
अभिनेत्री हंसिका मोटवानी हिने बालकलाकार म्हणून आपल्या करिअरची सुरूवात केली. ‘कोई मिल गया’ यासारख्या चित्रपटात तिने धमाकेदार काम केले. नेहमीच अभिनेत्री चर्चेचा विषय ठरते. सध्या अभिनेत्रीच्या खासगी आयुष्यात मोठे वादळ आल्याचे सांगितले जातंय. हंसिका मोटवानी हिचा पती सोहेलसोबत घटस्फोट झाल्याचे सांगितले जातंय. फक्त घटस्फोटच नाही तिने त्याचे घर सोडले असून सध्या ती तिच्या आईच्या घरी राहत असल्याचे काही रिपोर्टमध्ये सांगण्यात आलंय. लग्नानंतर हंसिका ही पती सोहेलच्या घरी शिफ्ट झाली होती.
रिपोर्टनुसार, हंसिका मोटवानी आणि तिचा पती सोहेल खटूरिया यांचे वैवाहिक जीवन कठीण काळातून जात आहे. लग्नाच्या तीन वर्षांनंतरच दोघे विभक्त झाली आहेत. हंसिका घर सोडून तिच्या आईकडे राहिला गेल्यानंतर सोहेल हा सुद्धा आपल्या आई वडिलांकडेच राहतोय. दोघे विभक्त होण्याचे मोठे कारण सोहेलचे कुटुंबच असल्याचे काही रिपोर्टमध्ये सांगण्यात आलंय. सोहेलचे कुटुंब मोठे असल्याने हंसिकाला काही समस्या येत आहेत.
हंसिका मोटवानी हिने 2022 मध्ये उद्योगपती सोहेल खटूरिया याच्यासोबत लग्न केले. लग्नानंतर हंसिका सोहेलच्या घरी राहण्यास गेली आणि सोहेल हा आपल्या आई वडिलांसोबत राहतो. त्यानंतर सोहेलने त्याच इमारतीमध्ये दुसरा एक फ्लॅट घेतला. मात्र, तरीही हंसिकाला काही समस्या होत्या. मात्र, घटस्फोटाच्या या चर्चांवर अजून हंसिका मोटवानी हिने काहीच भाष्य केलेा नाहीये. सोहेल याने घटस्फोटाच्या चर्चा चुकीच्या असल्याचे म्हटले आहे.
हंसिका आणि सोहेल यांच्या घटस्फोटाबद्दल त्यांच्या जवळच्या व्यक्तीने माहिती दिली असून हंसिका आणि सोहेल त्यांच्या फ्लॅटमध्ये राहत नसून अभिनेत्री तिच्या आईकडे गेली असून सोहेल हा देखील आई वडिलांसोबतच राहत असल्याचे सांगितले आहे. आता यावर अभिनेत्री हंसिका काय बोलणार याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत. मात्र, हंसिकाच्या घटस्फोटाच्या चर्चांमुळे चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे. लग्नाच्या दोन ते अडीच वर्षांमध्येच तिने घटस्फोट घेतल्याचे सांगितले जात आहे. अत्यंत शाही पद्धतीने हंसिकाचे लग्न झाले होते.