Sai Pallavi | साई पल्लवी हिचा संताप, अखेर ‘त्या’ फोटोवर सोडले माैन, अभिनेत्रीने केला मोठा खुलासा

साऊथ स्टार साई पल्लवी ही कायमच चर्चेत राहणारी अभिनेत्री आहे. साई पल्लवी ही सोशल मीडियावरही सक्रिय आहे. साई पल्लवी हिची तगडी फॅन फाॅलोइंग असून ती आपल्या चाहत्यांसाठी खास फोटो आणि व्हिडीओ शेअर करताना दिसते.

Sai Pallavi | साई पल्लवी हिचा संताप, अखेर त्या फोटोवर सोडले माैन, अभिनेत्रीने केला मोठा खुलासा
| Updated on: Sep 22, 2023 | 9:00 PM

मुंबई : साऊथ अभिनेत्री साई पल्लवी (Sai Pallavi) ही कायमच चर्चेत असते. साई पल्लवी हिची सोशल मीडियावर जबरदस्त अशी फॅन फाॅलोइंग ही बघायला मिळते. साई पल्लवी हिने आपल्या करिअरमध्ये आतापर्यंत अनेक हिट चित्रपटांमध्ये महत्वाच्या भूमिका केल्या. साई पल्लवी चित्रपटांमध्ये अत्यंत साध्या लूकमध्ये दिसते. साई पल्लवी ही सोशल मीडियावरही (Social media) सक्रिय दिसते. सोशल मीडियावर आपल्या चाहत्यांसाठी साई पल्लवी ही खास फोटो आणि व्हिडीओ शेअर करताना दिसते.

साई पल्लवी ही कोट्यवधी संपत्तीची मालकीनही आहे. साई पल्लवी ही सध्या एका फोटोमुळे तूफान चर्चेत आलीये. साई पल्लवी हिचा तो फोटो पाहून चाहत्यांना मोठा धक्का बसला. इतकेच नाही तर एका फोटोमुळे विविध चर्चा रंगताना दिसल्या. आता शेवटी या फोटोवर थेट स्पष्टीकरण देताना साई पल्लवी ही दिसलीये.

साई पल्लवी हिने यासोबतच खडेबोल सुनावल्याचे दिसत आहे. साई पल्लवी हिचा पारा चांगलाच चढलाय. साई पल्लवी हिचा एक फोटो तूफान व्हायरल झाला. या फोटोनंतर चर्चा सुरू झाली की, साई पल्लवी हिने गुपचूप पद्धतीने लग्न केले. आता साई पल्लवी हिने मोठा खुलासा केलाय. साई पल्लवी हिने लिहिले की, प्रामाणिकपणे सांगायचे झाले तर मला माझ्याबद्दल सुरू असलेल्या अफवांचा काहीच फरक पडत नाही.

परंतू ज्यावेळी यामध्ये माझ्या कुटुंबियांचा आणि मित्रांचा समावेश होतो त्यावेळी बोलावे लागते. माझ्या चित्रपटाच्या पूजा समारंभातील एक फोटो जाणूनबुजून क्रॉप करण्यात आला. विशेष म्हणजे ज्याचा वाईट हेतू होता. साई पल्लवी हिचा शेअर केलेला फोटो एसके 21 चित्रपटाच्या पूजेदरम्यानचा आहे. या फोटोमध्ये साई पल्लवी ही निर्देशक राजकुमार पेरियासामी यांच्या गळ्यात हार घालताना दिसते.

हाच फोटो व्हायरल करण्यात आला. साई पल्लवी ही राजकुमार पेरियासामी यांच्या गळ्यात हार घालत असल्याने सांगितले गेले की, यांनी गुपचूप पद्धतीने लग्न केले. यानंतर अनेक चर्चांना उधाण आले. मात्र, आता साई पल्लवी हिने या चर्चांवर माैन सोडत थेट याच्यावर स्पष्टीकरण दिले. सकाळपासूनच चाहते हे साई पल्लवी हिला लग्नाच्या शुभेच्छा देताना देखील दिसले.