शिवसेना कुणाची? आठ दिवसांचा युक्तिवाद शिवसेनेसाठी निर्णायक… अगामी सुनावणीआधीच वकीलांनी असं काय सांगितलं?
शिवसेना प्रकरणाची सुनावणी वेगात सुरू असताना, ॲडव्होकेट असीम सरोदे यांनी उद्धव ठाकरे यांना राजकीय विक्टिम म्हटले आहे. निवडणूक आयोग, राज्यपाल आणि विधानसभा अध्यक्षांनी संविधानासोबत बदमाशी केली असून, कायदेशीर सत्य उद्धव ठाकरेंच्या बाजूनं असतानाही त्यांना न्याय मिळाल्या नसल्याचा सरोदेंनी आरोप केला आहे.
शिवसेना प्रकरणाची सुनावणी सध्या वेगात सुरू आहे. यावर ॲडव्होकेट असीम सरोदे यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. सरोदेंच्या मते, निवडणूक आयोग, राज्यपाल आणि विधानसभा अध्यक्षांनी संविधानासोबत बदमाशी केली आहे. त्यांनी म्हटले आहे की, कायदेशीर सत्य उद्धव ठाकरेंच्या बाजूनं असतानाही, त्यांना असत्यच आहे अशी वागणूक दिली गेली.
सरोदे पुढे म्हणाले की, उद्धव ठाकरे हे एक महत्त्वाचे राजकीय विक्टिम वाटतात, ज्यांच्यावर प्रचंड अन्याय झाला आहे. हा अन्याय केवळ काही राजकीय गटांनीच केला नाही, तर गव्हर्नर, विधानसभा अध्यक्ष आणि भारताच्या निवडणूक आयोगानेही केला आहे. इतकेच नव्हे, तर सर्वोच्च न्यायालयाने या प्रकरणाला विलंब लावल्यामुळेही ठाकरेंवर अन्याय झाला असे सरोदेंनी म्हटले. त्यांची बाजू बरोबर असूनही त्यांना इतके वर्ष कोणताही न्याय मिळालेला नाही, अशी त्यांची भूमिका आहे.
Published on: Aug 24, 2026 12:12 PM
दोन दिवस पोलिसांनी रोखलं, तरी इंडिया आघाडी पुन्हा मैदानात; राहुल गांधी
MPSC आंदोलनाचा आठवा दिवस अन् पोलिसांचा मोठा इशारा; आंदोलनस्थळ रिकामं..
सत्ताधाऱ्यांना सद्बुद्धी मिळावी म्हणून राजघाटावर जाणार; खरगे आक्रमक...
नानांसोबत दोन फिल्म केल्या, तिसरी करायची होती पण…; ममता कुलकर्णी....

