AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

आता इराणला हरवणे अशक्य ? अमेरिकेशी युद्ध सुरु असताना इराणला गवसला मोठा खजाना…

अमेरिकेने आर्थिक निर्बंध आणि इन्फ्रास्टक्चरवर केलेल्या हल्ल्याने इराणाला मोठा धक्का बसलेला असताना इराणाला आता अचनाक एक ऊर्जा संकटातून सुटका करणारा एक मार्ग सापडला आहे.

आता इराणला हरवणे अशक्य ? अमेरिकेशी युद्ध सुरु असताना इराणला गवसला मोठा खजाना...
mojtaba and trump
| Updated on: Aug 24, 2026 | 3:57 PM
Share

गेल्या काही महिन्यांपासून अमेरिका आणि इस्रायलच्या सैन्य कारवाईत इराणच्या एनर्जी इन्फास्ट्रक्चरला मोठे नुकसान झाले आहे.त्यामुळे इराणला वीज कपाती सारख्या संकटाचा सामना करावा लागत आहे. अमेरिकेने आता होर्मुझवर नाकाबंदी करुन इराणला अडचणीत आणले आहे. तसेच अमेरिका आणि इराणचा शांतता करार संकटात सापडला आहे. अशात आता इराणला एक मोठे यश मिळालेले आहे.

अमेरिकेने आर्थिक निर्बंध आणि इन्फ्रास्टक्चरवर केलेल्या हल्ल्याने इराण संकटात असताना त्यांना आता एक ऊर्जा संकटातून सुटका मिळवणारा मार्ग सापडला आहे.

इराणच्या दक्षिण फारस प्रांतात २१२ अब्ज घट मीटरहून ( ७.५ ट्रिलियन क्युबिक फूट )जास्त क्षमतेचा नैसर्गिक गॅसचा साठा सापडला आहे. इराणचे तेल मंत्री मोहसेन पाकनेझाद यांनी देशाच्या राष्ट्रीय टेलिव्हीजनवर या संदर्भात घोषणा केली आहे. या शोधलेल्या तेल भांडारातून १६० अब्ज घट मीटर ( ५.७ अब्ज क्युबिक फूट ) रिकव्हरी होऊ शकते असे तेल मंत्री मोहसेन पाकनेझाद यांनी जाहीर केले आहे. त्यांनी या साठ्या देशांच्या भावी ऊर्जा सुरक्षेसाठी महत्वाचा साठा असे म्हटले आहे.

इराणसाठी का महत्वाचा आहे गॅस साठा ?

हा स्वीट नैसर्गिक गॅस आहे. ज्यात हायड्रोजन सल्फाईडचे प्रमाण नसल्यातच जमा आहे. यामुळे गॅसचे रिफायनिंग आणि रिकव्हरीमध्ये लागणारा खर्च खूपच कमी येतो असे पाकनेजाद यांनी म्हटले आहे.

इराणला हरवणे अशक्य झाले ?

इराण जरी जगातील सर्वात मोठ्या गॅस साठा असलेल्या देशांपैकी एक असला तरी या नव्या साठ्या शोधाने अमेरिकेसोबत सुरु असलेल्या युद्धमय संघर्षाचे स्वरुप रातोरात काही बदलणे सोपे नाही. निर्बंध आणि आर्थिक संकटाच्या कारणाने इराणला या मोठ्या साठ्याला व्यावसायिक रुपाने शोधून काढणे आणि रिफायनरीपर्यंत पोहचवण्यासाठी आधुनिक तंत्र आणि परदेशी गुंतवणूकीची गरज आहे. गेल्या काही काळापासून सैन्य हल्ल्याच्या कारणाने इराणच्या एनर्जी इन्फास्क्ट्रचरला मोठे नुकसान झाल्याने घरगुती वीज कपातीचे संकट सुरु आहे.

अमेरिका आणि इराण दरम्यान वक्तव्य

इराणमध्ये सापडलेल्या  या नव्या नैसर्गिक साठ्यामुळे दोन्ही देशात सध्या शाब्दीक युद्ध आणखीनच वाढले आहे. अलिकडेच अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी सोशल मीडियावर इराणला मदत करणाऱ्या देशांच्या विरोधात आतापर्यंतची सर्वात मोठे आर्थिक मोहिम सुरु करण्याची घोषणा करत यास “ECONOMIC D-DAY” असे म्हटले आहे.

Follow Us
दिल्लीतील आंदोलनात जनसागर! राहुल गांधींच्या महामोर्चाला उस्फुर्त...
दिल्लीतील आंदोलनात जनसागर! राहुल गांधींच्या महामोर्चाला उस्फुर्त प्रतिसाद
ठाकरे बंधूंवरील गुन्ह्यांच्या निषेधार्थ तेजस ठाकरेंच्या नेतृत्वाखाली..
ठाकरे बंधूंवरील गुन्ह्यांच्या निषेधार्थ तेजस ठाकरेंच्या नेतृत्वाखाली दादरमध्ये मूकमोर्चा; शिवाजी पार्करही आंदोलन!
उदय सामंतांचा MPSC आयुक्तांच्या राजीनाम्यावर मोठा खुलासा; महायुतीतील..
उदय सामंतांचा MPSC आयुक्तांच्या राजीनाम्यावर मोठा खुलासा; महायुतीतील समन्वयावरही भाष्य!
पक्षचिन्ह गैरसमजामुळे लाखो मत गमावले, ठाकरे गटातील नेत्याचा आरोप
धनुष्यबाणाच्या गैरसमजामुळे दीड लाख मतांचा फटका अन् पक्ष... ठाकरे गटातील नेत्याचा अजब आरोप
सर्वोच्च न्यायालयाच्या दिशेने इंडिया आघाडीचा मोर्चा; राहुल गांधी...
सर्वोच्च न्यायालयाच्या दिशेने इंडिया आघाडीचा मोर्चा; राहुल गांधी, प्रियंका गांधी मैदानात, ज्ञानेश कुमार यांच्याविरोधात याचिका दाखल!
मोठी बातमी! ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्यासाठी मनसे आक्रमक;
मोठी बातमी! ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्यासाठी मनसे आक्रमक; राज्यभर स्वाक्षरी मोहीम, नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
अखिलेश यादवांचा भाजप आणि निवडणूक आयोगावर गंभीर आरोप; ज्ञानेश कुमार...
अखिलेश यादवांचा भाजप आणि निवडणूक आयोगावर गंभीर आरोप; ज्ञानेश कुमार यांना हटवण्याची मागणी!
राष्ट्रपतींनी पुरावे मागितले, राहुल गांधी देऊ शकले नाही, अन् आता...
Anurag Thakur on Rahul Gandhi | राष्ट्रपतींनी पुरावे मागितले, राहुल गांधी देऊ शकले नाही, अन् आता... भाजप मंत्र्याने थेटच सांगितलं
पाकिस्तानातील हिंगलाज मातेचं महाराष्ट्रात स्वयंभू मंदिर! नाशिकच्या...
पाकिस्तानातील हिंगलाज मातेचं महाराष्ट्रात स्वयंभू मंदिर! नाशिकच्या या शक्तिस्थळाचा इतिहास थक्क करणारा
त्यांच्यावर सर्वांना विश्वास...MPSC कारभारात तुकाराम मुंढेंची नियुक्ती
त्यांच्यावर सर्वांनाच विश्वास आहे, मात्र... एमपीएससी कारभारात तुकाराम मुंढेंची नियुक्ती होताच काँग्रेस नेत्याचे विधान