आहे असे लिहिले होते. पोस्टरमध्ये अर्जुनच्या हातात बंदूक दिसत आहे. कंगनाने काही दिवसांपूर्वीच चित्रपटाचे पोस्टर शेअर केले होते.

त्या पोस्टरमध्ये कंगनाच्या हातात तलवार आणि जवळच मृतदेह पडलेले दिसत होते. हे पोस्टर शेअर करताना कंगनाने लिहिले होते की, ‘ निर्भय आणि क्रूर आहे. भारताचा पहिला महिला लीड अ‍ॅक्शन चित्रपट 1 ऑक्टोबर 2021 रोजी प्रदर्शित होईल.कंगना सध्या भोपाळमध्ये तिच्या आगामी धाकड (Dhaakad) चित्रपटाचे शूटिंग करत आहे. शूटिंग दरम्यान कंगनाला एका आंदोलनाचा सामना करावा लागला होता.

भोपाळमध्ये कंगनाच्या शूटच्या वेळी एका राजकीय गटाने कंगनाविरोधात जोरदार आंदोलन करत घोषणा दिल्या होत्या. त्याची मागणी होती की, कंगनाने भोपाळमध्ये शूटिंग करू नये, तिने भोपाळमधून परत जावे. मात्र, कंगना या आंदोलनाला न घाबरता शूटिंग करत आहे. भोपाळला कंगना धाकडचे अ‍ॅक्शन सीन येथे शूट करत आहे.

संबंधित बातम्या : 

Gulabo sitabo च्या ओटीटी रिलीजनंतर आयुष्यमान खुराणाचा चित्रपट आता थिएटरमध्ये प्रदर्शित होणार!

‘केजीएफ 2’ चा जबरदस्त टीझर रिलीज झाल्यापासून चाहत्यांची उत्सुकता शिगेला…!

(The third poster of Dhaakad movie was released)

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI