AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Amravati Hospital Fire : दोषींची गय केली जाणार नाही, रुग्णालयातील आगीची सखोल चौकशी होणार – आरोग्यमंत्र्यांकडून मोठी घोषणा

अमरावती येथील जिल्हा स्त्री रुग्णालयाच्या नवजात शिशु अतिदक्षता विभागात पहाटेच्या सुमारास भीषण आग लागली. व्हेंटिलेटर स्फोटामुळे लागलेल्या या आगीत दुर्दैवाने तीन नवजात बाळांचा मृत्यू झाला, तर काही जखमी झाले. या घटनेने महाराष्ट्र हादरला आहे. आरोग्यमंत्र्यांनी घटनास्थळी भेट देऊन सखोल चौकशीसाठी समिती गठीत करण्याची घोषणा केली. आठ दिवसांत अहवाल सादर होऊन दोषींवर कारवाईचे आश्वासन दिले आहे.

Amravati Hospital Fire : दोषींची गय केली जाणार नाही, रुग्णालयातील आगीची सखोल चौकशी होणार - आरोग्यमंत्र्यांकडून मोठी घोषणा
आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांनी अमरावती येथील रुग्णालयातील दुर्घटनेची घेतली माहिती
| Updated on: Aug 24, 2026 | 10:22 PM
Share

सोमवारी पहाटे अमरावतीमध्ये घडलेल्या भयानक घटनेने फक्त शहरच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्र हादरला. अमरावतीच्या जिल्हा स्त्री रुग्णालयात नवजात शिशु अतिदक्षता विभागात पहाटे 3.30 च्या सुमारास अचानक आग लागली आणि क्षणात होत्याचं नव्हतं झालं. व्हेंटिलेटरमध्ये स्फोट होऊन आग लागली आणि बघता बघता तिने रौद्र रूप धारण केलं. या दुर्दैवी घटनेमध्ये तीन नवजात बाळांचा दुर्दैवी मृत्यू झाला तर काही बाळं ही जखमी झाली. त्यांच्यावर सुपर स्पेशालिटी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. अमरावतीच्या  रुग्णालयातील या घटनेने अख्ख्या राज्यात हळहळ व्यक्त होत असून ज्या व्हेंटिलेटरचा स्फोट झाला, ते कालबाह्य झाले होते का? त्यात काही तांत्रिक समस्या होत्या का? असे अनेक प्रश्न आता समोर आले आहेत. दरम्यान आगीच्या या दुर्दैवी घटनेनंतर आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर हे जिल्हा रुग्णालयात दाखल झाले, त्यांनी तेथे जाऊन पाहणी केली. आगीच्या या दुर्घटनेसंदर्भात त्यांनी संपूर्ण माहिती जाणून घेतली. ‘ नवजात शिशूच्या मृत्यूच्या सखोल चौकशी साठी समिती गठीत करणार’ अशी घोषणा आबिटकर यांनी माध्यमांशी बोलताना केली. आठ दिवसात त्या समितीचा अहवाल समोर येईल. दोषींवर निश्चितपणे कारवाई केली जाईल, असं आश्वासनही त्यांनी यावेळी दिलं.

काय म्हणाले प्रकाश आबिटकर ?

अमरावतीच्या रुग्णालयात ती घटना घडली ती अतिशय दुर्दैवी आहे. याच दुर्दैवी घटनेतून आम्हाला काही गोष्टी शिकाव्या लागतील आणि जे यासाठी दोषी असतील त्यांना जबाबदार धरावं लागेल. व्हेंटिलेटरचा विषय असेल, इलेक्ट्रिसिटीचा विषय असेल, आमच्या यंत्रणेतला दोष असेल.. जे दोषी असतील त्यांची गय केली जाणार नाही. ही घटना अतिशय दुर्दैवी आहे, आम्ही बाकी सगळं करू, पण जी तीन बालकं गेली, त्यांच्या कुटुंबियांना जे दु:ख झालं, ते कशानेही भरून येणार नाही. याइतकं दुर्दैवी काहीच नाही, असं आबिटकर म्हणाले. या घटनेमागे नेमकी कोणती कारणं आहेत, याचा सखोल तपास करण्यात येणार असून दोषी आढळणाऱ्यांवर निश्चितपणे कारवाई केली जाईल, असं त्यांनी स्पष्ट केलं.

रुग्णालयातील फायर ऑडिट वेळेत झालं होतं का, त्यामध्ये काही त्रुटी किंवा विलंब झाला होता का, याचीही चौकशी केली जाणार आहे. रुग्णालयातील कोणत्याही प्रकारच्या अनियमिततेमुळे ही दुर्घटना घडली असल्यास त्याची जबाबदारी निश्चित केली जाईल, असंही त्यांनी सांगितले. फायर ऑडिटच्या अनुषंगाने पुढील कार्यवाहीसाठी मंत्रालयात विशेष बैठक घेण्यात येणार आहे. राज्यातील रुग्णालयांमधील अग्निसुरक्षा व्यवस्था अधिक सक्षम करण्यासाठी आवश्यक उपाययोजना करण्यावर या बैठकीत चर्चा होणार असल्याचं त्यांनी नमूद केलं.

या संपूर्ण प्रक्रियेत पारदर्शकता ठेवण्याचा सरकारचा प्रयत्न असल्याचेही आरोग्यमंत्र्यांनी स्पष्ट केले. दुर्घटनेची सखोल चौकशी करण्यासाठी सात सदस्यीय समिती स्थापन करण्यात आली आहे. समितीच्या अहवालातून दुर्घटनेमागील नेमके कारण आणि संभाव्य जबाबदारी स्पष्ट होईल अशी अपेक्षा आहे.

Follow Us
मोदीजी, बीपी चेक करत राहा; अभिजीत दीपकेंचा पंतप्रधानांना टोला
Abhijeet Dipke : मोदीजी, बीपी चेक करत राहा; अभिजीत दीपकेंचा पंतप्रधानांना टोला, मेट्रो-रेल्वे बंदीवरून सरकारवर निशाणा
रेल्वे, मेट्रो बंदच्या निर्णयाविरोधात कोर्टात सुनावणी; कोर्टाने....
CJP Protest : सीजेपीचं उद्या दिल्लीत आंदोलन, रेल्वे, मेट्रो बंदच्या निर्णयाविरोधात कोर्टात सुनावणी; कोर्टाने केंद्राला काय सांगितलं?
गजानन कीर्तिकर ठाकरेंच्या सेनेत घरवापसी करणार? स्वतःच केला मोठा खुलासा
Gajanan Kirtikar : Shivsena : गजानन कीर्तिकर ठाकरेंच्या सेनेत घरवापसी करणार? स्वतःच केला मोठा खुलासा, म्हणाले...
एवढीच भीती वाटते तर...; दिल्लीतील बंदोबस्तावर दीपकेंचा सरकारला टोला
Abhijeet Dipake : एवढीच भीती वाटते तर...; दिल्लीतील बंदोबस्तावर अभिजित दीपकेंचा सरकारला टोला
ठाकरे की शिंदे? शिवसेना पक्ष आणि चिन्हाचा फैसला लवकरच....
Shivsena : ठाकरे की शिंदे? शिवसेना पक्ष आणि चिन्हाचा फैसला लवकरच, सर्वोच्च न्यायालयाकडून तारीख जाहिर
गाढव म्हणताय? आता ऐका माझं उत्तर; विवेकानंद पाटलांचा बण यांच्यावर....
Vivekanand Patil : गाढव म्हणताय? आता ऐका माझं उत्तर; विवेकानंद पाटलांचा नवनाथ बण यांच्यावर पलटवार, फडणवीसांनाही केलं आवाहन
CJP आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर दिल्लीत मोठे बदल, व्हिडिओ बघाच
CJP Delhi Andolan : CJP आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर दिल्लीत मोठे बदल, व्हिडिओ बघाच
दिल्लीतील इंडिया आघाडीच्या आंदोलनाकडे ठाकरे सेनेची पाठ?
Thackeray Group On Delhi Andolan : दिल्लीतील इंडिया आघाडीच्या आंदोलनाकडे ठाकरे सेनेची पाठ? राष्ट्रपतींच्या भेटीवेळीही प्रतिनिधी....
सहन होत नाही आणि सांगता येत नाही... एमपीएससी आंदोलनावरून राऊतांनी...
Sanjay Raut : सहन होत नाही आणि सांगता येत नाही... एमपीएससी आंदोलनावरून संजय राऊतांनी सरकारला घेरलं
SIR मुद्द्यावरून फडणवीसांचा काँग्रेसवर पलटवार; सिब्बलांचा जुना व्हिडिओ
Devendra Fadnavis : SIR मुद्द्यावरून फडणवीसांचा काँग्रेसवर पलटवार; कपिल सिब्बलांचा जुना व्हिडिओ शेअर करत म्हणाले...