Anushka Sharma: अभिनेत्री अनुष्का शर्माला बिस्किटाचे ‘स्पेलिंग’ चुकीचे लिहिणे पडले महागात ; युझर्सने केले ट्रोल

अभिनेत्रीने एका ठिकाणी बिस्किटचे स्पेलिंग चुकीचे लिहिले, त्यानंतर नेटकऱ्यांनी तिला खूप ट्रोल केले. अनुष्का शर्माने तिच्या इन्स्टा स्टोरीवर पोस्ट टाकत लिहिले की, 'माझ्या चुकीच्या स्पेलिंगमुळे कोणी नाराज झाले असेल तर मी त्या सर्व लोकांची माफी मागू इच्छिते.

Anushka Sharma: अभिनेत्री अनुष्का शर्माला बिस्किटाचे स्पेलिंग चुकीचे लिहिणे पडले महागात ; युझर्सने केले ट्रोल
Anushka Sharma
Image Credit source: Instagram
| Updated on: Sep 09, 2022 | 5:17 PM

बॉलिवूड अभिनेत्री अनुष्का शर्मा (Anushka Sharma)सध्या यूकेमध्ये तिच्या आगामी ‘चकदा एक्सप्रेस’ (Chakda Express)चित्रपटाच्या शूटिंगमध्ये  व्यस्त आहे. आपल्या व्यस्त शूटिंगमधून सोशल मिडियाद्वारे चाहत्यांच्या संपर्क राहताना दिसून येत आहे. तिने नुकताच एका बिस्किटांचा रिव्हूय केला होता. यामध्ये  म्हटले होते की ‘मला ही बिस्किटे अधिक आवडली असे तिने आपल्या रिव्ह्यूव्हमध्ये म्हटले होते’  मात्र सोशल मीडियावर(Social media) ही गोष्ट सांगत असताना अनुष्काकडून एका गोष्टीची चूक झाली अन तिला ट्रोलिंगचा सामना करावा लागला . यानंतर तिने चाहत्यांची माफी मागितली आहे.

बिस्किटचे स्पेलिंग चुकीचे लिहिले

तर झाले असे कि अनुष्काने आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटच्या स्टोरीवर एक नोट शेअर केली, ज्यामध्ये तिने सांगितले की ती बिस्किटचा रिव्ह्यूव्ह करणार आहे. यानंतर त्यांनी एकामागून एक अनेक सामान्य बिस्किटांचे फोटो शेअर केले.यासोबतच अनुष्काने तिला कोणते बिस्किट आवडले आणि कोणते नाही हे देखील सांगितले. अनुष्काने अनेक बिस्किटांना पाचपैकी फक्त दोन नंबर दिले आहेत, तर काहींनी तीन नंबरही दिले आहेत. पण यादरम्यान, अभिनेत्रीने एका ठिकाणी बिस्किटचे स्पेलिंग चुकीचे लिहिले, त्यानंतर नेटकऱ्यांनी तिला खूप ट्रोल केले. अनुष्का शर्माने तिच्या इन्स्टा स्टोरीवर पोस्ट टाकत लिहिले की, ‘माझ्या चुकीच्या स्पेलिंगमुळे कोणी नाराज झाले असेल तर मी त्या सर्व लोकांची माफी मागू इच्छिते.

इन्स्टाग्राम अकाऊंटच्या स्टोरीवर एक नोट शेअर केली

क्रिकेटर झुलन गोस्वामीची भूमिका साकारणार

‘चकदा एक्स्प्रेस’ या चित्रपटात क्रिकेटर झुलन गोस्वामीच्या कर्तृत्वासोबतच क्रिकेटच्या प्रवासातील त्यांचा वैयक्तिक ते शैक्षणिक संघर्षही दाखवण्यात येणार आहे. अनुष्का शर्मानेही झुलन गोस्वामीच्या भूमिकेत स्वत:ला सामावून घेण्यासाठी खूप मेहनत घेतली आहे.या चित्रपटाद्वारे अनुष्का बऱ्याच दिवसांनी पडद्यावर परतत आहे. अनुष्का अखेरची 2018 मध्ये ‘झिरो’मध्ये अभिनेता शाहरुख खानसोबत दिसली होती.