अभिनेत्री 9 वर्षांनी मोठ्या अन् दोन मुलांच्या वडिलांच्या प्रेमात पडली; लग्नानंतर करिअर थांबलं, पण मुलगी मात्र बॉलिवूडमधली टॉप अभिनेत्री

एक अशी अभिनेत्री जिने बॉलिवूडमधील एका विवाहित आणि दोन मुलांचे वडील असलेल्या एका प्रसिद्ध चित्रपट निर्माते तथा दिग्दर्शकाशी लग्न केलं. त्यानंतर तिला टीकेला सोमारं जावं लागलं. मात्र आज या अभिनेत्रीची मुलगी देखील बॉलिवूडमधील टॉप अभिनेत्रींपैकी एक आहे.

अभिनेत्री 9 वर्षांनी मोठ्या अन् दोन मुलांच्या वडिलांच्या प्रेमात पडली; लग्नानंतर करिअर थांबलं, पण मुलगी मात्र बॉलिवूडमधली टॉप अभिनेत्री
Actress Soni Razdan
Image Credit source: tv9 marathi
| Updated on: Oct 25, 2025 | 2:27 PM

बॉलिवूडमधील अनेक सेलिब्रिटी हे चित्रपटांपेक्षा त्यांच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत राहिलेले आहेत. तसेच काही अभिनेत्रींचे लग्न हे जास्त चर्चेत राहिलं आहे. अशीच एक बॉलिवूडमधील अभिनेत्री आहे जी तिच्या चित्रपटांपेक्षाही तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत राहिलं आहे. कारण ही अभिनेत्री दोन मुलांचे वडील असलेल्या प्रसिद्ध चित्रपट निर्माते आणि दिग्दर्शकाच्या प्रेमात पडली आणि लग्न केलं. त्यामुळे या अभिनेत्रीला अनेक काळ टीकेलाही सामोरं जावं लागलं होतं.

अभिनेत्री विवाहित निर्माते आणि दिग्दर्शकाच्या प्रेमात

ही अभिनेत्री म्हणजे सोनी राजदान. सोनी राजदान यांनी 80 आणि 90 च्या दशकात आपल्या उत्तम अभिनयाने नाव कमावलं. सोनीने तिच्या कारकिर्दीत अनेक हिट चित्रपट दिले, सोनी यांनी प्रसिद्ध चित्रपट निर्माते आणि दिग्दर्शक महेश भट्ट यांच्याशी लग्न केलं. भट्ट आधीच विवाहित होते आणि त्यांना दोन मुले होती.
महेश भट्ट यांचे पहिले लग्न लोरेन ब्राइटशी झाले होते, ज्यांना किरण भट्ट म्हणूनही ओळखले जाते, त्यांच्यापासून पूजा भट्ट आणि राहुल भट्ट ही दोन मुले आहेत. तथापि, काही वर्षांनंतर सोनी यांच्या प्रेमात पडले आणि दोघांनी लग्न केलं. महेश भट्टशी लग्न केल्यानंतर त्या अभिनयापासून दूरच राहिल्या.

अभिनेत्रीचे वडील काश्मिरी पंडित होते

सोनी राजदान यांचा जन्म 25 ऑक्टोबर 1956 रोजी इंग्लंडमधील बर्मिंगहॅम येथे झाला. त्यांचे वडील काश्मिरी पंडित होते आणि आई जर्मन-ब्रिटिश होती. सोनी राजदान यांनी त्यांच्या दोन्ही पालकांच्या संस्कृती स्वीकारल्या आणि नंतर महेश भट्ट यांच्याशी लग्न करण्यासाठी इस्लाम धर्म स्वीकारला. महेश भट्ट हे सोनीपेक्षा नऊ वर्षांनी मोठे आहेत. दरम्यान सोनी आणि महेश भट्ट यांना आलिया आणि शाहीन या दोन मुली आहेत. आलिया आज बॉलिवूडमधील टॉप अभिनेंत्रीपैकी एक आहे. तिची बॉलिवूडमध्ये एक वेगळी ओळखं आहे.

इंग्रजी रंगभूमीपासून अभिनय कारकिर्दीला सुरुवात

सोनी राजदानला लहानपणापासूनच अभिनयाची आवड होती. तिने इंग्रजी रंगभूमीतून तिच्या कारकिर्दीची सुरुवात केली आणि नंतर “द कलेक्टर” या इंग्रजी चित्रपटात काम केले. 1970 च्या दशकात प्रदर्शित झालेला हा चित्रपट तितकासा यशस्वी झाला नाही. 1981 मध्ये, सोनीने अँग्लो-इंडियन्सच्या दुर्दशेचे चित्रण करणाऱ्या “36 चौरंगी लेन” या बंगाली चित्रपटात काम केले. त्याच वर्षी, तिने “अहिस्ता अहिस्ता” या तिच्या पहिल्या चित्रपटात दीपाची भूमिका साकारत बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. त्यांनी बॉलिवूडमध्ये अनेक हीट चित्रपट दिले आहेत.