
बॉलिवूडवर राज्य करणारी सध्याची अभिनेत्री म्हटलं तर ती आहे दीपिका पदुकोण. इंडस्ट्रीमध्ये तिच्या कामासोबतच ती नेहमीच तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत असते. शक्यतो तिच्या अफेअरची बरीच चर्चा झाली. पण हे बऱ्याच जणांना माहित नसेल की दीपिका ही एक मॉडेल असताना ती एका अभिनेत्याच्या प्रेमात होती. दीपिकाने त्याला स्वत: प्रपोज केलं होतं. शिवाय त्यांनी एकमेकांना 2 वर्ष डेट केलं. मात्र त्या अभिनेत्याने दीपिकाशी ब्रेकअप केलं.आता या अभिनेत्याला याचा फार पश्चाताप होताना दिसत आहे.
दीपिका पदुकोणला अभिनेत्याने केलं होतं
हा अभिनेता तथा सुपरमॉडेल मुझम्मिल इब्राहिमन. ‘परदेसिया ये सच है पिया’ हे गाणे सर्वानाच आठवत असेल ज्यात ज्याने राखी सावंतही होती. आणि त्याच गाण्यानंतर ती प्रसिद्धीझोतात आली. या गाण्याचा नायक मॉडेल-अभिनेता मुझमिल इब्राहिम होता. आता एका मुलाखतीत त्याने त्याच्या आणि दीपिका पदुकोणच्या नात्याबद्दल, त्यांच्या 2 वर्षांच्या डेटींगबद्दल सांगितलं आहे. त्याने त्यांच्या नात्याबद्दलचे अनेक खुलासे या मुलाखतीत केले आहेत.
“दीपिकाने मला प्रपोज केलं होतं…”
मुजम्मिल नुकताच सिद्धार्थ कन्ननच्या शोमध्ये दिसला. यादरम्यान मुजम्मिलने दीपिकासोबतच्या त्याच्या नात्याबद्दल उघडपणे सांगितले. तो म्हणाला, ‘आम्ही दोन वर्षांपासून एकमेकांना डेट करत होतो. त्यावेळीही दीपिका खूप आत्मविश्वासू होती, कारण ती प्रकाश पदुकोणची मुलगी आहे, त्यामुळे सर्वजण तिच्याशी तसे परिचित होते. त्याने असेही उघड केले की दीपिकाने त्याला प्रपोज केलं होतं, परंतु त्याने दीपिकासोबत ब्रेकअप केलं”
“आज सगळे तिला ओळखतात पण आज मला कोणीही ओळखत नाही”
आपला मुद्दा मांडताना मुजम्मिल म्हणाला, ‘त्या वेळी मी एक स्टार होतो, माझी गाणी लोकप्रिय होती, इंडस्ट्रीत माझे नाव होते. त्यावेळी ती स्टार नव्हती. आज ती एक सुपरस्टार आहे. लोक तिचे चाहते आहेत. आज सगळे तिला ओळखतात पण आज मला कोणीही ओळखत नाही. मी तिचा खूप मोठा चाहता आहे. मला तिचे चित्रपट पहायला आवडतात. तिच्या भूमिका अद्भुत आहेत. आज तिने खूप प्रगती केली आहे. ती उत्तम काम करत आहे. पण सत्य तेच आहे.’
रणवीर सिंगशी लग्न केल्यानंतर…
जेव्हा मुझम्मिलला विचारण्यात आले की तो अजूनही तिच्याशी बोलतो का किंवा तिच्या संपर्कात आहे का, तेव्हा त्याने उत्तर दिले, ‘दीपिकाने 2019 मध्ये रणवीर सिंगशी लग्न केले. तिच्या लग्नापासून मी तिच्या अजिबात संपर्कात नाही. लग्नापूर्वी आम्ही कधीकधी बोलत असायचो. तसेच त्यांच्या ब्रेकअपनंतर ते एकमेकांचे छान मित्र झाले होते हेही त्याने सांगितलं.