AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

इराणचा अमेरिकेच्या मित्रावर भीषण हल्ला, मध्य पूर्वेत खळबळ, नागरिकांना अलर्ट जारी…

UAE News: युएईच्या हवाई संरक्षण यंत्रणेने देशाच्या दिशेने येणाऱ्या क्षेपणास्त्राचा धोका ओळखला आणि त्यांना वेळीच पाडले असे संयुक्त अरब अमिरातीच्या संरक्षण मंत्रालयाने म्हटले आहे. आपल्या सार्वभौमत्वाचे रक्षण करण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत असेही त्यांनी म्हटले आहे.

इराणचा अमेरिकेच्या मित्रावर भीषण हल्ला, मध्य पूर्वेत खळबळ, नागरिकांना अलर्ट जारी...
| Updated on: Aug 18, 2026 | 11:46 PM
Share

पश्चिम आशियात अमेरिका आणि इराण यांच्या दरम्यान तणाव वाढला आहे. आता इराणची नजर पुन्हा संयुक्त अरब अमिरात (UAE)कडे वळली आहे. युएईच्या संरक्षण मंत्रालयाने एक्सवर पोस्ट करत सांगितले की एअर डिफेन्स सिस्टीमने देशाच्या येणाऱ्या क्षेपणास्राच्या धोक्यांना डिटेक्ट केले आहे.या दरम्याने दुबईतील नागरिकांना त्यांच्या फोनवर इमर्जन्सी मिसाईल अलर्ट जारी केला आहे. आणि त्यांना सरकारच्या आदेशाचे पालन करण्यास सांगितले आहे.

‘UAE आपले सार्वभौमत्वाच्या संरक्षणासाठी प्रतिबद्ध

युएई्च्या संरक्षण मंत्रालयाने स्पष्ट केले आहे की विभागात येणारे तीव्र आवाज हे एअर डिफेन्स सिस्टीमने हवेतच नष्ट केलेल्या मिसाईलचे असल्याचे म्हटले आहे. सरकारने स्पष्ट केले आहे की संरक्षण मंत्रालय कोणत्याही धोक्याला उत्तर देण्यासाठी आणि संयुक्त अरब अमिरातचे सार्वभौमत्व, सुरक्षा आणि स्थिरतेचे संरक्षण करण्यासाठी आपल्या संपूर्ण तत्परतेला दुजोरा देत आहे. मात्र, काही वेळाने एक दुसरा अलर्ट जारी करुन लोकांना दिलासा दिला आहे. दुसऱ्या संदेशात म्हटले गेले आहे की आता धोका टळला आहे आणि स्थिती पूर्णपणे सुरक्षित आहे.

UEA संरक्षण मंत्रालयाने दावा केला की इराणने युएईवर दोन बॅलेस्टिक क्षेपणास्रे डागली. युएई सरकारने म्हटले आहे की आम्ही आधीही मिसाईलच्या धोक्या संदर्भात इशाऱ्याबाबत सांगितले होते. एअर डिफेन्स सिस्टीमने इराणकडून युएईच्या दिशेने डागलेल्या दोन बॅलेस्टिक मिसाईलचा शोध घेण्यात यश मिळवले आहे. पहिल्या मिसाईल समुद्र सीमेच्या बाहेर कोसळली.तर दुसरी सीमेच्या आत कोसळली.

इराणसोबत चर्चा नाही : ट्रंप

अमेरिका आणि इराण दरम्यान कोणतीही चर्चा सुरु नाही आणि पुढेही चर्चेची कोणतीही योजना नाही असे अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटले आहे. ट्रम्प यांनी सोशल मीडियावर पोस्ट करुन स्ट्रेट ऑफ होर्मुझला अमेरिकेची टेरिटरी म्हटले आहे. धोरणात्मक दृष्ट्या महत्वाच्या असलेल्या होर्मुझ स्ट्रेटमध्ये जहाजांचे येजा संपूर्णपणे सुरु आहे आणि पाण्यात पेरलेले सुरुंगांना हटवण्यात आले आहे.

इराणची आक्रमक निती

इराणने समुद्री मार्ग बंद करण्याचा दावा केला होता त्यावर डोनाल्ड ट्रम्प यांनी हे वक्तव्य केले होते. रॉयटर्सच्या बातमीनुसार दोन्ही देशात दरम्यान अस्थायी युद्धविराम समाप्त झाल्याने आणि राजकीय पेच निर्माण झाल्याने इराणच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने म्हटले आहे की तेहराण आता संपूर्ण आक्रमक सैन्य रणनिती कडे वळत आहे. या संघर्षाला समाप्त करण्याची आशा संपल्याने आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच दरात पुन्हा उसळी आली आहे. जागतिक शेअर बाजारात घसरण झाली आहे. आणि अमेरिकेसह अनेक मोठ्या अर्थव्यवस्थात कर्ज घेण्याचा खर्च दशकाच्या उच्च स्तरावर पोहचला आहे.

Follow Us
मी पुन्हा येईल, मी... फडणवीसांच्या इशाऱ्यावर दिपकेंचं प्रत्युत्तर
Abhijeet Dipake On CM Fadnavis : जेलमध्ये टाकलं तर... मीच तेच म्हणेल जे तुम्ही म्हणायचे; मी पुन्हा येईल, मी पुन्हा येईल...मुख्यमंत्री फडणवीसांच्या इशाऱ्यावर दिपकेंचं प्रत्युत्तर
खाकी वर्दी नको, तर खाकी...; सचिन शर्मांवर दिपकेंचा जोरदार हल्लाबोल
Abhijeet Dipke : खाकी वर्दी नको, तर खाकी...; सचिन शर्मांवर अभिजीत दिपकेंचा जोरदार हल्लाबोल
मुंबई पोलीस OG Pookie, कुच्चू पुच्चू; दिपकेंकडून मुंबई पोलिसांचं कौतुक
Abhijeet Dipke : मुंबई पोलीस OG Pookie, कुच्चू पुच्चू; अभिजीत दिपकेंकडून मुंबई पोलिसांचं तोंडभरून कौतुक
CJPच्या आंदोलनातील मिम पोस्टर्सची चर्चा; ‘ग्यानू मस्ट गो’पासून ते.....
CJPच्या आंदोलनातील मिम पोस्टर्सची चर्चा; ‘ग्यानू मस्ट गो’पासून ‘वोटचोर ग्यानू’पर्यंत भन्नाट पोस्टर्स होतायेत व्हायरल
दिशा सालियन प्रकरणात हीच भूमिका का घेत नाही?; शिरसाटांचा विरोधकांना..
Sanjay Shirsat : दिशा सालियन प्रकरणात हीच भूमिका का घेत नाही?; संजय शिरसाटांचा विरोधकांना थेट सवाल, पुढे म्हणाले...
CJPच्या आंदोलनाला महाराष्ट्रभरातून कार्यकर्त्यांची गर्दी, VIDEO बघाच..
Mumbai CJP Protest : ज्ञानेश कुमारांविरोधात शिवाजी पार्कवर रणकंदन; CJPच्या आंदोलनाला महाराष्ट्रभरातून कार्यकर्त्यांची गर्दी, VIDEO बघाच...
परवानगी नाकारली, तरी शिवाजी पार्कवर प्रचंड गर्दी....
Mumbai CJP Protest : परवानगी नाकारली, तरी शिवाजी पार्कवर प्रचंड गर्दी;  ज्ञानेश कुमारांच्या राजीनाम्यासाठी CJPचं जेलभरो आंदोलन
हे आंदोलन म्हणजे..; आशिष शेलारांचा आंदोलकांवर थेट घणाघात, पुढे म्हणाले
Ashish Shelar : हे आंदोलन म्हणजे....; आशिष शेलारांचा आंदोलकांवर थेट घणाघात, पुढे म्हणाले...
व्यापाऱ्यांचा UPI शुल्काला विरोध. काळ्या दिवाळीचा इशारा
Video : व्यापाऱ्यांचा UPI शुल्काला विरोध. काळ्या दिवाळीचा इशारा
Video : ठाकरे बंधूंवर विखे पाटलांनी साधला निशाणा
Video : राजकीय प्रतिमा परत मिळवण्यासाठी ठाकरे बंधूं..., विखे पाटलांनी साधला निशाणा