वेश्याव्यवसायातून अभिनेत्रीने कमावला बक्कळ पैसा, बाथरूमच्या भिंतीमागे लपवले नोटांचे गठ्ठे, सत्य समोर आल्यानंतर…

Actress Life: लोकप्रियतेच्या शिखरावर पोहोचलेली अभिनेत्री करायची वेश्याव्यवसाय, कमावलेले कोट्यवधी रुपये लपवले बाथरूमच्या भिंतीमागे... अभिनेत्रीचं सत्य समोर आल्यानंतर भोगावे लागले परिणाम

वेश्याव्यवसायातून अभिनेत्रीने कमावला बक्कळ पैसा, बाथरूमच्या भिंतीमागे लपवले नोटांचे गठ्ठे, सत्य समोर आल्यानंतर...
| Updated on: Aug 19, 2025 | 9:07 AM

भारतीय सिनेविश्वात 1950 ते 1990 पर्यंत एक असं नाव होतं, ज्याने अभिनेत्रींचं सिनेविश्वात असलेलं महत्त्व पटवून दिलं. दिलखेच अदा, उत्तम अभिनय आणि अफाट सौंदर्य… अशा सर्व गोष्टींनी परिपूर्ण असलेली अभिनेत्री म्हणजे मासा सिन्हा… त्यांनी हिंदी सिनेविश्वावर 4 दशकं राज्य केलं. ‘प्यासा’, ‘धूल का फूल’, ‘परवरिश’, ‘फिर सुबह होगी’, ‘नया जमाना’, ‘बादशाह’ यांसारख्या अनेक सिनेमांमध्ये माला यांनी दमदार भूमिका साकारली. अभिनेते धर्मेंद्र, मनोज कुमार, राजेश खन्ना, अमिताभ बच्चन यांसारख्या दिगग्ज आणि लोकप्रिय अभिनेत्यांसोबत माला यांनी स्क्रिन शेअर केली होती. पण एखाद्या सेलिब्रिटीचं आयुष्य कायम प्रसिद्धीझोतात राहिल असं नाही…

माला यांच्या आयुष्यात अशी वेळ सुद्धा आली तेव्हा त्यांचं नाव वादग्रस्त परिस्थिती आलं. ज्यामुळे त्यांची प्रतिमा, करीअर आणि वैयक्तिक आयुष्य पूर्णपणे बदलून टाकलं. 1992 मध्ये पद्मश्री पुरस्कार विजेत्या या अभिनेत्रीने आयुष्याच्या शिखरावर पोहोचल्यानंतर एक असा वळण घेतला ज्याने सर्वांना आश्चर्यचकित केलं. यानंतर, या अभिनेत्रीवर बरीच टीका झाली.

माला सिन्हा यांनी 120 हून अधिक सिनेमांमध्ये काम केलं होतं. त्या प्रचंड श्रीमंत होत्या आणि असं देखील म्हटलं जातं की त्यांनी घरात मदत करण्यासाठी कोणीही ठेवलं नव्हते. त्यांना घरकाम स्वतः करायला आवडत असे. पण 1978मध्ये जेव्हा त्यांच्या घरी आयकर विभागाने छापा टाकला तेव्हा सगळीकडे खळबळ माजली होती.

अभिनेत्रीच्या घरावर छापा टाकण्यात आला तेव्हा आयकर विभागाला माला सिन्हाच्या बाथरूमच्या भिंतीमागे नोटांचे गठ्ठे सापडले. मोजणी केली तेव्हा त्या पैशांची किंमत 100 कोटी रुपये होती आणि ही रक्कम त्यावेळी खूप मोठी होती. हे प्रकरण न्यायालयात पोहोचलं आणि तिथे अभिनेत्रीने दावा केला की तिने हे पैसे वेश्याव्यवसायातून कमावले आहेत.

रिपोर्टनुसार, माला सिन्हा यांनी कायदेशीर दबावाखाली वेश्याव्यवसाय करण्याचं विधान केलं होतं. असं म्हटलं जातं की त्यांच्या शिक्षिका आणि कायदेशीर सल्लागारांनी त्यांना सल्ला दिला होता की जर त्यांनी असं केलं तर ती शिक्षेपासून वाचेल. पण सर्वकाही उलटं झालं. याप्ररकणानंतर त्यांनी इंडस्ट्रीमध्ये काम मिळणं देखील बंद झालं. त्यांच्यावर बहिष्कार टाकण्यात आला.