AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मराठी सक्तीवरून प्रकरण पेटलं! अमराठी रिक्षा चालकाकडून मराठी भाषिकाला मारहाण; व्हिडीओ व्हायरल

मराठी सक्तीवरून प्रकरण पेटलं! अमराठी रिक्षा चालकाकडून मराठी भाषिकाला मारहाण; व्हिडीओ व्हायरल

| Updated on: Aug 24, 2026 | 1:07 PM
Share

कांदिवली येथे एका मराठी रिक्षाचालकाला अमराठी रिक्षाचालकांनी मारहाण केल्याची घटना समोर आली आहे. प्रकाश शेजवळ या चालकाला रिक्षा बंद न केल्याच्या कारणावरून मारहाण झाली. मनसेने हस्तक्षेप करत एका हल्लेखोराला पोलिसांच्या ताब्यात दिले आहे. या प्रकरणी एफआयआर दाखल करण्यात आला असून, कडक कारवाईची मागणी होत आहे.

मुंबईतील कांदिवली येथे एका मराठी रिक्षाचालकाला अमराठी रिक्षाचालकांनी मारहाण केल्याचा प्रकार समोर आला आहे. प्रकाश बंडू शेजवळ असे मारहाण झालेल्या रिक्षाचालकाचे नाव आहे. हिंदुस्तान नाका परिसरात भाडे घेऊन जात असताना, काही अमराठी रिक्षाचालकांनी त्यांची रिक्षा अडवून त्यांना मारहाण केली. रिक्षाचा वायपर तोडण्यात आला आणि शेजवळ यांच्या ओठाला दुखापत झाली. हल्लेखोरांनी रिक्षा बंद ठेवण्यास सांगितले असता, शेजवळ यांनी आपण मराठी असून, संपाची कोणतीही माहिती नसल्याचे स्पष्ट केले. यानंतरही त्यांना मारहाण करण्यात आली.

या घटनेची माहिती मिळताच मनसेचे स्थानिक विभागप्रमुख दिनेश साळवी आणि त्यांचे कार्यकर्ते घटनास्थळी पोहोचले. त्यांनी एका हल्लेखोराला पकडून कांदिवली पोलिसांच्या ताब्यात दिले. पोलिसांनी या प्रकरणी एफआयआर (FIR) दाखल केला असून, पुढील तपास सुरू आहे. मनसेने या घटनेचा तीव्र शब्दात निषेध करत हल्लेखोरांवर कठोर कारवाईची मागणी केली आहे.

Published on: Aug 24, 2026 01:07 PM

Follow Us