Kareena Kapoor : सेलिब्रिटी असं का वागतात ? एअरपोर्टवर करीना कपूरचं ते वागणं पाहून संतापले नेटीझन्स, ट्रोल करत..
बॉलिवूड अभिनेत्री करीना कपूर खान सोशल मीडियावर जोरदार ट्रोल झाली आहे. विमानतळावर आल्यावर करीनाचं वागणं पाहून नेटकऱ्यांचा संताप झाल्या, त्यांनी तिला चांगलच सुनावलं आहे.

बॉलिवूड अभिनेत्री करीना कपूर खान (Kareena Kapoor Khan) नेहमीच चर्चेत असते. काही दिवसांपूर्वीच तिने रणवीर सिंगच्या धुरंधर 2 चित्रपटाबद्दल भाष्य केलं होतं. “‘धुरंधर’ हा चित्रपट फक्त मुख्य अभिनेता रणवीर सिंहचा नाही, तर हा पूर्णपणे एका दिग्दर्शकाचा चित्रपट आहे. आजसुद्धा जेव्हा या चित्रपटाचा उल्लेख होतो, तेव्हा त्याला आदित्य धरचा ‘धुरंधर’ असं म्हटलं जातं.” असं ती म्हणाली होती. यावरून तिच्यावर बरीच टीका करण्यात आली होती, काहींनी करीनावर पक्षपातीचा आरोप केला. त्यानंतर आता करीना पुन्हा चर्चेत आली असून त्यामागचं कारण म्हणजे, समोर आलेला तिचा एका व्हिडीओ. नियम मोडल्याबद्दल सोशल मीडिया युजर्सनी करीनाला चांगलंच ट्रोल केलं आहे.
समोर आलेल्या या व्हिडीओत करीना ही विमानतळावरील चेक-इनची रांग तोडून थेट प्रवेशद्वाराकडे जाताना दिसत्ये. चेक-इन बूथवर पोहोचल्यावर, रांगेत उभ्या असलेल्या इतर लोकांची पर्वा न करता करीना सरळ चाल पुढे गेली, आतच घुसली. मात्र यामुळे सेलिब्रिटींना दिल्या जाणाऱ्या स्पेशल ट्रीटमेंटबद्दल प्रश्न निर्माण उपस्थित होत असून अनेकांनी संताप व्यक्त केला आहे.
करीना झाली ट्रोल
सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये करीना कपूर पीच रंगाच्या सूट आणि सलवारमध्ये दिसत् होती. यावेळी तिने जाड फ्रेमचा चष्माही लावला होता. मात्र विमानतळावर पोहोचल्यावर, रांगेत थांबण्याऐवजी करीना सरळ चालत पुढे गेली आणि थेट गेटवर पोहोचली. तिच्यासोबत जी व्यक्ती होती, त्याने तिथे गेटवर थेट तिचा पासपोर्ट आणि ओळखपत्र, ID दाखवलं, आणि त्यानंतर करीनाला प्रवेश मिळाला, ती आत गेली. या एअरपोर्टवर य़ावेळी मोठी रांग दिसत होती. ती राग मोडून, इतर लोकं रागेत उभे असतानातही करीना तशीच पुढे गेली. ते पाहून नियम मोडल्याबद्दल युझर्सनी करीनाला ट्रोल केलं आहे.
हा व्हिडिओ शेअर केला, त्या व्यक्तीवे लिहीलं, “करीना कपूरने विमानतळावर रांग तोडली आणि थेट गेटवर गेली. सेलिब्रिटी असं का करतात? त्यांना हा अधिकार कोण देतं? इतर लोकही आपल्या नंबरची वाट पाहत रांगेत उभे आहेत. त्यांनाही तातडीने विमान पकडायचे आहे. हे बरोबर नाही.” असा मेसेज त्याेन पुढे लिहीलाय.
Why VIP racism still happening in India despite even PM Modi warning against it ?
Are people fool to stand in queue & celebrities can fly over them & pass ?pic.twitter.com/FLJR44w9qp
— Frontalforce 🇮🇳 (@FrontalForce) April 12, 2026
करीनाचं काही उत्तर नाही
पाहता पाहता हा व्हिडीओ व्हायरल झाला असून त्यावर अनेकांनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरने लिहीलं, ही साधी लाईन सुसंस्कृत समाज आणि असा देश यांच्यातील खोल दरी उघड करत आहे, जिथे प्रत्येकजण जात, वर्ग, उच्च आणि नीच यांच्या सत्तेत अडकलेला आहे. तर आणखी एरा युजरने म्हटलं की भारतात हा व्हीआयपी भेदभाव का होतो?. आणखी एकाने तर थेट देशाच्या गृह मंत्रालयाला टॅग करून या VIP वागणुकीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. सक्षम करीना कपूरला रांगेत उभे राहायचं नाही, असा उपरोधिक टोला तर NCMindia ने हाणला. या सर्वप्रकरणी करीना कपूरने अद्याप कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही.
कामाबद्दल बोलायचं झालं तर करीना आता मेघना गुलजार दिग्दर्शित ‘दायरा’ या चित्रपटात दिसणार आहे. तिचा एक पॅन-इंडिया चित्रपटही प्रदर्शनाच्या मार्गावर आहे, मात्र त्याचं नाव अजून जाहीर करण्यात आलेलं नाही.