
शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानची वेब सीरिज “बॅड्स ऑफ बॉलीवूड” नेटफ्लिक्सवर रिलीज झाली आहे. या सीरिजद्वारे त्याने दिग्दर्शक म्हणून मनोरंजन जगात प्रवेश केला आहे. त्याच्या या पहिल्याच सीरिजला प्रेक्षकांची चांगली पसंती मिळताना दिसत आहे. सोशल मीडियावर त्याबाबत अनेक फोटो आणि मीम्स देखील व्हायरल होत आहेत.
फोटोंमध्ये किंवा कॅमेऱ्यासमोर आर्यन हसताना दिसला नाही
दरम्यान, याच दरम्यान चाहत्यांनी आर्यन खानचं तर कौतुक केलंच आहे पण सोबतच तो फोटोंमध्ये किंवा कॅमेऱ्यासमोर हसताना मात्र दिसला नाही. त्याचा हसरा फोटो घेण्यासाठी पापाराझी देखील उत्सुक होते. पण त्यांना काही तो मोमेंट मिळाला नाही. आर्यन खानच्या चेहऱ्यावर हास्य पाहणे कठीणच वाटत होते. बर याबद्दल या सीरिजचा भाग असलेला अभिनेता तथा डान्सर राघव जुयाल याला देखील हा प्रश्न विचारला होता की आर्यन हसत का नाही? त्यावर त्याने उत्तर दिले होते की, “त्याने त्याचा अॅटीट्यूड असाच ठेवला आहे. त्याला हे पसंत आहे. पण मी त्याला कॅमेऱ्यासमोर एकना एक दिवस नक्कीच हसवेन.”
या व्यक्तीने अखेर आर्यनला हसवलं
पण आर्यनचा एक फोटो व्हायरल होत आहे. ज्यात तो खळखळून हसाताना दिसत आहे. त्याला हसवणारी व्यक्ती त्याची आई गौरी खान, किंवा वडील शाहरूख खान किंवा बॉबी देओल नाही तर हा दुसराच व्यक्ती आहे. आणि त्याने हे करून दाखवलं आहे. त्याने हसणाऱ्या आर्यन खानसोबत अखेर फोटो घेतला आहे.
आर्यनचा हसणारा फोटो जास्तच व्हायरल
हा व्यक्ती म्हणजे त्याच्याच बॅड्स ऑफ बॉलिवूड या वेब सीरिजमध्ये बॉबी देओलच्या मुलीचा बॉडीगार्ड आणि सहेर बंबाची भूमिका साकारणारा 7 फूट उंचीचा अभिनेता सुख ग्रेवाल आर्यन खानच्या चेहऱ्यावर हास्य आणण्यात यशस्वी झाला. सुखी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या अभिनेत्याने नुकतेच आर्यनसोबतचे फोटो शेअर केले आहेत. या फोटोंमध्ये आर्यन हसताना दिसत आहे.
युजर्सच्या प्रतिक्रिया
आर्यन खानला हसताना पाहून एका युजरने लिहिले, ‘भाऊ, मी त्याला पहिल्यांदाच हसताना पाहिले आहे’, दुसऱ्या युजरने लिहिले, ‘चक्क आर्यन खान हसत आहे’, तर आणखी एका युजरने लिहिले, ‘अरे या भाऊने त्याला हसवलं’, एका युजरने लिहिले, ‘फक्त सुखीच हे करू शकतो’. युजर्सनी देखील आर्यनला हसताना पाहून आनंद व्यक्त केला आहे.