Madhuri Dixit : कोण माधुरी दीक्षित ? श्रीराम नेनेंना माहीतच नव्हता ‘धकधक गर्ल’चा जलवा

अभिनेत्री माधुरी दीक्षितचे लग्न झाल्यावर तिचे चाहते खूप दु:खी झाले होते. लग्नानंतर तिने अभिनय जगतालाही रामराम केला होता. मात्र आता ती मोठा पडदा, ओटीटी देखील गाजवत आहे. माधुरी किती मोठी अभिनेत्री आह, हे मात्र तिचे पती डॉ. श्रीराम नेने यांना माहीत नव्हतं. त्यांना फक्त एका अभिनेत्याबद्दल माहीत होतं.

Madhuri Dixit : कोण माधुरी दीक्षित ? श्रीराम नेनेंना माहीतच नव्हता धकधक गर्लचा जलवा
माधुरी दीक्षित- श्रीराम नेने
Image Credit source: social media
| Updated on: Dec 02, 2025 | 12:15 PM

अभिनेत्री माधुरी दीक्षित ही लवकरच पुन्हा ओटीटीवर दिसणार आहे. ‘मिसेस देशपांडे’ या गूढ कथेतून ती प्रेक्षकांच्या समोर येणार आहे. अनेक दिवसांनी ती दिसणार आहे. तिचं जेव्हा लग्न झालं तेव्हा अनेक चाहत्याचं हृदय तुटलं. डॉ. श्रीराम नेने यांच्याशी लग्न करून माधुरी ही अमेरिकेला गेला, अभिनयाच्या दुनियेलाही तिने रामराम केल्याने चाहत्यांना खूप वाईट वाटलं. जिचे लाखो चाहते आहेत, त्या माधुरीशी लग्न केल्यावर श्रीराम नेने यांना कसं वाटं असा सवाल नेहमी विचारण्यात येतो. मात्र त्यावर माधुरीने दिलेलं उत्तर ऐकून तुम्हालाबी आश्चर्य वाटल्याशिवाय राहणार नाही. जेव्हा माधुरी आणि डॉ. नेने यांचं लग्न झालं तेव्हा ती एवढी मोठी स्टार आहे, हे त्यांना माहीतच नव्हतं.

पतीबद्दल केला मोठा खुलासा

माधुरी दीक्षितने अलीकडेच ANI शी बोलताना मोठा खुलासा केला, तिने सांगिलं की डॉ. नेने यांनी त्यांचे बालपण परदेशात घालवले असल्याने त्यांना भेटण्यापूर्वी माधुरीचे चित्रपट पाहिले नव्हते. त्यांचा जन्म लंडनमध्ये झाला आणि 7 व्या वर्षी ते अमेरिकेत गेले. कधीतरी सुट्टीतच ते भारतात यायचे. अभ्यास वाढल्यावर इथे येणं बंदच झालं. आणि तसंही महाराष्ट्रीयन कुटुंबात अभ्यासावर जास्त फोकस असतो, चित्रपटांचं खूप वेड नसतं. त्यामुळे डॉ. नेने यांना फार माहीत नव्हतं, त्यांना हिंदी भाषा देखील यायची नाही, असं माधुरीने सांगितलं.

फक्त माहीत होते अमिताभ बच्चन

पुढे माधुरी म्हणाली, की ते चित्रपट फारसे पहायचेच नाहीत. त्यांनी फक्त अमर अकबर अँथनी हाँ चित्रपट पाहिला होता, त्यामुळे त्यांना केवळ अमिताभ बच्चन हे माहीत होते. माधूरी आणि डॉ. नेने यांची भेट झाली ती एखाद्या सामान्य माणसांप्रमाणेच. तेव्हा त्यांना समजलं की माधुरू एक अभिनेत्री आहे, चित्रपटांत काम करते वगैरे. मी खूप मोठी स्टार आहे हे त्यांना माहीतच नव्हतं असं तिने सांगितलं.

माधुरी दीक्षितने 17 ऑक्टोबर 19999 रोजी लॉस एंजेलिस येथील कार्डिओथोरॅसिक सर्जन डॉ. श्रीराम नेने यांच्याशी लग्न केले. त्यांच्या लग्नाच्या वेळी माधुरीची कारकीर्द शिखरावर होती. तरीसुद्धा, लग्नानंतर तिने अभिनय सोडला. लग्नानंतरच डॉ. नेनेंना कळले की ती एक मोठी स्टार आहे.