रिक्षावाल्याने रस्त्यावरच केले चुकीचे कृत्य, अभिनेत्री घाबरली, थेट रस्ताच…

नुकताच एका अभिनेत्री धक्कादायक खुलासा केलाय. आता अभिनेत्रीच्या विधानाची जोरदार चर्चा रंगताना दिसली. एका रिक्षावाल्याने आपल्यासोबत नेमके काय केले हे सांगतानाच चक्क आता अभिनेत्री दिसली आहे. अभिनेत्रीच्या विधानाची जोरदार चर्चा ही रंगताना दिसत आहे.

रिक्षावाल्याने रस्त्यावरच केले चुकीचे कृत्य, अभिनेत्री घाबरली, थेट रस्ताच...
anita hassanandani
| Updated on: Sep 21, 2024 | 5:35 PM

प्रसिद्ध अभिनेत्री अनिता हसनंदानी ही गेल्या काही दिवसांपासून तिच्या खासगी आयुष्यामुळे जोरदार चर्चेत आहे. अनिता हसनंदानी हिने तिच्या आतापर्यंतच्या करिअरमध्ये अनेक हीट मालिकांमध्ये मुख्य भूमिका केल्या आहेत. मात्र, गेल्या काही दिवसांपासून अनिता हसनंदानी ही मोठ्या पडद्यापासून दूर आहे. अनिता हसनंदानीची सोशल मीडियावर जबरदस्त अशी फॅन फॉलोइंग बघायला मिळते. आपल्या खासगी आयुष्याबद्दल मोठे खुलासे करताना अनिता हसनंदानी ही दिसत आहे. अनिता हसनंदानी आणि एजाज खान हे अनेक वर्ष रिलेशनशिपमध्ये होते.

आता नुकताच अनिता हसनंदानी हिने एक मुलाखत दिलीये. या मुलाखतीमध्ये अनिता हिने अनेक मोठे खुलासे केले आहेत. अनिता हसनंदानी हिने एक हैराण करणारी घटना सांगितली आहे. अनिता हसनंदानी हिने सांगितले की, तिची आई रिक्षाने जाण्यासाठी तिला दहा रूपये दररोज देत. मात्र, बऱ्याचदा ती इतर मुलींसोबत शाळेतून चालत घरी जात.

अनिता हसनंदानी म्हणाली की, आम्ही ज्या रस्त्याने शाळेतून घरी जात तिथे एक रिक्षावाला कायमच असायचा. तो आम्हाला बघितले की, त्याची पॅंट काढत आणि त्याच्या प्राव्हेट पार्टला हात लावून आमच्याकडे अत्यंत वाईट नजरेने बघत. अनिता हसनंदानी म्हणाली की, त्या गोष्टीनंतर मी खूप जास्त घाबरले.

हेच नाही तर या सर्वप्रकाराला घाबरून मी रस्ताच बदलला होता. रस्ता बदलल्यानंतरही मला खूप जास्त भिती वाटत. कारण त्या रिक्षावाल्याला आमच्या शाळेचा रस्ता माहिती होता. पहिल्यांदाच याबद्दल खुलासा करताना अनिता हसनंदानी ही दिसली आहे. आता अनिता हसनंदानीने केलेल्या भाष्याची जोरदार चर्चा रंगताना दिसत आहे.

अनिता हसनंदानी ही अनेक वर्ष एजाज खानला डेट करत होती. मात्र, त्यांचे ब्रेकअप झाले. अनिता हसनंदानी हिने एजाज खानसाठी अनेक गोष्टी बदलल्या होत्या. हेच नाही तर ज्यावेळी तिचे ब्रेकअप झाले, त्यावेळी तिला मोठा धक्का बसला होता. यामधून बाहेर पडणे तिच्यासाठी नक्कीच सोपे नव्हते. एका मुलाखतीमध्ये अनिता हसनंदानी हिने म्हटले की, मला त्या ब्रेकअपमधून बाहेर पडल्यासाठी तब्बल एक वर्षांचा कालावधी लागला.