ही प्रसिद्ध मराठमोळी अभिनेत्री होती सचिन तेंडुलकरच्या प्रंचड प्रेमात; लग्नासाठी करायचं होतं प्रपोज, प्लॅनही होता रेडी,पण त्याआधीच

सचिन तेंडुलकरचा चाहता नाही असा एकहीजण भेटणार नाही. अगदी सामान्यांपासून ते कलाकारांपर्यंत. अशीच एक प्रसिद्ध मराठी अभिनेत्री सचिनच्या प्रचंड प्रेमात आहे. आजही तिला सचिन तेवढाच आवडतो. तिला सचिनला प्रपोज करायचं होतं. या अभिनेत्रीने स्वत:च हा किस्सा सांगितला आहे.

ही प्रसिद्ध मराठमोळी अभिनेत्री होती सचिन तेंडुलकरच्या प्रंचड प्रेमात; लग्नासाठी करायचं होतं प्रपोज, प्लॅनही होता रेडी,पण त्याआधीच
deepa parab
Image Credit source: Instagram
Updated on: Nov 26, 2025 | 1:38 PM

क्रिकेटचा देव म्हटल्या जाणाऱ्या सचिन तेंडुलकरचे आजही लाखो चाहते आहेत. सचिन तेंडुलकर आज वयाच्या 50 व्या वर्षी देखील त्याची तेवढीच फॅनफॉलोईंग आहे. सचिन तेंडुलकरचे आजही करोडो चाहते आहेत. सचिन तेंडुलकरची क्रिकेटमधली कामगिरी तर सर्वांनाच माहित आहेत. पण तो एक माणूस म्हणून देखील तेवढाच श्रीमंत आहे. म्हणून आजही लहानांपासून ते मोठ्यांपर्यंत सर्वांच्या मनात त्याच्याविषय प्रेम, आदर आहे. तो अनेकांची प्रेरणा आहे. सामान्यांपासून ते कलाकारांपर्यंत सगळेच सचिनचे चाहते आहेत. आजही कित्येक तरुणी त्याच्या प्रेमात वेड्या आहेत. त्या मुलींमध्ये एक अभिनेत्री देखील होती. जी सचिनच्या प्रेमात होती.

सचिनच्या प्रचंड प्रेमात होती, अजूनही आहे ही अभिनेत्री

एका मराठी अभिनेत्री तथा आता सुपरस्टारची असणारी पत्नीही सचिनच्या प्रचंड प्रेमात होती. तिला सचिन तेंडुलकर खूप आवडायचा. आजही आवडतो. ती अगदी त्याच्याशी लग्नही करायला तयार होती. मात्र ते शक्य झालं नाही. आजही ही अभिनेत्री सचिनसाठी वेडी आहे. तिच्या एका चित्रपटाने जेव्हा 90 कोटींची कमाई केली होती तेव्हा सचिनने तिला व्हिडिओ कॉल केला होता. तेव्हाही ती अगदी भारावून गेली होती. एवढंच नाही तर तिने त्याला प्रपोज करण्याची सर्व तयारी देखील केली होती.

कोण आहे ही अभिनेत्री माहितीये, ही अभिनेत्री म्हणजे दीपा परब जी लोकप्रिय मराठमोळा अभिनेता अंकुश चौधरी याची पत्नी आहे. कॉलेजला जाण्याच्याआधी पासून दीपाला सचिन तेंडुलकर प्रचंड आवडत होता. दीपाने एका मुलाखतीत तिच्या सचिनवरील प्रेमाबद्दल सांगितलं होतं. दीपाने एका मुलाखतीत आपल्या प्रेमाची कबुली दिली होती.


अभिनेत्रीला सचिनला प्रपोज करायचं होतं

जेव्हा तिला मुलाखतीत दीपाला प्रश्न विचारण्यात आला होती, की तिने कोणाला कधी प्रपोज केलं आहे का? तेव्हा तिने म्हटंल ‘मी नाही पण मुलाने मला प्रपोज केलंय. कारण मला ज्या मुलाला प्रपोज करायचं होतं त्याला मी करू शकले नाही. सचिन माझा पहिला क्रश होता. माझ्या नवऱ्याने एक शो घेतला होता. तो डायरेक्ट केला होता. तो माझ्यासाठी केला होता. त्यात सचिन तेंडुलकर सेलिब्रेटी होते. तेव्हा सचिन माझ्या बाजूला बसला होता, त्यामुळे मी खूप खुश होते. माझा पहिला क्रश सचिन तेंडुलकर. त्यानंतर कॉलेजमध्ये गेल्यावर अंकुश. मला खरंतर सचिन तेंडुलकरला प्रपोज करायचं होतं. पण हे नक्कीच शक्य झालं नाही. पण अंकुशनं मला जेव्हा प्रपोज केलं तेव्हा मी 24 तासाच्या आत त्याला हो म्हटलं. माझं त्याच्यावर प्रेम होतं. मी ज्या माणसावर प्रेम केलं त्याच्याशीच लग्न केलं.’

व्हिडीओ कॉलवरून सचिन तेंडुलकरशी संवाद साधला

दीपा परबचा ‘बाईपण भारी देवा’ हा सिनेमा रिलीज झाला. सिनेमाल उत्तम प्रतिसाद मिळाला. सिनेमाच्या एका शोला सचिन तेंडुलकरनं हजेरी लावली होती. पण यावेळी दीपा तिथे उपस्थित नव्हती. तिनं व्हिडीओ कॉलवरून सचिन तेंडुलकरशी संवाद साधला होता. दीपा परब आजही सचिनची चाहती आहे. आजही तिच्या मनात त्याच्याबदद्ल प्रचंड प्रेम आणि आदर आहे.