Naga Chaitanya – Samantha Ruth Prabhu: समांथाशी घटस्फोटानंतर 4 वर्षांनी नागा चैतन्यचं मोठं पाऊल, डायरेक्ट कोर्टात धाव

Naga Chaitanya : नागा चैतन्य हा त्याच्या चित्रपटांपेक्षा खासगी जीवनामुळेच जास्त चर्चत असतो. आता हा अभिनेता पुन्हा चर्चेत आला असून, ते कारण त्याची पूर्व पत्नी, सामंथा रुथ प्रभूशी संबंधित आहे. नागा चैतन्यने दिल्ली उच्च न्यायालयात धाव घेतली. असं काय घडलं ?

Naga Chaitanya - Samantha Ruth Prabhu: समांथाशी घटस्फोटानंतर 4 वर्षांनी नागा चैतन्यचं मोठं पाऊल, डायरेक्ट कोर्टात धाव
नागा चैतन्य- समांथा रुथ प्रभू
| Updated on: May 30, 2026 | 12:10 PM

Naga Chaitanya News : दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील अभिनेता नागा चैतन्य आणि सामंथा रुथ प्रभू यांच्या घटस्फोटाला चार वर्षे झाली असली तरीही ते सतत चर्चेत असतात. आता दोघंही आपापल्या आयुष्यात खूप पुढे निघून गेले आहेत. नागा चैतन्यने शोभिताशी विवाह केला, तर समांथानेही राज निदिमोरूशी लग्नगाठ बांधली. मात्र घटस्फोटानंतर बऱ्याच काळाने, नागा चैतन्य आता पुन्हा चर्चेत आला आहे, त्याचं कारण म्हणजे त्याने आता सामंथा रुथ प्रभूशी संबंधित एका प्रकरणी दिल्ली उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. नागा चैतन्य याने, ऑनलाइन त्याच्या नावाचा, प्रतिमेचा आणि रूपाचा अनधिकृत वापर होण्यापासून आपल्या ‘पर्सनॅलिटी राइट्स’ (व्यक्तिमत्व हक्कांचे) चे संरक्षण मागितले आहे. त्याच्या कायदेशीर टीमने अश्लील AI-जनरेटेड कंटेंट, फेरफार केलेले व्हिडिओ आणि त्याचं वैयक्तिक आयुष्य दाखवणाऱ्या कंटेंटबद्दलही चिंता व्यक्त केली आहे.

सामंथा रुथ प्रभू आणि नागा चैतन्य यांच्या प्रकरणात एक नवीन वळण आले आहे. नागा चैतन्यने नुकतेच दिल्ली उच्च न्यायालयात धाव घेतली. नागा चैतन्य याच्या टीमने न्यायालयात दावा केला की, त्याचं नाव, इमेज आणि व्यक्तिमत्त्वाचा गैरवापर केला जात आहे. विशेषतः, AI-जनरेटेड पोर्नोग्राफिक कंटेटं, डीपफेक व्हिडिओ आणि सामंथा रुथ प्रभूसोबतच्या त्याचे संबंध, याबाबात खोट्या आणि बदनामीकारक मजकुरावर तात्काळ बंदी घालण्याची मागणी त्यांनी केली आहे.

नागा चैतन्यची कोर्टात धाव

AI-जनरेटेड आणि डिजिटल पद्धतीने फेरफार केलेल्या व्हिडिओंमध्ये नागा चैतन्यला खोट्या पद्धतीने आक्षेपार्ह स्थितीत दाखवण्यात आलं आहे, असं त्याचे वकील वैभव गग्गर यांनी न्यायालयात सांगितलं . तसेच वकिलांनी विशेषतः त्याची माजी पत्नी, समंथा रुथ प्रभू यांच्याशी संबंधित ऑनलाइन सामग्रीकडेही लक्ष वेधलं. या कंटेटमध्ये असा दावा करण्यात आला होता की नागा चैतन्य याने तिची फसवणूक केली आणि तिचे करिअर उद्ध्वस्त केले.

कोर्टाचं म्हणणं काय ?

“हे ट्रोलिंग आहे, ही योग्य टीका नाही” अशी बाजू नागा चैतन्य याच्या वकिलांनी मांडली. मात्र जे पब्लिक फिगर्स असतात, त्यांना अनेकदा छाननीचा सामना करावा लागतो, पण त्यालाही काही मर्यादा असता, अशी टिपण्णी न्यायमूर्ती ज्योती सिंह यांनी सुनावणीदरम्यान केली. याप्रकरणाची पुढील सुनावणी 30 सप्टेंबर रोजी होणापर असून तेव्हाच अंतरिम आदेश देण्याचे संकेत दिले.

Follow Us